झायडेक्सच्या तंत्रज्ञानामुळे रस्ते झाले खड्डेमुक्त
17 जानेवारी, 2023 भारत : वडोदरास्थित झायडेक्स इंडस्ट्रीजने प्रचंड रहदारीचा भार आणि हवामानामुळे पडणाऱ्या भेगांचा प्रतिकार करण्यास सक्षम असणारे रस्ते बांधणीचे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे
बहुतेक रस्ते माती, वाळू, बिटुमेन आणि सिमेंटच्या मिश्रणाने बनलेले असतात ज्यात फक्त बिटुमेन जलरोधक असते. यामुळे रस्ते खराब होतात. कोरड्या आणि ओलसर आवर्तनामुळे रस्त्यांची क्षमता कमी होते. झायडेक्सने लवचिकता (नॅनो-पॉलिमर) सुधारून आणि लवचिक फुटपाथांसाठी बिटुमेनसाठी सुपर बॉन्डर्स तयार करून रस्त्यांची क्षमता वाढवलेली आहे.
झायडेक्स द्वारे तंत्रज्ञानाचा पहिला संच एकत्रितपणे जलरोधक बनवतो आणि त्यामुळे पाण्याला प्रतिरोधक असलेल्या त्वचेसारखा थर तयार होतो. हा थर खड्डे आणि भेगांना काढून टाकतो. तंत्रज्ञानाचा दुसरा संच सिलेन आणि नॅनो-पॉलिमरचा वापर करतो, जे थोड्या प्रमाणात माती, जीएसबी पाणी-प्रतिरोधक, सिमेंटसह एकत्र केल्यावर, रस्ते मजबूत बनवू शकतात. झायडेक्सने कमी पाण्याची गरज असणारी सिमेंट मिश्रणाची संपूर्ण श्रेणी देखील सादर केली आहे. ज्यामुळे सिमेंट काँक्रीटची घनता सुधारते आणि 90% च्या मर्यादेपर्यंत भेगांवर नियंत्रण राहते आणि पुढील पिढयांपर्यंत रस्ते वापरले जातात.
झायडेक्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय रांका म्हणाले, “जगभरातील अभियंते अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा उत्सुकतेने विचार करत आहेत जे किफायतशीर खर्चात शाश्वत फुटपाथ साकारण्यात मदत करू शकतील. असे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गेल्या 50 वर्षांत रस्ते कसे बांधले गेले आणि त्यांच्या अपयशाचे मुख्य कारण काय होते याच्या अनेक मूलभूत पैलूंची पुनर्मांडणी करणे आवश्यक आहे. झायडेक्स इंडस्ट्रीजमध्ये आम्ही ग्रामीण आणि शहरी स्तरावर ‘रस्त्यांप्रमाणे महामार्ग’ विकसित करण्याचा दृष्टीकोन जोपासत आहोत. महामार्ग बांधणीसोबतच, आमचे अनोखे माती स्थिरीकरण तंत्रज्ञान राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत विकास संस्था, ग्रामविकास मंत्रालय द्वारे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनासाठी अनेक राज्यांमध्ये (कारगिल ते ईशान्येपर्यंत) स्वीकारले गेले आहे 2015 पासून मार्च 2022 पर्यंत 1000 किमी केले आहे. झायडेक्स सिलेन नॅनोटेक्नॉलॉजी आधारित उत्पादन झायको थर्म त्याच्या अँटी-स्ट्रीप गुणधर्मामुळे आणि आर्द्रतेच्या नुकसानास वाढलेली प्रतिकारशक्ती यामुळे सर्व प्रमुख कंत्राटदारांची त्वरीत सर्वोच्च निवड बनली आहे. तसेच, आमच्या टेरासिल झायकोबॉन्ड कॉम्बोने सिमेंटसह बेस लेयर्सची एकूण गरज सरासरी 60% कमी केली आहे, चांगल्या कामगिरीसह.आम्ही देशभरात उच्च-गुणवत्तेचे रस्ते नेटवर्क तयार करण्यासाठी नवीन आणि अधिक प्रभावी तंत्रज्ञान विकसित करण्यास प्राधान्य देत आहोत.”
देशाच्या आर्थिक विकासात रस्ते महत्त्वाची भूमिका बजावतात. सरकारी आकडेवारीनुसार, चार, सहा आणि आठ पदरी राष्ट्रीय महामार्ग (NHs) च्या वार्षिक बांधकामाची गती गेल्या 7 वर्षांत 300% पेक्षा
जास्त वाढली आहे. मार्च 2019 च्या आकडेवारीनुसार देशातील एकूण रस्त्यांच्या नेटवर्कच्या 71.4% ग्रामीण रस्त्यांसह भारतामध्ये 6.2 दशलक्ष किलोमीटर लांबीचे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या रस्त्यांचे जाळे आहे. अशा प्रकारे दीर्घकालीन टिकाऊपणा सुधारण्यासाठी, देखभाल खर्च कमी करण्यासाठी आणि ग्रामीण, शहरी आणि राष्ट्रीय स्तरावर मजबूत पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी जल प्रतिरोधक रस्ते तयार करणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment