कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईने लॉन्च केला स्ट्रायकर माको नवी मुंबईमध्ये सर्वात प्रगत ऑर्थो रोबोट

 कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईने लॉन्च केला स्ट्रायकर माको 

नवी मुंबईमध्ये सर्वात प्रगत ऑर्थो रोबोट



31 जानेवारी 2023, नवी मुंबई: कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईने आपल्याकडील पहिली रोबोटिक-आर्म असिस्टेड सर्जिकल सिस्टिम स्ट्रायकर माकोचे क्लिनिकल लॉन्च करण्यात आल्याची घोषणा केली आहे. सांधे प्रत्यारोपण सर्जरीसाठी जगभरात वापरल्या जाणाऱ्या सर्वात प्रगत ऑर्थो-रोबोटिक तंत्रज्ञानांपैकी हे एक तंत्रज्ञान आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईचे कन्सल्टन्ट, ऑर्थोपेडिक्स डॉ सुभाष धिवरे यांनी आपल्या टीमसह या नवीन रोबोटिक सिस्टिमचा उपयोग करून दोन केसेसवरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. 


यूएस एफडीएने मान्यता दिलेल्या माको रोबोटिक सिस्टिममुळे खुबा, गुडघा यांचे संपूर्ण प्रत्यारोपण तसेच गुडघ्याचे आंशिक प्रत्यारोपण ज्या पद्धतीने केले जाते त्यामध्ये मोठी क्रांती घडवून आणली आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई हे सांधे प्रत्यारोपणासाठी सर्वात प्रगत तंत्रज्ञान, माको रोबोटिक सिस्टिम्स असलेले नवी मुंबईतील पहिले रुग्णालय आहे. जगभरात ५००,००० पेक्षा जास्त प्रक्रियांमध्ये यशस्वी सिद्ध झालेल्या माको स्मार्टरोबोटिक्सची शक्ती आता नवी मुंबईमध्ये उपलब्ध आहे. या प्रगत तंत्रज्ञानामध्ये थ्रीडी सीटी-बेस्ड प्लॅनिंग, ऍक्यूस्टॉप हॅपटिक तंत्रज्ञान आणि माहितीपूर्ण डेटा ऍनालिटिक्स यांना एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्र आणून रुग्णांना अनेक वेगवेगळे लाभ प्रदान केले जातात.


कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईचे कन्सल्टन्ट - ऑर्थोपेडिक्स डॉ सुभाष धिवरे यांनी सांगितले, "आज ऑर्थोपेडिक्स सर्जरी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विकास होत असल्याने मानवी हातांनी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत सांधे प्रत्यारोपण अधिक अचूक आणि निर्दोषपणे केले जाऊ शकते. माकोचे सीटी-बेस्ड प्लॅनिंग दुखापत झालेल्या सांध्याचे थ्रीडी मॉडेल तयार करते ज्यामुळे सर्जनला रुग्णाचा सांधा आणि तेथील दुखापत यांचे संपूर्ण दृश्य पाहायला मिळते. अशाप्रकारे सर्जनला प्रत्येक रुग्णासाठी एक व्यक्तिगत योजना तयार करता येते. हे खूप महत्त्वाचे आहे कारण प्रत्येक रुग्णाची सांधे संरचना वेगवेगळी असते आणि आर्थ्रायटिस किंवा सांध्यांना झालेल्या इतर दुखापतीमुळे सांध्यामध्ये अजून जास्त बदल झालेले असू शकतात."


त्यांनी पुढे सांगितले, "गुंतागुंतीच्या कठीण केसेसमध्ये हे खूप मोलाचे ठरते. त्यामुळे सर्जनला सांधे प्रत्यारोपण अतिशय अचूकपणे करता येते. दुखापत झालेल्या भागाच्या आजूबाजूला असलेल्या सर्वसामान्य उतींना जखमा होऊन गुंतागुंत होणे टाळले जाते. यातील हॅपटिक तंत्रज्ञानामुळे सर्जनना योजनेप्रमाणे अगदी अचूकपणे कापता येते, मऊ उतींना कमी नुकसान  पोहोचते आणि हाडे अधिक चांगली जपली जातात. यामधून रुग्णांना अजूनही अनेक लाभ मिळतात, कमीत कमी रक्तस्त्राव, शस्त्रक्रियेनंतर फार जास्त वेदना सहन कराव्या लागत नाहीत, पेनकिलर औषधे जास्त घ्यावी लागत नाहीत, रुग्णालयात कमी दिवस राहावे लागते, फिजिकल थेरपी सेशन्स कमी घ्यावी लागतात आणि रुग्ण आपली सर्वसामान्य कामे लवकरात लवकर सुरु करू शकतात."


कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईचे संचालक व प्रमुख डॉ बिपीन चेवले यांनी सांगितले, "रुग्णांच्या फायद्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित सुविधा, उपाययोजना आणण्यात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई कायम आघाडीवर असते. रोबोटिक सर्जिकल प्लॅटफॉर्म्सनी शस्त्रक्रियेच्या विश्वात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे, पारंपरिक सर्जरीच्या तुलनेत रुग्ण जास्त लवकर बरे होतात, गुंतागुंत कमी होते आणि शरीरावर शस्त्रक्रियेचे घाव, जखमा देखील कमी होतात. नवी मुंबईतील रुग्णांच्या फायद्यासाठी स्ट्रायकर माको प्रगत ऑर्थो-रोबोटिक तंत्रज्ञान सर्वात पहिल्यांदा आमच्याकडे आणले गेले आहे ही आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे.  कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईमध्ये सेंटर ऑफ एक्सेलेन्स फॉर बोन अँड जॉईंट केयरच्या विकासामध्ये हा अजून एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे."


हे क्लिनिकल लॉन्च करण्यात आल्यामुळे, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईने गुडघे व सांध्याच्या ८०% पेक्षा जास्त सर्जरी जागतिक दर्जाची स्ट्रायकर माको रोबोटिक-आर्म असिस्टेड सर्जिकल सिस्टिम वापरून करण्याचे ठरवले आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईमधील सेंटर फॉर बोन अँड जॉईंट सर्व वयोगटातील रुग्णांच्या स्केलेटल असामान्यतांना ठीक करण्यासाठी, प्रतिबंध घालण्यासाठी, त्यांचे निदान व त्यावर उपचार केले जावेत यासाठी समर्पित आहे. यामध्ये सांधे, हाडे, लिगामेंट्स, स्नायू, स्नायुबंध, त्वचा आणि मज्जातंतूंचे आजार यांचा समावेश आहे. या विभागामध्ये अत्याधुनिक पायाभूत सोयीसुविधा आहेत, याठिकाणी खांदे, पावले, हात, गुडघे, खुबा, मणका आणि खेळताना झालेल्या दुखापतींवर प्रगत ऑर्थोपेडिक उपचार पुरवले जातात.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24