पिनॅकल इंडस्ट्रीजने आणली वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन्ससाठी प्रगत आसन व्यवस्था, प्रवाशांचा आराम आणि सुरक्षितता ह्यांमध्ये सुधारणा
पिनॅकल इंडस्ट्रीजने आणली वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन्ससाठी प्रगत आसन व्यवस्था, प्रवाशांचा आराम आणि सुरक्षितता ह्यांमध्ये सुधारणा
पिनॅकल इंडस्ट्रीज या भारतातील वाहन अंतर्गत रचना, आसन प्रणाली, ईव्ही सुटे भाग आणि स्पेशॅलिटी वाहने आदींचे उत्पादन करणाऱ्या आघाडीच्या कंपनीने, भारतीय रेल्वेच्या निवडक वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन्ससाठी प्रगत आसन व्यवस्था आणल्याचे, अभिमानाने, जाहीर केले आहे. व्यावसायिक वाहन आसनव्यवस्था, अंतर्गत रचना व सुट्या भागांच्या उद्योगातील बिनतोड ज्ञान व कौशल्यामुळे, पिनॅकल रेल्वे आसन विभागाने, सुरक्षितता व आरामदायीपणाच्या जागतिक मानकांची पूर्तता करणाऱ्या भारतातील प्रमाणित रेल्वे आसनव्यवस्थेच्या रचना, इंजिनीअरिंग व उत्पादनात विशेष कौशल्य प्राप्त केले आहे.
नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर 12-14 ऑक्टोबर 2023 या काळात भरणाऱ्या आगामी इंटरनॅशनल रेल्वे इक्विपमेंट एग्झिबिशनच्या (आयआरईई) पंधराव्या पर्वात, आपली अनेकविध उत्पादने व तंत्रज्ञाने प्रदर्शनासाठी ठेवणार असल्याचेही, कंपनीने जाहीर केले
पिनॅकल इंडस्ट्रीजच्या नवीन आसान व्यवस्थेतील सर्वसमावेशक श्रेणीमध्ये, रेल्वे प्रवासांदरम्यान अद्वितीय आराम, सुरक्षितता व अखंडतेची भावना देणाऱ्या, इकोनॉमी, एग्झिक्युटिव, टिप-अप आणि फोल्डिंग सीट्सचा समावेश होतो. इकोनॉमी सीट्सची रचना हुशारीने करण्यात आली असून, सिंगल-सीटर, टू-सीटर व थ्री-सीटर असे वेगवेगळ्या आसन क्षमतांचे पर्याय यात आहेत. प्रवाशांच्या सोयीला सर्वाधिक प्राधान्य आहे. प्रत्येक आसनाला मोड्युलर प्रकारचे चार्जिंग युनिट देण्यात आले आहे. जेणेकरून, प्रवाशांना प्रवासादरम्यान उपकरणांचे चार्जिंग करणे व त्याद्वारे बाहेरील जगाशी जोडलेले राहणे शक्य होईल. शिवाय, एर्गोनॉमिक पद्धतीने डिझाइन केलेल्या सीट फोनमुळे प्रवासादरम्यान आवश्यक तो आधार व आराम मिळतो. तसेच आसन अनुभव अधिक चांगला होण्यासाठी दबावाचे मॅपिंगही विचारात घेण्यात आले आहे.
पिनॅकल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुधीर मेहता ह्यांनी या लक्षणीय घटनेबद्दल उत्साह व्यक्त केला. ते म्हणाले, "आमच्या प्रगत आसन उत्पादनांचे अनावरण भारतातील वंदे भारत ट्रेन्ससाठी करणे आमच्यासाठी रोमांचक अनुभव आहे. या महत्त्वपूर्ण घटनेमुळे, प्रवाशांच्या सुरक्षितता व आरामाला प्राधान्य देणारी तसेच सौंदर्यपूर्ण उत्पादने निर्माण करण्यातील व ती योग्य ठिकाणी पोहोचवण्यातील आमचे अविचल समर्पण अधिक दृढ झाले आहेच पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे रेल्वे आणि अन्य क्षेत्रांसाठी नवोन्मेषकारी, किफायतशीर व टिकाऊ जागतिक दर्जाची उत्पादने डिझाइन व उत्पादित करण्याप्रती आमच्या आशावादावर प्रकाश टाकला गेला आहे. रेल्वे क्षेत्राच्या भारतातील व जगभरातील, प्रचंड वाढीच्या संभाव्यतेवर आमचा विश्वास आहे. नवीन युगातील, वेगवान ट्रेन्स सर्वांचे लक्ष वेधून घेत असतानाच, अधिक सुरक्षित, अधिक आरामदायी व दिसण्यास आकर्षक आसनांची मागणीही चढी आहे. आम्ही बाजारात आणत असलेल्या प्रत्येक उत्पादनाच्या माध्यमातून ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतो. ही नवीन आसन व्यवस्था प्रवाशांना अधिक सुधारित व आनंददायी प्रवास अनुभव देईल आणि उद्योगक्षेत्रात एक नवीन मापदंड स्थापन करेल असे आम्हाला वाटते. ”
Comments
Post a Comment