Athwas" प्रदर्शन आणि व्यापारी मेळ्याचे मुंबईत आयोजन; जम्मू-काश्मीर, लडाख आणि महाराष्ट्रादरम्यान संपर्क पुर्नप्रस्थापित करण्याकडे लक्ष्य

 Athwas" प्रदर्शन आणि व्यापारी मेळ्याचे मुंबईत आयोजन; जम्मू-काश्मीर, लडाख आणि महाराष्ट्रादरम्यान संपर्क पुर्नप्रस्थापित करण्याकडे लक्ष्य  



मुंबई, मार्च 2023: “Athwas – जम्मू-काश्मीर-लडाख आणि महाराष्ट्रादरम्यानचा सामाजिक-आर्थिक मार्ग” असलेल्या प्रदर्शन आणि व्यापारी मेळ्याचे आयोजन 17 मार्च ते 22 मार्च दरम्यान मुंबईच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर’मध्ये करण्यात आले. या प्रदर्शनाचा उद्देश पुढीलप्रमाणे: 

महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर आणि लडाख दरम्यान संपर्क प्रस्थापित करणे

जम्मू-काश्मीर आणि लडाखचा सिनेमा चित्रीकरण स्थळं म्हणून प्रचार करणे 

महाराष्ट्राच्या कारखानदारांसह स्थानिक उद्योजकांचा संपर्क प्रस्थापित करून त्यांना संधी उपलब्ध करून देणे   

जम्मू-काश्मीर आणि लडाख संस्कृतीचा प्रचार 

जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये व्यापारी संधी विस्तारणे 

राष्ट्राच्या केंद्रस्थानांसमवेत संपर्क  

जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लडाख केंद्रशासित प्रदेश (जम्मू-काश्मीर आणि लडाख) पर्यटन, कृषी, फलोत्पादन आणि संबंधित क्षेत्रांमध्ये विकासाच्या अफाट संधी आहेत. या प्रदेशाला नैसर्गिक स्रोत, निसर्गरम्य सौंदर्य आणि अन्न प्रक्रिया, कृषी-आधारित उद्योग आणि पर्यटनासाठी अनुकूल परिस्थिती आहे. या संधींवर लक्ष ठेवून, जम्मू-काश्मीर, लडाख आणि महाराष्ट्र यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी या मेळ्याचे आयोजन करण्यात येते.

जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या विविध भागांतील 150 हून अधिक उद्योजक या मेळ्यात त्यांचे स्टॉल लावतील तसेच महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध उद्योगपतींशी संवाद साधतील. एआयसीटीई’च्या मदतीने, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी उपायांच्या अंमलबजावणीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे तरूण उद्योजकांमध्ये नवकल्पना आणि गती वाढवण्यासाठी सर्व संबंधित भागधारकांना एकत्र करण्याचा Athwas’चा मानस आहे.

या कार्यक्रमात बॉलीवूड सेलिब्रिटी आणि चित्रपट निर्माते यांचाही सहभाग असेल, जे जम्मू-काश्मीरमधील गुंतवणुकीला प्रोत्साहन देतील. जेणेकरून ते सिने-पर्यटनासाठी एक प्रमुख गंतव्यस्थान म्हणून विकसित होईल.

सहा दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात जम्मू आणि काश्मीर- लडाखच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा फॅशन शो, बिझनेस मीट आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाखचा फूड फेस्टिव्हल देखील सादर करण्यात येईल. खाली काही उल्लेख आहेत:

जम्मू-काश्मीरमधील खाद्यपदार्थ विशेष (वाझवान)

हस्तकला उत्पादनं (कागदी हस्तकला, लाकडी कोरीव काम, दगडी कोरीव काम, तांब्याची भांडी)

जम्मू-काश्मीर खाद्य उत्पादनं [केशर, अखरोड, जर्दाळू, स्ट्रॉबेरी, चेरी, प्लम, काश्मीरी बदाम, सुकं अंजीर  

हातमागाची उत्पादनं (गालिचे, नामदा, पश्मीना शाली, फेरन, कनी शाली)

"विविध पायाभूत सुविधा प्रकल्प विकसित करण्याच्या आणि विविध मंच आणि औद्योगिक शिखर परिषदांद्वारे देशी आणि परदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नांमुळे जम्मू आणि काश्मीर हे भारतातील एक प्रमुख गुंतवणुकीचे ठिकाण बनण्यास तयार आहे. तीन दशकं अविकसित असूनही, केंद्रशासित प्रशासन हे अंतर भरून काढण्यासाठी लक्षणीय प्रगती करत आहे आणि पायाभूत  सकारात्मक बदल सध्याच्या सन्माननीय राज्यपाल-नेतृत्वाखालील प्रशासनाच्या समर्पण आणि वचनबद्धतेचा पुरावा आहेत. आम्हाला आशा वाटते की "Athwas" कार्यक्रमामुळे जम्मू-काश्मीरमधील गुंतवणुकीबद्दल बाहेरील व्यापारी समुदायाच्या मनातील भीती आणि शंका दूर करण्याची संधी मिळेल”, असे श्री. गगन महोत्रा, अध्यक्ष, स्वागत समिती Athwas 2023 संचालक, ड्रीमवर्थ सोल्युशन्स म्हणाले. 

संवादाला चालना देण्यासाठी आणि संपर्क निर्मिती व उभारणीद्वारे व्यवसाय विस्तार सुलभ करण्यासाठी जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील उद्योजकांना त्यांच्या महाराष्ट्रातील समकक्ष घटकांसह एकत्र आणण्यासाठी "व्यवसाय संमेलन" आयोजित केले जाईल.

“नवीन गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या उद्योग आणि पर्यटनातील प्रमुख विकास क्षेत्रं आणि गुंतवणूकीच्या संधींचे प्रदर्शन करणे हा या प्रदर्शनाचा प्राथमिक उद्देश आहे. या भव्य कार्यक्रमात धोरणात्मक क्षेत्रीय सत्रं, तांत्रिक सादरीकरणं, भागीदारी, समोरासमोरील व्यवसाय बैठकी आणि इतर उपक्रम असतील. हे स्थानिक तसेच बाह्य व्यावसायिक समुदायांमधील संबंध वाढवण्यासाठी, प्राथमिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि तरुणांसाठी दुय्यम आणि सहायक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ म्हणून काम करेल”, जम्मू आणि काश्मीर प्रदेश विकास, पीएआरसी- प्रमुख श्रीमती रुचिता राणे म्हणाल्या.

गुलशन फाऊंडेशन या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र सरकार तसेच सहयोगी घटकांच्या सहकार्यासह करणार आहे, ज्यात महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही देशांतील मानद पाहुण्यांचा समावेश असेल. 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24