ओमरॉन हेल्थकेअरने त्यांचे होम ब्लड प्रेशर मॉनिटर उपकरण अपग्रेड करून ते कनेक्टेड डिव्हाइसेसमध्ये परिवर्तीत केले

 ओमरॉन हेल्थकेअरने त्यांचे होम ब्लड प्रेशर मॉनिटर उपकरण अपग्रेड करून ते कनेक्टेड डिव्हाइसेसमध्ये परिवर्तीत केले


 


मुंबई, 31 ऑक्टोबर, 2022 : ओमरॉन हेल्थकेअर या होम ब्लड प्रेशर मॉनिटरिंग व हृदयाच्या रक्तवाहिनीच्या आजारांचे व्यवस्थापन करण्यासाठी असलेल्या सोल्यूशनने त्यांचे बीपी मॉनिटर अपग्रेड करून ते कनेक्टेड डिव्हाइसेसमध्ये परिवर्तीत केले. या महत्त्वाच्या अपग्रेडमुळे त्यांचा पोर्टफोलिओ अपग्रेड होऊन त्याचा हायपरटेन्शनच्या व्यवस्थापनासाठी सुरक्षित, सहज, अधिक रिअल टाइम आणि अचूक नियंत्रण होण्यास युझर्स आणि वैद्यकीय व्यावसायिकांना मदत होईल.


 


ही उपकरणे आता कनेक्टेड असून ओमरॉन कनेक्ट या ओमरॉनच्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून विनाअडथळा डेटा ट्रान्सफर करतात. रक्तदाबासंदर्भात टेलिहेल्थ सेगमेंटमध्ये हे भारतातील असे एकमेव अॅप आहे. उपकरणातील इनबिल्ट ब्ल्यूटूथ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने युझर्स तसेच फिजिशिअन्ससाठी रिअल टाइम व सुविधाजनक लक्ष ठेवणे शक्य होते.


 


“डॉक्टर व रुग्ण यांच्यातील अंतर भरून काढण्यासाठी रिमोट पेशंट मॉनिटरिंग कनेक्टेड डिव्हाइसेसवर अवलंबून असतात. ओमरॉनमधील अपग्रेड हे आमच्या गोइंग फॉर झीरो व्हिजन साध्य करण्याच्या योग्ये दिशने घेतलेली मोठी झेप आहे. हृदयाच्या रक्तवाहिनीच्या आजारांसंदर्भात अनुचित घटना घडण्याला प्रतिबंध करणे हे या व्हिजनचे उद्दिष्ट आहे. रक्तदाबावर लक्ष 
ठेवणे आणि आपण करत असलेले हायपरटेन्शनचे व्यवस्थापन या निमित्ताने नव्याने पारिभाषित होईल. रक्तदाबाचे व्यवस्थापन करण्याची अधिक क्षमता ग्राहकांना प्रदान करून आणि फिजिशिअन्सना अधिक चांगले उपचार करता यावे यासाठी अधिक तपशील उपलब्ध करून देऊन आणि वैयक्तिकीकृत उपचारांचा आवाका वाढवून हे साध्य करण्यात येणार आहे.”, असे या लाँचच्या वेळी ओमरॉन हेल्थकेअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कोटारो सुझुकी म्हणाले.


 


अनेक यादृच्छिक (रँडमाइझ्ड) नियंत्रित चाचण्यांमधून नोंदविण्यात आले आहे की, सेल्फ मेजर्ड ब्लड प्रेशर मॉनिटरिंग वुइथ क्लिनिकल सपोर्ट (एसएमबीपी) हे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी एक उत्तम नियंत्रण आहे आणि रक्तवाहिनीच्या विकारांवर परिणामकारक प्रतिबंध करण्याचे साधन आहे. एसएमबीपीच्या ट्रेनिंगने रुग्ण नियमितपणे त्यांच्या स्वतःचा रक्तदाब घरच्या घरी एका उपकरणाच्या सहाय्याने पाहू शकतात आणि वैद्यकीय मदतीवर आवश्यकतेनुसार अवलंबून राहू शकतात.


 


अॅपमुळे युझरचा रक्तदाबाचा तपशील नोंदणे, पाहणे, वायरलेस माध्यमातून सिन्क करणे सहज शक्य होते आणि अलीकडील मापने पाहण्यासाठी, प्रगतीव लक्ष ठेवण्यासाठी आणि औषधांसाठी रिमाइंडर्स पाठविण्यासाठी वापरण्यास सोपा असलेला डॅशबोर्ड मिळतो. हा डेटा सहजपणे कोणत्याही माध्यमातून (ई-मेल, व्हॉट्सअॅप) आणि फॉरमॅटमध्ये (एक्सेल, पीडीएफ इत्यादी) एक्स्पोर्ट करता येतो. त्यामुळे फिजिशिअन्सनाही तो रिअल टाइम पाहून त्यानुसार पावले उचलतात येतात. ओमरॉन कनेक्टेड डिव्हाइसेसमधील डेटा इतर हेल्थ अॅप्ससोबतही शेअर करता येतो.


 


ओमरॉन बीपी मॉनिटरच्या जुन्या व्हेरिअंटचा वापर करणाऱ्या भारतातील लोकांना हे अॅप्लिकेशन उपलब्ध करून देण्यासाठी ओमरॉनने ऑप्टिकल कॅरॅक्टर रेकग्निशन (ओसीआर) तंत्रज्ञान फीचर सादर केले आहे. या माध्यमातून नॉन-कनेक्टेड ओमरॉन डिव्हाइसेसमधून रक्तदाबाची आकडेवारी घेणे व नोंदवून ठेवणे आणि ती फोनमध्ये ट्रान्सफर करणे शक्य होते.


या अॅपमध्ये बीपी डायरी हे वैशिष्ट्यपूर्ण फीचरही सादर करण्यात आले आहे. ज्यामुळे नोंद ठेवण्याचा आणि सल्ल्याचा स्वयंचलित व सुलभ मार्ग उपलब्ध होतो. या मार्गाने व्यक्तीला जीवनशैली, मॉनिटरिंग व औषधाच्या रिमाइंडर्ससह रक्तदाबाची आकडेवारी व व्यवस्थापन करणे शक्य होते.


 


ओमरॉन हेल्थकेअरतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेले बीपी मॉनिटर हे वैद्यकीयदृष्ट्या अचूकतेसाठी आणि नेमकेपणा व विश्वासार्हतेच्या सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मानकांसाठी प्रमाणित करण्यात आले आहेत. घरगुती वातावरणात अचूक मापनाची खातरजमा करण्यासाठी ते पेटंटप्राप्त इंटेलिसेन्स तंत्रज्ञान IntelliWrap™ 360° अॅक्युरसी कफचा वापर करतात.


 



Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE