जागतिक हृदय महिन्यानिम्मित ग्लेनमार्कतर्फे उच्च रक्तदाब जनजागृती अभियान
जागतिक हृदय महिन्यानिम्मित ग्लेनमार्कतर्फे उच्च रक्तदाब जनजागृती अभियान
१० कोटींहून अधिक लोकांपर्यंत उच्च रक्तदाब जनजागृती मोहीम पोहोचविण्याचे लक्ष्य
मुंबई, २८ सप्टेंबर २०२२: भारतातील अग्रणीय फार्मास्युटिकल्स कंपनी ग्लेनमार्कतर्फे असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया, इंडियन मेडिकल असोसिएशन मुंबई पश्चिम क्षेत्र, आणि मालाड मेडिकल असोसिएशन यांच्या सहयोगातून जागतिक हृदय महिन्याच्या निम्मिताने २५ सप्टेंबर रोजी सुचक हॉस्पिटल, मालाड येथे जनजागृती मोहीम राबविण्यात आली.उच्च रक्तदाब हा हृदयविकार, स्ट्रोक आणि मूत्रपिंडाच्या आजारासाठी सर्वात मोठा धोका घटक आहे. भारतातील प्रत्येक तिसरा प्रौढ हायपरटेन्शन- उच्च रक्तदाब या आजाराने ग्रस्त आहे.
या प्रसंगी उत्तर मुंबईचे खासदार श्री गोपाल शेट्टी, लोकप्रिय नृत्यांगना आणि टेलिव्हिजन अभिनेत्री सुधा चंद्रन, एपीआय सरचिटणीस डॉ. आगम व्होरा, एमएमएचे विश्वस्त डॉ. अनिल सुचक, पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. शशांक जोशी, डॉ. के सी मेहता, एमएमएचे अध्यक्ष डॉ. राजेश जैन, एमएमएचे सरचिटणीस डॉ. नरेश दांडेकर, यांच्यासह इतर मान्यवर आणि ३०० डॉक्टर उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, ग्लेनमार्क ने साकारलेल्या जगातील पहिल्या हायपरटेन्शन अवेअरनेस चिन्हाचे चे अनावरण करण्यात आले. वाढत्या उच्चरक्तदाबाच्या आजारांबद्दल आणि त्या संदर्भात वेळेवर योग्य तपासणीच्या गरजेबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतातील ५०,००० आघाडीच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून हे चिन्ह विकसित आले असून एपीआय आणि हायपरटेन्शन सोसायटी ऑफ इंडिया द्वारे समर्थित करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर जनजागृतीपर रॅली काढण्यात आली यात अनेक वैद्यकीय व्यावसायिक, रुग्णालयातील कर्मचारी आणि परिसरातील नागरिक सहभागी झाले होते
Comments
Post a Comment