गिफ्ट वॉर्म्थ: रिन्यू पॉवर भारतातील १० राज्यांमध्ये ३००,००० ब्लँकेट्सचे वाटप करणार
गिफ्ट वॉर्म्थ: रिन्यू पॉवर भारतातील १० राज्यांमध्ये ३००,००० ब्लँकेट्सचे वाटप करणार
~ रिन्यू पॉवरचे कर्मचारी स्थानिक प्राधिकरणांसोबत सहयोगाने राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये १८,००० ब्लँकेट्सचे वाटप करणार ~
मुंबई, भारत, डिसेंबर 2022: रिन्यू पॉवर या भारतातील अग्रगण्य रिन्यूएबल एनर्जी कंपनीने त्यांच्या ‘गिफ्ट वॉर्म्थ’ मोहिमेचे ८वे पर्व लाँच केले. या उपक्रमाच्या माध्यमातून कंपनी दिल्ली एनसीआर, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड आणि कर्नाटक या दहा राज्यांमध्ये ३००,००० ब्लँकेटचे वाटप करेल. ही महत्त्वाकांक्षी मोहिम डिसेंबर २०२२ मध्ये सुरु करण्यात आली आणि जानेवारी २०२३ पर्यंत सुरू राहील. यापैकी एकूण १८,००० ब्लँकेट्सचे वाटप राज्यातील बीड, परभणी, उस्मानाबाद, अमरावती, सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर या ८ जिल्ह्यांमध्ये केले जाईल.
यंदाच्या मोहिमेच्या लक्ष्यामध्ये मागील पर्वाच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, जेथे कंपनीने जवळपास २२०,०० ब्लँकेट्सचे वाटप केले. भारतातील वंचित, बेघर लोकांना हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण देण्यास मदत करण्यासाठी २०१५ मध्ये गिफ्ट वॉर्म्थची सुरूवात करण्यात आली. वितरण प्रक्रिया रिन्यू पॉवरच्या पवन व सौर प्लांट्समध्ये करण्यात येईल, जेथे रिन्यूचे कर्मचारी जिल्हा अधिका-यांसोबत सहयोग करतील, जे लक्ष्य जिल्ह्यांमधील लाभार्थींना ओळखतील. मोहिमेचा शुभारंभ जिल्हा स्तरावर समारंभपूर्वक केला जाईल आणि त्यानंतर काळजीपूर्वक निवडलेल्या ठिकाणी तहसील आणि गाव स्तरावर वितरण केले जाईल. या मोहिमेमुळे थेट लघु उद्योगांना मदत होते, ज्यांच्याकडून ब्लँकेट मिळवले गेले आहेत आणि यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मदत होते. कंपनीच्या कर्मचार्यांकडून आश्रयस्थानांना देणगी व रात्रीच्या मोहिमेदरम्यान ब्लँकेटचे वाटप केले जाईल.
या मोहिमेबाबत आपला आनंद व्यक्त करत रिन्यू पॉवरच्या चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर वैशाली निगम सिन्हा म्हणाल्या, ‘‘रिन्यूमध्ये आमचे गरजू समुदायांचे ऋण फेडणे हे ध्येय राहिले आहे आणि आम्हाला गिफ्ट वॉर्म्थच्या आठव्या, यशस्वी पर्वामध्ये या ध्येयाला पुढे घेऊन जाण्याचा अभिमान वाटतो. आपल्या देशाच्या काही प्रदेशांमध्ये अत्यंत कडक्याची थंडी असते, ज्यामुळे दरवर्षी आमच्या समाजाच्या वंचित व कमकुवत विभागांमधील अनेक लोकांना थंडीच्या प्रतिकूल परिणामांचा सामना करावा लागतो. आपण लक्षात घेतले पाहिजे की हवामान बदलाचा परिणाम होत आहे, जेथे आपण थोडा काळ पण कडाक्याच्या थंडीचा सामना करत आहोत. आम्हाला या उपक्रमामध्ये उत्कटतेने सामील झालेल्या आमच्या कर्मचा-यांचा अभिमान वाटतो आणि आम्ही स्थानिक प्राधिकरणांसोबत सहयोगाने काम करत अधिकाधिक लोकांना मदत करू. आगामी पर्वांमध्ये आमची वितरण आकडेवारी वाढवण्याचा आणि इतर कॉर्पोरेशन्सना अशाच प्रकारच्या मोहिमा राबवत आपल्या सहकारी नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यास प्रोत्साहित करण्याचा मनसुबा आहे.’’
गिफ्ट वॉर्म्थच्या माध्यमातून रिन्यू पॉवरचा २०२४ पर्यंत १ दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचण्याचा मानस आहे आणि या मोहिमेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या इतर कॉर्पोरेट्स व संस्थांना www.renewfoundation.in येथे दान करण्याच्या माध्यमातून योगदान देण्याचे आवाहन करत आहे.
Comments
Post a Comment