जेनवर्क्सद्वारे २५ शहरांमध्ये रोडशोजचे आयोजन

 जेनवर्क्सद्वारे २५ शहरांमध्ये रोडशोजचे आयोजन

~ इन विट्रो डायग्नोस्टिक्सबाबत जागरूकतेचा प्रसार ~


मुंबई, २७ डिसेंबर २०२२: जेनवर्क्स ही भारतातील अग्रगण्य डिजिटल वैद्यकीय व आरोग्यसेवा सोल्यूशन प्रदाता कंपनी स्वत:चे इन विट्रो डायग्नोस्टिक (आयव्हीडी) ऑफरिंग्ज दाखवण्यासाठी देशभरातील २५ शहरांमध्ये रोडशोजचे आयोजन करत आहे. कंपनी लवकर आजार निदानाच्या महत्त्वाला सांगते आणि आता आयव्हीडी विभाग लक्षणीयरित्या विकसित करण्याचा त्यांचा मनसुबा आहे. या रोडशोजसह कंपनीची अधिकाधिक डॉक्टर्स, पॅथोलॉजिस्ट्स व लॅब टेक्निशियन्सपर्यंत पोहोचण्याचे ध्येय आहे.

गर्भधारणा, रक्तातील ग्लुकोज आणि कोविड-१९ (बहुतांश) यांसह सर्व महत्त्वाच्या रक्त चाचण्या अभिकर्मकांच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. हा महत्त्वाचा पदार्थ आणि रक्त तपासणी यंत्रे आयव्हीडी परिसंस्थेचा अविभाज्य घटक आहेत. आत्तापर्यंत जेनवर्क्सने भारतातील अनेक प्रयोगशाळा आणि हॉस्पिटल्समध्ये २५०० आयव्हीडी सिस्टम्सचा पाया स्थापित केला आहे.

जेनवर्क्स येथील इक्विपमेंट, आयव्हीडीचे वरिष्ठ संचालक व प्रमुख श्री. सुब्रमण्यम आर. रोडशो उपक्रमाचे नेतृत्व करत आहेत. ते म्हणाले, ‘‘आम्ही मागील काही वर्षांमध्ये आमच्या सेवांमध्ये आयव्हीडी व्हर्टिकलची भर केली आहे आणि आता अधिकाधिक लोकांपर्यंत ही सेवा पोहोचण्याची योग्य वेळ आली आहे. हा रोडशो आम्ही देशभरात निर्माण केलेल्या सहाय्यक पायाभूत सुविधांसह आमच्या वैविध्यपूर्ण उपाययोजना व गुंतवणूका दाखवण्याची ब्रॅण्डिंग संधी आहे. हा रोडशो आम्हाला संबंधित शहरांमधील डॉक्टर्स, पॅथोलॉजिस्ट्स व टेक्निशियन्सशी संलग्न होण्यास आणि आमच्या दर्जात्मक उपाययोजना दाखवण्यास सक्षम करेल.’’

श्री. सुब्रमण्यम पुढे म्हणाले, ‘‘आम्ही दररोज जवळपास १०० अभ्यागतांपर्यंत पोहोचत आहोत आणि अनेकजण विक्री देखील करत आहेत. या रोडशोला दिल्लीमध्ये सुरूवात झाली आणि आतापर्यंत आम्ही दहा शहरांपर्यंत पोहोचलो आहोत. लोकांच्या मनामध्ये आयव्हीडी कंपनी म्हणून सत्यता व अधिकाराची छाप निर्माण करण्याची आमची मिशन आहे.’’

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE