ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स’चे 88% प्रीमियमवर बीएसई एसएमई बोर्सवर पदार्पण

 

ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स’चे 88% प्रीमियमवर बीएसई एसएमई बोर्सवर पदार्पण

कंपनी समभागाने गाठले 5% चे अप्पर सर्किट, समभाग रू 107.10 ने उंचावला

23 डिसेंबर, 2022: एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड ही पुणे येथे मुख्यालय असलेली देशातील पहिली ड्रोन स्टार्टअप असलेली कंपनी असून या कंपनीने बीएसई’च्या एसएमई बोर्सवर पदार्पण केले आहे. कंपनीचा समभाग 88 टक्के प्रीमियमवर रू. 52-52 प्रती समभाग इश्यू प्राइजहून अधिक रू. 102 वर सूचीबद्ध झाला.

सूचीबद्ध झाल्यानंतर कंपनी समभाग सर्किट ब्रेकरच्या 5% अप्पर लिमिटवर लागलीच कुलूपबंद झाला आणि रू. 107.10 समभाग उंचीपर्यंत पोहोचला. निवडक नफा किंमतीने समभाग नफा कमी करून रू. 96.90 च्या नीचांकापर्यंत पोहोचला आणि वेग गमाविण्याआधी पुन्हा ताळ्यावर आला. कंपनीने एकूण 26.92 लाख समभागांचा व्यापार केला आणि पहिल्या दिवशीची उलाढाल रू. 27.57 कोटींपर्यंत गेली.

ड्रोनाचार्य पब्लिक इश्यूला सर्वच वर्गवारीतील गुंतवणुकदारांकडून भरभरून प्रतिसाद लाभला असून कंपनीचा प्रारंभीक सार्वजनिक प्रस्ताव रू. 6,017 कोटींच्या बोलींसह 262 पेक्षा अधिक वेळा सबस्क्राईब करण्यात आला आहे.   

कॉर्पोरेट कॅपिटल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड हा या इश्यूचा एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर असून बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रार आहे.

प्रतीक श्रीवास्तव या स्टार्टअपचे संस्थापक असून त्याला बॉलिवूड सेलेब्रिटी आमीर खान, रणबीर कपूर तसेच बाजारातील नामवंत शंकर शर्मा यांचे पाठबळ आहे. याच्या आयपीओने हाय नेट-वर्थ इंडिवीज्यूअल्स (एचएनआय) आणि रिटेल गुंतवणुकदारांकडून ठोस मागणीचा अनुभव केला.

33 कोटी रुपयांच्या इश्यूमध्ये किरकोळ सबस्क्रिप्शन 330.75 पट ओव्हरसबस्क्राइब झाली, तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणी (NII) 388.71 वेळा बुक झाली आणि पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB) विभागाची 46.21 वेळा खरेदी झाली.

ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेडचा प्रारंभीक सार्वजनिक प्रस्ताव 13-15 डिसेंबर दरम्यान बीएसई एसएमई आयपीओ मंचावर सबस्क्रिप्शनसाठी खुला होता.

ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स प्रामुख्याने प्रशिक्षण, सेवा आणि पाळत ठेवण्याच्या व्यावसायिक त्रिसूत्रीवर उभे आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) या हवाई देखरेख यंत्रणेकडून रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (RPTO) परवाना प्राप्त करणार्‍या पहिल्या खाजगी खेळाडूंपैकी एक आहे. कंपनीने मार्च 2022 पासून 180 पेक्षा अधिक ड्रोन वैमानिकांना प्रशिक्षण दिले.

कंपनीने अनेक संक्षिप्त आणि उद्योग-संबंधित ड्रोन आणि GIS अभ्यासक्रम सुरू केले आहेत. जे तरुण भारतीयांना ड्रोन इकोसिस्टममध्ये नवीन-युगातील करिअर तयार करणे आणि सक्षम करण्यासाठी बनविण्यात आले आहेत. कंपनी सानुकूलित 100% स्वदेशी ड्रोनच्या निर्मितीत प्रवेश करण्याची योजना आखत असून जमीन आणि पाण्याखालील सर्वेक्षण सेवा देऊ करते, ज्यात पॉवरलाइन आणि उपयुक्तता, तेल आणि वायू पायाभूत सुविधा, खाणी आणि क्वॉरी, ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा, रस्ते आणि महामार्ग, शहरी आणि ग्रामीण नियोजन, कृषी आणि सिंचन, पाण्याखालील तपासणी आणि अंडरवॉटर बॅथिमेट्रीचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24