ब्रिजस्टोन इंडियाच्या वतीने मोबिलिटी सोशल इंपॅक्ट अॅवॉर्डच्या दुसऱ्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा
ब्रिजस्टोन इंडियाच्या वतीने मोबिलिटी सोशल इंपॅक्ट अॅवॉर्डच्या
दुसऱ्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा
· सामाजिक सुधारणा साधन म्हणून नाविन्यपूर्ण दळणवळण पर्याय वापराचा प्रचार
· आरोग्य रक्षा आणि पोषण, उपजीविका, शिक्षण आणि सामाजिक समावेशामधील सुरक्षित आणि स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशनच्या प्रगतीच्या दिशेने घेतलेल्या पुढाकारांना पुरस्कार
मुंबई, 25 नोव्हेंबर, 2022: ब्रिजस्टोन इंडियाच्या वतीने आज मोबिलिटी सोशल इंपॅक्ट अॅवॉर्डसच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा करण्यात आली. हे पुरस्कार सामाजिक सुधारणा क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान आणि पर्याय साधनांमार्फत दळणवळणविषयक शोध घेऊन मान्यता देतात आणि प्रचार करतात. पुरस्कार-प्राप्त विजेत्यांना तीन वर्गवारींत रू. 30 लाखांचे एकूण बक्षीस घरी घेऊन जाता येईल.
हे पुरस्कार तीन क्षेत्रांत प्रदान करण्यात येतात: उपलब्ध (एक्ससिबल), सुरक्षित (सेफ) आणि स्मार्ट दळणवळण पर्याय. पहिला भाग म्हणजे नाविन्यपूर्ण कल्पना ही आरोग्य रक्षा आणि पोषण, उपजीविका, शिक्षण आणि सामाजिक सहभागीता याकरिता चांगली उपलब्धता देते. दुसरा भाग म्हणजे सुरक्षित दळणवळण साधन पर्याय उपलब्ध होतात, जे संरक्षण आणि सहभागीतेला वृद्धिंगत करतात. तसेच उपलब्ध लिंगआधारित फूट भरून काढतात, आपत्ती उच्चाटन करतात आणि रस्ते सुरक्षा वाढवतात. तिसरा भाग म्हणजे, स्मार्ट दळणवळण पर्याय साधनं सकारात्मक सामाजिक परिणाम पेरतात. ज्यामुळे आपल्या ग्रामीण वस्तीत गरीबी निर्मूलन होते, जैवविविधतेचं संवर्धन होते आणि विकास साध्य होतो.
"ब्रिजस्टोनचे उद्दिष्ट लोकांच्या जगण्याच्या, हालचालींवर, काम करण्याच्या आणि खेळण्याच्या पद्धतींवर सकारात्मक प्रभाव पाडण्याचे आहे. राष्ट्राच्या विकासात दळणवळण महत्त्वाची भूमिका बजावते आणि त्याद्वारे समाजावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. या पुरस्कारांच्या माध्यमातून समाज सेवेत टिकाऊ दळणवळण पर्याय साधने वापरणाऱ्यांना ओळखण्याचे आमचे ध्येय आहे ज्यामुळे जीवनाचा दर्जा सुधारेल. मोबिलिटी सोल्यूशन्स (दळणवळण पर्याय साधने)मध्ये जागतिक नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केली असल्याने, नाविन्यपूर्ण उपाय तयार करण्यात आणि त्याच वेळी विविध समुदायांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कशाची आवश्यक आहे हे आम्हाला समजते. ब्रिजस्टोन मोबिलिटी सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड्सचे विजेते हे याचा पुरावा आहेत आणि अशा उदयोन्मुख शिलेदारांचा शोध घेतल्याचा आम्हाला अभिमान वाटतो”, ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पराग सातपुते म्हणाले.
मेंटॉर्स फाऊंडेशन, तासगाव, महाराष्ट्र यांचा "टू व्हील्स ऑफ होप - सायकल बँक प्रकल्प" विजेता यादीत सामील आहे. हा प्रकल्प ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळांपर्यंत पोहोचण्यासाठी अंतर आणि दळणवळण संबंधी आव्हाने सोडवण्यासाठी विकसित करण्यात आला. तसेच, या प्रकल्पामुळे आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासंदर्भातील समस्यादेखील सोडविण्यात आली. प्रत्येक 1,000 कुटुंबांमागे आशा (मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य सेवा कार्यकर्ता) कार्यकर्त्या उपलब्ध करून देण्यात येतात आणि त्यांना पायी फिरून कुटुंबांना गाठावे लागे. टू व्हील्स ऑफ होप’सह, आशाताई आता कुटुंबांपर्यंत वेळेत पोहोचू शकतात.
Comments
Post a Comment