महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी करत आहे सक्षम फेडेक्स एक्सप्रेस

 महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी करत आहे सक्षम फेडेक्स एक्सप्रेस

फेडेक्स कमी उत्पन्न गटातील २९० हून अधिक महिलांच्या स्वतःच्या मालकीच्या छोट्या व्यवसायांना पाठबळ देऊन स्त्री-पुरुष समानते बाबतची बांधिलकी मजबूत करत आहे

 

मुंबई१४ मार्च २०२३: फेडेक्स कॉर्प. (NYSE: FDX) ची उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस वाहतूक कंपनी असलेली फेडेक्स एक्सप्रेस (FedEx) युनायटेड वे मुंबई (UWM) सह सक्षम उपक्रमाद्वारे मुंबईतील २९० हून अधिक महिला लघु उद्योजिकांना त्यांच्या उद्योगांचा विस्तार करण्यासाठी मदत करत आहे.

 

या उपक्रमाद्वारे कौशल्य असलेल्या परंतु निधीच्या अभावी आपले छोटे व्यवसाय वाढवू शकत नसलेल्या कमी-उत्पन्न गटातील महिलांना 'सक्षम किटमिळते. या महिला घरगुती सौंदर्य सेवाटेलरिंग आणि घरगुती उत्पादने विक्री असे विविध क्षेत्रांतील व्यवसायांचे प्रतिनिधित्व करतात. त्यासाठीचा पुरवठा हा प्रत्येक लाभार्थीच्या गरजेनुसार ठरवला जातो. त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठीत्यांचा उत्पादन वेळ कमी करण्यासाठी आणि त्यांना अधिक ग्राहकांची पूर्तता करण्यात मदत करण्यासाठी नवीनतम तंत्रज्ञान साधने यात समाविष्ट आहेत.

 

मॅकिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या विश्लेषणानुसारभारतातील महिला कर्मचार्‍यांच्या वाढत्या सहभागामुळे जागतिक जीडीपीमध्ये ७०० अब्ज अमेरिकी डॉलरची भर पडू शकते. या स्टार्ट-अपमध्ये अधिक सर्वसमावेशक कार्यसंस्कृती आहे आणि पुरुषांपेक्षा तिप्पट महिलांना रोजगार आहे. शिवायपुढील पाच वर्षांत महिलांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांमध्ये ९०% वाढ होण्याची अपेक्षा आहे. [1]

 

"केवळ आपल्या कामाच्या ठिकाणीच नाही तर आम्ही ज्या समाजात सेवा करतो तिथेही स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करणे हा विविधतासमानता आणि सर्वसमावेशकता यासाठीच्या आमच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे. हा आमच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि सगळे टीम सदस्यग्राहक आणि समाज या सर्वांसाठी एक चांगले भविष्य निर्माण करण्याकरता एक महत्त्वाचा व्यवसाय विचार आहे," असे FedEx Express चे ऑपरेशन्स-इंडियाचे उपाध्यक्ष सुवेन्दू चौधरी म्हणाले. "हा कार्यक्रम महिला उद्योजक आणि लहान व्यवसायांना नवीन शक्यता शोधण्यासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी आवश्यक साधनांसह सुसज्ज करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग आहे."

 

UWM चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जॉर्ज आयकारा म्हणाले, "प्रोजेक्ट सक्षमला याची जाणीव आहे की महिला उद्योजकांना सक्षम बनवण्याने केवळ कुटुंबात परिवर्तन घडून येते असे नाही तर समतोल सामाजिक विकासातही त्यामुळे सखोल योगदान दिले जाते. स्वतःचा व्यवसाय चालवूनमहिला त्यांचे क्षितिज वाढवू शकतातग्राहक आणि पुरवठादारांशी संवाद साधू शकतात आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये आणि समाजामध्ये नेतृत्वाची भूमिका घेऊ शकतात. आम्हाला अभिमान आहे की आमच्या अनेक महिला उद्योजिका त्यांच्या घरात आणि समाजात मुलींसाठी शिक्षण आणि पोषणाच्या संधी सुधारण्यासाठी पुरस्कर्त्या झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आमचे ध्येय साध्य करण्यात आम्हाला मदत करण्यात FedEx च्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत."

 

FedEx ने २०२१ मध्ये ४०० महिलांना पाठिंबा देऊन सुरुवात केली आणि त्यानंतर २०२३ मध्ये ही संख्या ९५० पेक्षा जास्त महिलांवर पोहोचली.

 

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202