होंडा कार्स इंडियाने आकर्षक आर्थिक योजना देण्यासाठी आयडीबीआय बँकेसोबत सामंजस्य करारावर केली स्वाक्षरी
होंडा कार्स इंडियाने आकर्षक आर्थिक योजना देण्यासाठी आयडीबीआय बँकेसोबत सामंजस्य करारावर केली स्वाक्षरी
- ग्राहकांना सर्वोत्तम मालकीहक्क अनुभव देण्याप्रती असलेल्या एचसीआयएलच्या कटिबद्धतेशी संलग्न
मुंबई, 25 नोव्हेंबर 2022: होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) या भारतातील अग्रगण्य प्रीमियम कार्सच्या उत्पादक कंपनीने ग्राहकांना अनेक आर्थिक योजना देण्यासाठी भारतातील आघाडीची खाजगी क्षेत्र बँक आयडीबीआय बँकेसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. एचसीआयएल व आयडीबीआय बँकेमधील या सहयोगामुळे ग्राहकांना होंडा कार मॉडेल्सच्या खरेदीवर विनासायास परवडणारे फायनान्सिंग पर्याय आणि योजनांचा लाभ घेता येईल. हा सहयोग ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याप्रती एचसीआयएल व आयडीबीआय बँकेच्या कटिबद्धतेची पुष्टी करतो.
या सहयोगाबाबत सांगताना होंडा कार्स इंडिया लि.चे विपणन व विक्रीचे उपाध्यक्ष श्री. कुणाल बहल म्हणाले, "आयडीबीआय बँकेसोबतचा सहयोग होंडाच्या सर्व ग्राहकांना सोईस्कर फायनान्सिंग सोल्यूशन्ससोबत सर्वोत्तम मालकीहक्क अनुभव व साह्य देण्याचा उपक्रम आहे. आम्ही सतत नाविन्यता आणण्याचा आणि होंडा कार्स इंडिया येथील ग्राहक अनुभव सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्याची सुरूवात पहिला टच पॉइण्ट - खरेदी अनुभवासह होते. आम्ही आमच्या होंडा कुटुंबामध्ये नवीन ग्राहकांचे स्वागत करण्यास आणि होंडा कारचे मालक बनण्याचा आनंद शेअर करण्यास उत्सुक आहोत.’’
आयडीबीआय बँकेचा एचसीआयएलसोबतचा सामंजस्य करार देशभरातील होंडाच्या अधिकाधिक ग्राहकांना जलद फायनान्सिंग सोल्यूशन देईल. लाभांमध्ये आकर्षक व्याजदर, कमी प्रक्रिया शुल्क, अधिक कर्ज रक्कम आणि अधिक परतावा कालावधी यांचा समावेश असेल. हा सहयोग उत्पादन व प्रक्रियांच्या संदर्भात सर्वोत्तम ग्राहक अनुभवाची खात्री देईल.
Comments
Post a Comment