कोटक सिक्युरिटीज आणि एक्सक्लुसिव्ह सिक्युरिटीज’च्या वतीने धोरणात्मक भागीदारी जाहीर
कोटक सिक्युरिटीज आणि एक्सक्लुसिव्ह सिक्युरिटीज’च्या वतीने धोरणात्मक भागीदारी जाहीर
इंदूर, 23 जानेवारी 2023: कोटक सिक्युरिटीज लिमिटेडने आज इंदूरस्थित एक्सक्लुसिव्ह सिक्युरिटीज या मध्य प्रदेशातील ब्रोकरेज फर्मसोबत धोरणात्मक भागीदारी करत असल्याचे जाहीर केले. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, राजस्थान, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांमध्ये या फर्मच्या ग्राहकांचा मोठा विस्तार आहे. या भागीदारीच्या माध्यमातून कोटक सिक्युरिटीज 30,000 पेक्षा जास्त गुंतवणूकदारांना आणि एक्सक्लुसिव्ह सिक्युरिटीजच्या ग्राहकांना आपली सेवा पुरवणार आहे.
या भागीदारीमुळे कोटक सिक्युरिटीज आणि एक्सक्लुसिव्ह सिक्युरिटीज या दोन्ही कंपन्यांना त्यांच्या देशभरातील ग्राहकांना तंत्रज्ञानावर आधारित गुंतवणूक उत्पादने आणि सेवा पुरवण्यासाठी मदत मिळणार आहे.
कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे एमडी आणि सीईओ जयदीप हंसराज म्हणाले, “एक्सक्लुसिव्ह सिक्युरिटीजसोबतच्या या भागीदारीच्या माध्यमातून सुमारे 30,000 गुंतवणूकदारांसोबत भागीदारी करण्यासाठी आणि त्यांना सेवा पुरवण्यासाठी आम्ही खरोखरच उत्सुक आहोत. आगामी काही महिन्यांत आम्ही सुरळीतरित्या एकत्रीकरणाची खातरजमा करून नव्याने जोडल्या गेलेल्या ग्राहकांसाठी सर्वोत्कृष्ट सेवा पुरवू. आमच्या संशोधन अंतर्दृष्टीने जलदगतीने व्यवहार करता यावा यासाठी अनेकविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशा खरेदी-विक्री (ट्रेडिंग) अॅपच्या माध्यमातून या भागीदारीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा प्रवास आणखी बळकट होईल.”
एक्सक्लुसिव्ह सिक्युरिटीज लिमिटेडचे अध्यक्ष बीडी भट्टर म्हणाले, “कोटक सिक्युरिटीजसोबत ही धोरणात्मक भागीदारी करून आम्ही आनंदी आहोत. कोटक हे बीएफएसआय विभागातील सर्वाधिक विश्वासार्ह नाव आहे. अनेक दशकांपासून दोन्ही कंपन्या व्यवसाय करत आहेत आणि आता त्या एकत्र आल्याने त्यांना ग्राहकांना 50 वर्षांपेक्षा जास्तीच्या प्रगाढ ज्ञानाचा अनुभव देता येऊ शकेल.”
एक्सक्लुसिव्ह सिक्युरिटीज लिमिटेडचे संचालक संजय सामैया म्हणाले, “कोटक सिक्युरिटीजसोबतच्या या भागीदारीतून बळकट तंत्रज्ञानासह उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीमध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने ग्राहकांकरीता अनेक संधी उपलब्ध होतील. दोन्ही कंपन्यांमधील भागधारकांसाठी ही सर्वच अर्थाने यशस्वी परिस्थिती आहे आणि उद्योगातील सर्वोत्कृष्ट पद्धतींच्या माध्यमातून एक्सक्लुसिव्ह समूहाला त्यांच्या ग्राहकांना संपत्ती निर्मितीसाठी सबळ करता येणे शक्य होईल.”
Comments
Post a Comment