कर्नाटक सरकारने देऊ केले जगातील सर्वात मोठे ड्रोन-आधारित पार्सल मॅपिंग कंत्राट

 कर्नाटक सरकारने देऊ केले जगातील सर्वात मोठे ड्रोन-आधारित पार्सल मॅपिंग कंत्राट 

मुंबई,28 जून 2023: अग्रगण्य जिओस्पेशियल संस्था अल्टेरा (Allterra) आणि निओजिओ (NeoGeo) यांनी कर्नाटक सरकारकडून काढण्यात आलेल्या एका खुल्या निविदेच्या माध्यमातून आजवरचे सर्वात मोठे ड्रोन आधारित लॅण्ड पार्सल मॅपिंग कंत्राट संयुक्तपणे मिळविले आहे. या प्रकल्पामध्ये ६८,००० चौ. किमी भूक्षेत्र आणि गदग, कोप्पल, कोडागु, चामराजनगर, चिकमंगळूरू (चिकमंगळूर), विजयपुरा (बिजापूर), यादगीर, रायचूर, बिदर, कलबुर्गी (गुलबर्गा) अशा कर्नाटकातील १० जिल्ह्यांचा संपूर्ण भूभाग समाविष्ट असणार आहे. या ऐतिहासिक प्रकल्पासाठी आपला टेक्नोलॉजी पार्टनर म्हणून एरीओ (पूर्वीचे नाव आरव अनमॅन्ड सिस्टीम्स) ची निवड केली आहे.  

या प्रकल्पाअंतर्गत ५ सेंमी प्रती पिक्सलहून अधिक चांगली सुस्पष्टता असलेले नकाशे तयार करण्याच्या दृष्टीने उच्च-रेझोल्युशनच्या प्रतिमा घेण्यासाठी सुमारे ६० सर्व्हेक्षण दर्जाचे PPK ड्रोन्स तैनात करण्याचे उद्दीष्ट आखण्यात आले आहे. हा प्रकल्प आपल्या संपूर्ण तयारीनिशी सुरू होईल तेव्हा ड्रोन्सचा ताफा एकाच दिवसात सरासरी सुमारे १,७५,००० एकरांच्या क्षेत्राचे मानचित्रण अर्थात मॅपिंग करत असेल. त्याचबरोबर सर्व्हे सेटलमेंट आणि लॅण्ड रेकॉर्डस् (SSLR)  विभागाकडून डिजिटल लॅण्ड पार्सल मॅप्स तयार करण्यासाठीही या ऑर्थो-रेक्टिफाइड इमेजेस (ORIs) चा वापर केला जाणार आहे. हे डिजिटल नकाशे जमीन मालकीशी संबंधित नोंदी व ग्राउंड ट्रूथिंगचे तपशील अद्ययावत करण्याच्या आणि राज्यभरात पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्याच्या कामी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. 

अल्टेरा हा भूअवकाशीय क्षेत्रातील एक नावाजलेला आणि CORS, GNSS यांसारख्या पोझिशनिंग तंत्रज्ञानाच्या वापराचा विपुल अनुभव असलेला ब्रॅण्ड आहे, जो या क्षेत्रातील सर्व प्रकारच्या आवश्‍यक गरजा पूर्ण करतो. अल्टेरा भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रगत साधनांचा वापर सर्वेक्षण व मॅपिंगसाठी करतो. 

निओजिओ टेक्नोलॉजीज देशातील स्पेशियल डेटा कॅप्चर, डेटा मॉडेलिंग आणि अॅप्लिकेशन्ससंदर्भातील आवश्‍यक गरजा पूर्ण करणाऱ्या काही अग्रगण्य कंपन्यांपैकी एक असून मोठे सरकारी प्रकल्प अंमलात आणण्याचा २० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव कंपनीकडे आहे. अचूक GIS मॅपिंग तंत्रज्ञान तैनात करण्यातील आपली कुशलता आणि अनुभवीपण निओजिओने सिद्ध केले आहे. 

एरिओे (aereo) ही एक ड्रोन सोल्यूशन्स पुरविणारी कंपनी असून तिच्याकडे मालकी हक्क आणि अद्ययावत तंत्रज्ञान आहे. गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून एरीओने हरियाणा राज्यातील २५,००० चौ. किमी हून अधिक जमिनीचे यशस्वीपणे मॅपिंग केले आहे. एरीओने गेल्या दशकभरामध्ये अत्यंत प्रगत बौद्धिक मालमत्तांची (IP) उभारणी केली आहे. यातून त्यांनी जवळ-जवळ १५ हून अधिक पेटन्ट्ससाठी अर्ज केले आहेत व भारताचा पहिलावहिला DGCA- मान्यताप्राप्त सर्व्हे ग्रेडचा PPK ड्रोन तयार केला आहे. या प्रकल्पासारख्या अत्यंत उच्च क्षमतेची मागणी करणाऱ्या कामासाठी एरीओकडून सुमारे उच्च तांत्रिक कौशल्य असलेल्या सुमारे २५० जणांची मोठी टीम घेतली जाणार आहे. यात २१० ड्रोन पायलट्स, DGSP सर्व्हेयर्स आणि प्रकल्प समन्वयकांचा समावेश असणार आहे. 

हे कंत्राट जिंकल्याबद्दल अस्टेराचे एमडी प्रदीप राठोड म्हणाले, “अद्ययावत GIS आणि सर्व्हे तंत्रज्ञानाचा वापर करून जगाच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये परिवर्तन घडून आणण्याचे अल्टेराचे ध्येय आहे. या प्रकल्पाच्या साथीने भारत भूअवकाशीय डेटा संकलन, प्रक्रिया आणि अंमलबजावणीच्या एका नव्या युगामध्ये प्रवेश करत आहे. उच्च रेझोल्युशन प्रतिमा आणि अचूक डेटा मिळविण्यासाठी एअरो ड्रोन उपाययोजनांचा वापर करत आम्ही विविध उद्योगक्षेत्रांसाठी अत्यंत उपयुक्त अशा मालमत्ता निर्माण करण्याच्या कामी मदत करणार आहोत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा डेटा संपूर्ण कर्नाटक राज्यातील विकासकामांना वेग देईल आणि त्यामुळे प्रशासनाचे कामकाज तंत्रज्ञानदृष्ट्या अधिक प्रगत आणि सुलभ होईल.”

एरीओचे सह-संस्थापक आणि सीईओ विपुल सिंग म्हणाले, “भारतासाठी व ड्रोन उद्योगक्षेत्रासाठी हा एक मोलाचा टप्पा ठरू शकेल असा प्रकल्प आहे या प्रभावशाली प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये अल्टेरा आणि निओजिओसारख्या संस्थांना पाठबळ पुरवित असल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील जमीन नोंदींच्या डिजिटायझेशन प्रक्रियेला गती द्यायची असेल तर त्यासाठी बृहद स्तरावरील मानचित्रण अर्थात लार्ज स्केल मॅपिंग ही काळाची गरज आहे. आमच्या ड्रोन उपाययोजनांच्या माध्यमातून आमच्या पार्टनर्सच्या कामात अत्यंत मोलाचे योगदान पुरविणे आणि कर्नाटक सरकारला विविध क्षेत्रांतील कामकाजात उपयुक्त ठरतील असे अल्ट्रा-हाय रेझोल्युशन डिजिटल सर्व्हे मॅप तयार करण्यास सक्षम बनविणे हे आमचे लक्ष्य आहे. वर्षभर चालणाऱ्या या सहयोगाविषयी आणि आपले निर्धारित काम पूर्ण करून देण्यास आम्ही अत्यंत उत्सुक आहोत.”


Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24