होंडा कार्स इंडियाकडून मिड-साइज एसयूव्ही होंडा एलीव्हेटच्या उत्पादनाला सुरूवात
होंडा कार्स इंडियाकडून मिड-साइज एसयूव्ही होंडा एलीव्हेटच्या उत्पादनाला सुरूवात
जुलै ३१, २०२३: होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) यास भारतातील प्रिमिअम कार्सच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने आज त्यांची नवीन मिड-साइज एसयूव्ही होंडा एलीव्हेटच्या उत्पादनाला सुरूवात केली. राजस्थानमधील तापुकारा येथील कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन केंद्रामध्ये कारच्या उत्पादन शुभारंभासह भारत या जागतिक एयसूव्हीचे उत्पादन करणारा पहिला देश बनला. मेक इन इंडियाप्रती होंडाची कटिबद्धता अधिक दृढ करत एलीव्हेटचे ९० टक्क्यांहून अधिक स्थानिक पातळीवर उत्पादन करण्यात येत आहे.
ऑल-न्यू होंडा एलीव्हेट सप्टेंबर २०२३ मध्ये लाँच करण्यात येणार असून डिलिव्हरींना देखील सुरूवात होईल. कंपनीने एलीव्हेटच्या प्री-लाँच बुकिंग्जना देखील सुरूवात केली आहे.
याप्रसंगी आपले मत व्यक्त करत होंडा कार्स इंडिया लि.चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ताकुया त्सुमुरा म्हणाले, ''आजचा दिवस आमच्या एसयूव्ही प्रयत्नामधील मोठा टप्पा आहे, जेथे आम्ही भारतातील आमच्या तापुकारा केंद्रामध्ये बहुप्रतिक्षित होंडा एलीव्हेटच्या उत्पादनाला सुरूवात केली आहे. जागतिक स्तरावर अनावरण करण्यात आल्यापासून एलीव्हेटला देशभरातील ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आम्हाला एलीव्हेटचे मास उत्पादन सुरू करणारा पहिला देश असण्याचा अभिमान वाटतो. तसेच आम्हाला विश्वास आहे की, भारत देश लवकरच आमच्या व्यवसायासाठी महत्त्वाचा आधारस्तंभ बनेल, ज्यामुळे ग्राहकांसोबतचे नाते अधिक प्रबळ होईल आणि आमच्या होंडा कुटुंबामध्ये नवीन सदस्यांची भर होईल. आम्ही आगामी उपस्थिती आणि या मॉडेलचा आमच्या ब्रॅण्डवर होणाऱ्या परिणामाबाबत उत्सुक आहोत.''
एलीव्हेट होंडाची मिड-साइज एसयूव्ही विभागातील नवीन ऑफरिंग आहे. या वेईकलमध्ये बोल्ड व मस्क्युलाइन एक्स्टीरिअर डिझाइनसह आकर्षक फ्रण्ट फेस, शार्प कॅरेक्टर लाइन्स व अद्वितीय रिअर डिझाइन आहे, जे एकत्रितपणे रस्त्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेणारी वेईकल निर्माण करतात.
होंडाचे डिझाइन तत्त्व मॅन मॅक्झिमम मशिन मिनिममवर आधारित एलीव्हेटमध्ये अविश्वसनीयरित्या एैसपैस जागा असलेली इंटीरिअर केबिन, उच्च दर्जाचे व्हीलबेस, एैसपैस हेडरूम, नी रूम, लेगरूम आणि ४५८ लीटरची मोठी कार्गो स्पेस (सामानाची जागा) आहे.
एलीव्हेटमध्ये १.५ लिटर आय-व्हीटेक डीओएचसी पेट्रोल इंजिनसह ६ स्पीड एमटीसाठी डिझाइन केलेले व्हीटीसी आणि कन्टिन्युअस्ली व्हेरिएबल ट्रान्समिशन (सीव्हीटी)ची शक्ती आहे. हे इंजिन ४३०० आरपीएममध्ये ८९ केडब्ल्यू (१२१ पीएस) शक्ती आणि १४५ एनएमच्या अधिकतम टॉर्कची निर्मिती करते.
होंडाच्या सुरक्षिततेप्रती अविरत कटिबद्धतेचा भाग म्हणून एलीव्हेटमध्ये अॅक्टिव्ह व पॅसिव्ह सेफ्टी टेक्नॉलॉजीजच्या व्यापक श्रेणीसह होडा सेन्सिंगची अॅडवान्स्ड ड्रायव्हर असिस्टण्ट्स सिस्टम (एडीएएस) आहे.
एलीव्हेटमध्ये कनेक्टेड कार अनुभव होंडा कनेक्टचे वैशिष्ट्य आहे, जे वापरकर्त्यांना दुरून कारवर नियंत्रण ठेवण्यास आणि सुधारित सोयीसुविधेसाठी महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन्ससह अद्ययावत माहिती मिळण्यास मदत करते.
एलीव्हेट ग्राहकांच्या विविध पसंती व आवडींची पूर्तता करण्यासाठी सिंगल-टोन व ड्युअल-टोन व्हेरिएण्ट्ससह आकर्षक रंगसंगतीच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात येईल. या पर्यायांमध्ये फिनिक्स ऑरेंज पर्ल (नवीन रंग), ऑब्सिडियन ब्ल्यू पर्ल, रेडियण्ट रेड मेटलिक, प्लॅटिनम व्हाइट पर्ल, गोल्डन ब्राऊन मेटलिक, लुनार सिल्व्हर मेटलिक आणि मेटेरॉईड ग्रे मेटलिक या रंगांचा समावेश आहे, जे व्हिज्युअली आकर्षक लुक तयार करण्यासोबत रस्त्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेतात.
Comments
Post a Comment