३१ मार्च २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि आर्थिक वर्षाचे ऑडिटेड आर्थिक निकाल


३१ मार्च २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि आर्थिक वर्षाचे ऑडिटेड आर्थिक निकाल



तमिळनाड मर्कंटाइल बँक लि. (टीएमबी) या प्रसिद्ध आणि खासगी क्षेत्रात बऱ्याच काळापासून कार्यरत असलेल्या बँकेचे मुख्यालय थुथुकडी येथे असून त्यांना १०० वर्षांपेक्षा जास्त काळाचा अनुभव लाभलेला आहे. दमदार पाया आणि सातत्याने मिळवलेला नफा ही बँकेच्या कामकाजाची खास वैशिष्ट्ये आहेत.

टीएमबीच्या पॅन भारतातील १७ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशात मिळून ५३० शाखा आणि १२ प्रादेशिक कार्यालये आहेत व त्यांच्या माध्यमातून ५ दशलक्ष ग्राहकांना सेवा दिली जात आहे.

तमिळनाड मर्कंटाइल बँक लि. च्या संचालक मंडळाने २४ एप्रिल २०२३ रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत ३१ मार्च २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि आर्थिक वर्षाच्या ऑडिटेड आर्थिक निकालांना मान्यता दिली. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एस. कृष्णन यांनी निकाल जाहीर केले. यावेळी प्रमुख आर्थिक अधिकारी, व्यवस्थापक आणि बँकेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बँकेच्या कामगिरीची वैशिष्ट्ये

गेल्या १० वर्षांतील सर्वोत्तम

आर्थिक वर्ष २०२२- २०२३ ची कामगिरी

 बँकेच्या ठेवी रू. ४७,७६६ कोटींपर्यंत वाढल्या आहेत (आधीच्या वर्षातील याच कालाधीत ४४,९३३ कोटी रूपये)

 बँकेच्या कर्जाची पातळी रू. ३७,५८२ कोटींपर्यंत वाढली असून विकास दर ११.३६ टक्के इतका आहे.

 कार्यकारी नफा ३१ मार्च २०२३ रोजी रू. १५७३ कोटींवर गेला असून ३१ मार्च २०२२ संपलेल्या आर्थिक वर्षात तो १५१६ कोटी रुपये होता.

 ३१ मार्च २०२३ रोजी निव्वळ नफा रू. १०२९ कोटींवर गेला असून ३१ मार्च २०२२ संपलेल्या आर्थिक वर्षात तो ८२२ कोटी रुपये होता. वार्षिक पातळीवर त्यात २५.८ टक्के चा विकास दर नोंदवण्यात आला आहे.

 निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) ३१ मार्च २०२३ रोजी रू. २०९४ पर्यंत गेला असून (३१ मार्च २०२२ रोजी तो १८१५ कोटी रुपये होता) त्यात १५.३७ टक्के विकास दर नोंदवण्यात आला आहे.

 मालमत्तेवरील परतावा १.९७ टक्के आणि इक्विटीवरील परतावा १६.७८ टक्के आहे. (आधीच्या वर्षात अनुक्रमे १.६६ टक्के आणि १६.५८ टक्के)

 बँकेचे नेट वर्थ वाढून ६९२८ कोटींवर (आधीचे वर्ष ५३३६ कोटी रुपये) गेला असून त्यात रू. १५९२ कोटींची वाढ झाली आहे व २९.८४ टक्क्यांचा विकास दर नोंदवण्यात आला आहे.

 एकूण एनपीएची एकूण कर्जाशी टक्केवारी १.३९ टक्क्यांवर गेली आहे आणि निव्वळ एनपीए ०.६२ टक्के आहे. (आधीच्या वर्षात अनुक्रमे १.६९ टक्के आणि ०.९५ टक्के अनुक्रमे)

 बँकेचे प्रोव्हिजन कव्हरेज गुणोत्तर ९०.९० टक्क्यांपर्यंत वाढले आहे (आधीचे वर्ष ८७.९२ टक्के)

चौथी तिमाही आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील कामगिरी

 मार्च २३ अखेर संपलेल्या तिमाहीत – कासा गेल्या तिमाहीच्या तुलनेत ६.८८ टक्क्यांनी वाढला आहे.

 चौथ्या तिमाहीतील एकूण ठेवी गेल्या तिमाहीच्या तुलनेत ११.२५ टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत ८.९७ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

 बँकेचे कर्ज आर्थिक वर्ष २०२२- २३ च्या चौथ्या तिमाहीत गेल्या तिमाहीतील स्थितीवरून ८ टक्क्यांनी वाढले आहे, तर आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या स्थितीवरून ११.३६ टक्क्यांनी वाढले आहे.

 आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीतील निव्वळ व्याज उत्पन्न आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील याच कालावधीच्या तुलनेत ७.९९ टक्क्यांनी वाढले आहे.

 आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीतील २५३.०५ कोटी रुपये निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील याच कालावधीच्या तुलनेत ११.४५ टक्क्यांनी जास्त आहे.

लाभांश शिफारस

 संचालक मंडळाने १०० टक्के लाभांशाची शिफारस केली आहे (ज्यापैकी ५० टक्के मार्च २३ मध्ये अंतरिम लाभांश म्हणून देण्यात आला आहे)

नवे उपक्रम

 आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये २१ शाखा सुरू करण्यात आल्या. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये आणखी ५० सुरू करण्याची योजना आहे.

 मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, चोला एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि कोटक जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याशी विमा उत्पादनांसाठी करार करण्यात आला.

 बँक डिजिटल स्थित्यंतर घडवून आणत असून २०२३- २४ मध्ये व्यवसाय प्रक्रियेचे पुनर्रचना केली जाणार आहे.


Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24