फ्यूजन मायक्रो फायनान्स लिमिटेड
- इनिशिअल पब्लिक ऑफर
२ नोव्हेंबर २०२२
रोजी सुरू होणार
·
फ्यूजन मायक्रो फायनान्स
लिमिटेडच्या प्रत्येक १०
रुपये दर्शनी मूल्य असलेल्या
समभागासाठी रु.३५० ते
रु.३६८
किंमत निश्चित.
·
४ नोव्हेंबर २०२२
रोजी ऑफर बंद होणार
·
किमान ४० आणि
त्यानंतर ४०च्या पटीत समभागांसाठी
बोली लावता येणार.
राष्ट्रीय, २८ नोव्हेंबर २०२२: फ्यूजन मायक्रेा
फायनान्स लिमिटेडने (‘‘एफएमएल’’
किंवा ‘‘कंपनी’’) दिनांक २
नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांच्या
प्रत्येकी १० रुपये (‘‘समभाग’’) दर्शनी मूल्य
असेल्या समभागांची इनिशिअल
पब्लिक ऑफरिंग सुरू करण्याचे
प्रस्तावित केलेले आहे, ज्यात ६,०००
दशलक्ष नव्या समभागांचा (‘‘फ्रेश इश्यू’’)
आणि १३,६९५,४६६ पर्यंत
समभागांच्या विक्रीचा (‘‘ऑफर’’) समावेश आहे. यासाठीची
अँकर इन्व्हेस्टर बिडिंग
डेट ही मंगळवार, दिनांक १
नोव्हेंबर २०२२ अशी असेल. ही
ऑफर ४ नोव्हेंबर २०२२
रोजी संपेल.
या ऑफरच्या
किमतीची मर्यादा प्रति समभाग
रु.३५०
ते रु.३६८ अशी
निश्चित करण्यात आलेली आहे. बोली
किमान ४० आणि त्यानंतर
४०च्या पटीत असलेल्या समभागांसाठी
लावली जाऊ शकते.
या ऑफरमध्ये
देवेश सचदेव यांच्याद्वारे ६५०,०००
पर्यंत समभाग; मिनी सचदेव
यांच्याद्वारे १००,००० पर्यंत
समभाग; हनी रोझ इन्व्हेस्टमेंट लि. यांच्याद्वारे १,४००,०००
पर्यंत समभाग; क्रिएशन इन्व्हेस्टमेंट्स
फ्यूजन एलएलसी यांच्याद्वारे १,४००,०००
पर्यंत समभाग; ऑयकोक्रेडिट एक्यूमेनिकल
डेव्हलपमेंट कॉऑपरेटिव्ह सोसायटी
यू.ए
यांच्याद्वारे ६,६०६,३७५ पर्यंत
समभाग; आणि ग्लोबल इम्पॅक्ट
फंड्स, एस.सी.ए., एसआयसीएआर यांच्याद्वारे
३,५३९,०९१
पर्यंत समभाग यांच्या विक्रीचा
समावेश आहे.
ह्या समभागांची
ऑफर,
नवी दिल्ली येथील कंपनी
निबंधक दिल्ली आणि हरियाणा
(‘‘आरएचपी’’) यांच्याकडे फाईल
करण्यात आलेल्या कंपनीच्या दिनांक
२५ ऑक्टोबर २०२२च्या रेड
हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या माध्यमातून
दिली जात आहे आणि
ते बीएसई लिमिटेड (‘‘बीएसई’’)
आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज
ऑफ इंडिया लिमिटेड (‘‘एनएसई’’)
यांच्याकडेत सूचीकृत करण्याचे प्रस्तावित
करण्यात आलेले आहे. या प्रस्तावित
ऑफरसाठी नियुक्त स्टॉक एक्सचेंज
हे बीएसई असेल.
ही ऑफर, वेळोवेळी सुधारित करण्यात आलेल्या सेक्युरिटिज काँट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) रुल्स, १९५७ ("एससीआरआर") मधील नियम १९(२)(बी) अनुसार व त्यासोबत वेळोवेळी सुधारित करण्यात आलेल्या सेक्युरिटिज् अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१८ (‘‘सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स’’) मधील रेग्युलेशन ३१च्या सहवाचनांतर्गत दिली जात आहे. ही ऑफर सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ६(१) अनुसार दिली जात आहे, ज्यात पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (‘‘क्यूआयबी पोर्शन’’) ॲलोकेशनसाठी त्या प्रमाणात ५०% पेक्षा अधिक ऑफर उपलब्ध नसेल, मात्र आमची कंपनी तिच्या आयपीओ कमिटीच्या माध्यमातून, बीआरएलएमएसच्या सल्ल्याने क्यूआयबी पोर्शनपैकी ६०% आफर अँकर इन्व्हेस्टर्सना, तिच्या स्वत:च्या विवेकाधिकारात देऊ शकेल. देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून अँकर इन्वहेस्टमेंट ॲलोकेशन प्राईसपेक्षा अधिक किमतीची वैध बोली प्राप्त झाल्यास अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी एक तृतीयांश भाग म्युच्युअल फंडांसाठी राखीव ठेवण्यात येईल. जर अँकर इन्व्हेस्टमेंट पोर्शनमध्ये सबस्क्रिप्शन कमी गोळा झाले किंवा सबस्क्रिप्शन गोळा झालेच नाही, तर शिल्लक समभाग नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये जोडले जातील. त्यानंतर, नेट क्यूआयबी पोर्शनपैकी ५% हिस्सा फक्त म्युच्युअल फंडांसाठी प्रपोर्शनेट बेसिसवर ॲलोकेशनसाठी उपलब्ध असेल आणि क्यूआयबी पोर्शनपैकी उर्वरित हिस्सा सर्व क्यूआयबी बिडर्ससाठी प्रपोर्शनेट बेसिसवर ॲलोकेशनसाठी उपलब्ध असेल, ज्यात म्युच्युअल फंडांनी ऑफर प्राईसपेक्षा जास्तीची वैध बोली लावल्यास त्यांचाही समावेश असेल. परंतु म्युच्युअल फंडांकडून आलेली एकत्रित मागणी क्यूआयबी पोर्शच्या ५% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड पोर्शनमध्ये ॲलोकेशनसाठी उपलब्ध असलेले शिल्लक समभाग क्यूआयबीज्ना प्रपोर्शनेट ॲलोकेशन करण्यासाठी क्यूआयबी पोर्शनमध्ये जोडले जातील.
त्यानंतर, ऑफरपैकी किमान
१५%
किंवा त्यापेक्षा अधिक
हिस्सा हा नॉन-इन्स्टिट्यूशनल बिडर्ससाठी
(‘‘नॉन-इन्स्टिट्यूशनल पोर्शन’’)
उपलब्ध असेल, ज्यापैकी एक
तृतीयांश नॉन-इन्स्टिट्यूशनल पोर्शन
हे २००,००० रुपयांपैक्षा
अधिक आणि १,०००,००० रुपयांपर्यंत
बिड साईझ असलेल्या बिडर्ससाठी
ॲलोकेशनसाठी उपलब्ध असेल आणि
दोन तृतीयांश नॉन-इन्स्टिट्यूशनल पोर्शन हे १,०००,०००
रुपयांपेक्षा कमी बीड साईझ
असलेल्या बिडर्ससाठी ॲलोकेशनसाठी
उपलब्ध असेल आणि यापैकी
कोणत्याही एका दोन उप
संवर्गामध्ये पुरेशा प्रमाणात सबस्क्रिप्शन
झाले नाही, तर सेबी
आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार नॉन-इन्स्टिट्यूशनल पोर्शन हे नॉन-इन्स्टिट्यूशनल पार्शाच्या इतर उप
संवर्गांना ॲलोकेट केले जाऊ
शकेल, मात्र त्यासाठी ऑफर
प्राईसपेक्षा वैध बोली प्राप्त
झाल्या पाहिजेत आणि किमान
३५%
किंवा त्यापेक्षा अधिक
ऑफर ही सेबी आयसीडीआर
रेग्युलेशन्सनुसार रिटेल इंडिव्ह्युज्युअल बिडर्ससाठी उपलब्ध असेल, मात्र
त्यासाठी ऑफर प्राईसपेक्षा वैध
बोली प्राप्त झाल्या पाहिजेत.
संभाव्य बोली लावणाऱ्यांनी (अँकर इन्व्हेस्टर्स वगळून) अनिवार्यपणे ॲप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (‘‘एएसबीए’’) प्रक्रियेचा वापर केला पाहिजे आणि लागू असल्यास त्यांच्या संबंधित एएसबीए अकाऊंट्स आणि यूपीआय आयडी (आरआयबीज्च्या बाबतीत) तपशील दिले पाहिजेत, ज्यात एससीएसबीज्द्वारे किंवा यूपीआय यंत्रणेच्या अंतर्गत, लागू असेल त्यानुसार बिडची संबंधित रक्कम अडवून ठेवली जाईल अँकर इन्व्हेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेच्या माध्यमातून ऑफरमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाहीए.
यात उल्लेख केलेले सर्व ठळक शब्दप्रयोग, ज्यांच्या व्याख्या येथे दिलेली नसेल, त्यांचा अर्थ आरएचपीमध्ये दिल्यानुसार असेल.
Comments
Post a Comment