रेकॉर्ड लेबल आणि प्रख्यात गायक, संगीतकार यांनी केली ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी

रेकॉर्ड लेबल आणि प्रख्यात गायक, संगीतकार यांनी केली ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी

भारताच्या संगीत क्षेत्रातील मातृसंस्था इंडियन म्युझिक इंडस्ट्री (आयएमआय) चे सदस्य आणि भारतातील गायकांच्या स्वामित्व हक्कांसाठी लढणारी इंडियन सिंगर्स राईट्स असोसिएशन (आयएसआरए)च्या सदस्यांमध्ये एक ऐतिहासिक करार करण्यात आला आहे. या करारानुसार संपूर्ण भारतातील गायक आणि संगीतकार तसेच म्युझिक कंपन्या संगीत क्षेत्रातील लाभ वाटून घेणार आहेत. या दोन्ही संस्थांच्या सदस्यांनी या ऐतिहासिक कराराचे एकमताने स्वागत केले आहे.

भारतीय संगीत क्षेत्र आणि गायक तसेच संगीतकाराप्रती आपला संपूर्ण पाठिंबा दिल्याप्रकरणी या दोन्ही संस्थांच्या सदस्यांनी वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांचे आभार मानत त्यांची प्रशंसा केली. श्री. गोयल आणि डीपीआयआयटी सोबत काम करण्यास उत्सुकताही दर्शवली आहे. भारतीय संगीत क्षेत्राला प्रोत्साहन आणि बळ देण्यासाठी पंतप्रधानांनी संपूर्ण सहकार्य देऊ केले आहे. त्यांच्या सहकार्यामुळे डिजिटल पायरसीला आळा बसून संगीत क्षेत्राच्या कॉपीराईटला मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

इंडियन सिंगर्स राइट्स असोसिएशनचे अध्यक्ष पद्मश्री अनुप जलोटा यांनी या प्रसंगी आनंद व्यक्त करत म्हटले की, मी भारत सरकारचे आणि पियुष गोयल यांचे आभार मानतो. त्यांच्या पाठिंब्याशिवाय ऐतिहासिक कराराचा हा दिवस उजाडलाच नसता. भारतीय संगीत क्षेत्राला शुभेच्छा देत मी अशी आशा व्यक्त करतो की, हा करार संपूर्ण संगीत उद्योगासाठी फायदेशीर ठरेल.

आयएमआयचे चेअरमन आणि सारेगामा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम मेहरा यांनी सांगितले की, संगीत ही भारताची मोठी सॉफ्ट पॉवर आहे. भारतीय संगीत उद्योग जागतिक शक्ती बनावा यासाठी या क्षेत्रातील सगळ्यांचे सहकार्य महत्वाचे आहे. जेव्हा संगीतकार, गीतकार आणि म्युझिक कंपन्या एकत्र काम करतात तेव्हा त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात.

भारतीय गायक हक्क संघटनेचे संस्थापक, संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय टंडन यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, म्युझिक कंपन्या आणि कलाकार अखेर एकत्र येताना पाहून आनंद होत आहे. ही मैत्री संपूर्ण संगीत उद्योग क्षेत्राला उच्च पातळीवर नेण्यासाठी समृद्ध करेल, हा ऐतिहासिक करार सर्वांसाठी संगीतमय ठरेल, यात शंका नाही.

आएमआयचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ब्लेझ फर्नांडिस यांनी सांगितले की, हा ऐतिहासिक करार भारतीय संगीत उद्योगासाठी जगातील शीर्ष १० बाजारपेठांमध्ये स्वतःला पुढे नेण्यासाठी वाढीचे इंजिन ठरेल, जेव्हा संगीत क्षेत्रातील सर्वजण एकत्र काम करतात तेव्हा एक माधुर्य घडते आणि हे जागतिक स्तरावर घडलेले आहे.


Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202