ग्लेनमार्क तर्फे सहव्याधींसह टाईप २ मधुमेह प्रौढांसाठी जीटा-डी लॉन्च
ग्लेनमार्क तर्फे सहव्याधींसह टाईप २ मधुमेह प्रौढांसाठी जीटा-डी लॉन्च
मुंबई २5 ऑक्टोबर २०२२ : नावीन्यतेवर भर देणारी जागतिक औषध कंपनी असलेल्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही अनियंत्रित टाईप-२ मधुमेह असलेल्या, विशेषतः सहव्याधींसह मधुमेह असलेल्या, रुग्णांसाठी टेनेलिग्लिप्टिन (२०मिग्रॅ) + डॅपाग्लिफ्लोझिन (५मिग्रॅ/१० मिग्रॅ) फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन (एफडीसी) सादर करणारी पहिली कंपनी ठरली आहे. जीटा डी या ब्रँड नावाने विकण्यात येणाऱ्या या औषधात टेनेलिग्लिप्टिन (२० मिग्रॅ) + डॅपाग्लिफ्लोझिन ( ५ मिग्रॅ/१० मिग्रॅ) हे मिश्रण असून ते प्रौढ मधुमेही, विशेषतः सहव्याधींसह मधुमेह असलेल्या, रुग्णांमधील ग्लायसेमिक नियंत्रण सुधारण्यासाठी प्रिस्क्रिप्शननुसार दररोज एकदा घ्यायचे आहे.
टेनेलिग्लिप्टिन हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे डीपीपी ४आय (डिपेप्टिडायल पेप्टिडेज ४ ) इनहिबिटर आहे तर डॅपाग्लिफ्लोझिन हे देशातील मधुमेही रुग्णांना सर्वाधिक प्रिस्क्राईब केले जाणारे एसजीएलटी-२ आय (सोडियम ग्लुकोज को-ट्रान्सपोर्टर २ ) इनहिबिटर आहे. सहव्याधींसह अनियंत्रित टाईप २ मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी जीटा डी हा एक आश्वासक पर्यायी उपचार आहे. सहव्याधी नसलेल्या प्रौध मधुमेही रुग्णांमध्येही हे एफडीसी परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. ग्लेनमार्क जीटा डी ची किंमत टेनेलिग्लिप्टिन २० मिग्रॅ + डॅपाग्लिफ्लोझिन ५ मिग्रॅ एफडीसीसाठी अंदाजे १४ रुपये प्रति गोळी आणि टेनेलिग्लिप्टिन २० मिग्रॅ + डॅपाग्लिफ्लोझिन १० मिग्रॅ एफडीसीसाठी १५ रुपये प्रति गोळी दररोज एवढी आहे.
या प्रसंगी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचे इंडिया फॉर्म्यूलेशन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष व बिझिनेस हेड आलोक मलिक म्हणाले की भारतात मधुमेह धोकादायक वेगाने वाढत असून दहापैकी आठ रुग्णांना सहव्याधींचा त्रास असल्याचे दिसून येते. भारतातील मधुमेहाच्या क्षेत्रात अग्रगण्य कंपनी या नात्याने जीटा डी सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो. हे गहन संशोधन करण्यात आलेले आणि परवडणारे फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन असून ते अनियंत्रित टाईप २ मधुमेहाने, विशेषतः सहव्याधी असलेल्या, रुग्णांमधील ग्लायसेमिक नियंत्रण सुधारण्यात लक्षणीय सुधारणा घडवून आणेल.
Comments
Post a Comment