रेनॉकडून भारतात 'रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज' लाँच

 रेनॉकडून भारतात 'रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज' लाँच 

उपक्रम प्रिमिअम 'शोरूम ऑन व्‍हील्‍स' आणि 'वर्कशॅप ऑन व्‍हील्‍स'च्‍या देशव्‍यापी कव्‍हरेजसह ग्राहकांना रेनॉचा अद्भुत अनुभव देणार 

अनपेक्षित व अद्वितीय उपक्रम भारतभरातील ग्राहकांना रेनॉ ब्रॅण्‍ड अनुभव देणार 

मोहिम २६ राज्‍यांमधील ६२५ ठिकाणी सर्वोत्तम रेनॉ वेईकल विक्री व सेवा अनुभव मिळण्‍याची खात्री देते 

'वर्कशॉप ऑन व्‍हील्‍स' ग्राहकांना एकसंधी व विनासायास कार सेवा सोल्‍यूशन्‍स देईल, ज्‍यामुळे रेनॉचे ५३० हून अधिक टचपॉइण्‍ट्सचे विद्यमान प्रबळ सेवा नेटवर्क अधिक दृढ होईल 

रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज ग्राहकांना एक थांबा सोल्‍यूशन प्रदान करण्‍यासाठी सर्व ठिकाणी ऑन स्‍पॉट टेस्‍ट ड्राइव्‍ह, बुकिंग व फायनान्‍स पर्याय प्रदान करेल 



मुंबई, २६जुलै २०२३: - रेनॉ इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड (आरआयपीएल) या भारतातील पहिल्‍या क्रमांकाच्‍या युरोपियन कार ब्रॅण्‍डला त्‍यांची ट्रेलब्‍लेझिंग मोहिम 'रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज'च्‍या लाँचची घोषणा करण्‍याचा अभिमान वाटतो. हा नाविन्‍यपूर्ण व सर्वोत्तम उपक्रम भारतीयांच्‍या ब्रॅण्‍डशी संलग्‍न होत अनुभव घेण्‍याच्‍या पद्धतीला पुनर्परिभाषित करण्‍याची खात्री देतो. 

रेनॉ २६ राज्‍ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमधील ६२५ ठिकाणी या देशव्‍यापी मोहिमेचा भाग म्‍हणून दोन अपवादात्‍मक उपक्रम: 'शोरूम ऑन व्हिल्‍स' आणि 'वर्कशॉप ऑन व्‍हील्‍स' सादर करेल. या ऐतिहासिक मोहिमेअंतर्गत प्रथमच भारतीय बाजारपेठेत असे उपक्रम सादर करण्‍यात येत आहेत, ज्‍यामधून देशामध्‍ये रेनॉसाठी उल्‍लेखनीय परिवर्तनाची सुरूवात झाली आहे.  

'रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज' मोहिमेमधून रेनॉची नाविन्‍यता आणि ग्राहक-केंद्रित्वाप्रती कटिबद्धता दिसून येते. 'शोरूम ऑन व्‍हील्‍स'च्‍या माध्‍यमातून ग्राहकांना घरपोच शोरूम अनुभव देत आणि 'वर्कशॉप ऑन व्‍हील्‍स'सह सोईस्‍कर व कार्यक्षम वेईकल सर्विसिंग देत रेनॉचा भारतीय ग्राहकांना अद्वितीय व आनंददायी अनुभव देण्‍याचा उद्देश आहे. यासह रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज सर्व ६२५ ठिकाणी ऑन स्‍पॉट टेस्‍ट ड्राइव्‍ह, बुकिंग व कार फायनान्‍स पर्याय देखील देईल, ज्‍यामुळे ते ग्राहकांसाठी एक थांबा सोल्‍यूशन असेल. 

रेनॉ इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड (आरआयपीएल) येथील सेल्‍स मार्केटिंगचे उपाध्‍यक्ष श्री. सुधीर मल्‍होत्रा या उपक्रमाबाबत आपला उत्‍साह व्‍यक्‍त करत म्‍हणाले, ''आम्‍हाला रेनॉच्‍या धोरणामध्‍ये अत्यंत महत्त्वाचा असलेला देश भारतात 'रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज' मोहिम लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. या अद्वितीय उपक्रमामधून अपेक्षांपलीकडे जाणारे ग्राहक-केंद्रित अनुभव निर्माण करण्‍याप्रती आमची समर्पितता दिसून येते. 'शोरूम ऑन व्‍हील्‍स' व 'वर्कशॉप ऑन व्‍हील्‍स' उपक्रमांसह आमचा अडथळ्यांना दूर करत देशाच्‍या कानाकोपऱ्यामधील ग्राहकांपर्यंत पोहोचण्‍याचा, तसेच भारतीयांसोबतचे आमचे नाते प्रबळ करण्‍याचा मनसुबा आहे.''  

मायदेश फ्रान्‍समध्‍ये विक्री आकारमानाच्‍या संदर्भात अव्‍वलस्‍थानी असलेल्‍या आणि युरोपमध्‍ये दुसरे स्थान मिळवलेल्‍या रेनॉच्‍या मायदेशातील सर्वोत्तम कामगिरीमधून ब्रॅण्‍डची सर्वोत्तमता व सातत्‍यपूर्ण नाविन्‍यतेप्रती कटिबद्धता दिसून येते. लाँच करण्‍यात आलेली मोहिम 'रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज' रेनॉ इंडियाच्‍या विकास धोरणामधील पुढील टप्‍प्‍याला सादर करते, जेथे कंपनी भारतीय बाजारपेठेत मोठा प्रभाव निर्माण करण्‍यासाठी आपल्‍या यशस्‍वी धोरणांचा फायदा घेते.  

'शोरूम ऑन व्‍हील्‍स' रेनॉच्‍या शोरूम्‍सचे मोबाइल विस्‍तारीकरण म्‍हणून सेवा देईल, ज्‍यामधून संभाव्‍य ग्राहकांना आधुनिक रेनॉ वेईकल्‍स जवळून पाहण्‍याची व अनुभव घेण्‍याची संधी मिळेल. तज्ञ विक्री कर्मचारी सविस्‍तर माहिती सांगण्‍यासाठी आणि ग्राहकांना योग्‍य निवड करण्‍यामध्‍ये साह्य करणसाठी उपस्थित असतील. 

दुसरीकडे, 'वर्कशॉप ऑन व्‍हील्‍स' उपक्रम ग्राहकांना घरपोच रेनॉ वेईकल्‍सची देखरेख व सर्विसिंगची खात्री देईल. अत्‍याधुनिक साधनांसह सुसज्‍ज आणि उच्‍च कुशल टेक्निशियन्‍सद्वारे कार्यान्वित हे वर्कशॉप्‍स देशभरातील रेनॉ मालकांना अद्वितीय सोयीसुविधा व कार्यक्षमता देतील. 

शोरूम ऑन व्‍हील्‍समध्‍ये रेनॉचे मॉडेल्‍स जसे वैविध्‍यपूर्ण ट्रायबर, स्‍पोर्टी कायगर आणि स्‍टायलिश क्वाइड यांच्‍या इंटरअॅक्टिव्‍ह प्रदर्शनाचा समावेश असेल, ज्‍यामुळे अभ्‍यागतांना रेनॉचे आधुनिक नवोन्‍मेष्‍कार, सुरक्षितता वैशिष्‍ट्ये व अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव मिळण्‍यासोबत त्‍यांच्‍या सोईनुसार त्‍यांच्‍या आवडत्‍या मॉडेल्‍सची टेस्‍ट ड्राइव्‍ह करता येईल. रेनॉ ट्रायबर भारतातील सर्वात सुरक्षित मास सेगमेंट ७-आसनी वेईकल आहे आणि या वेईकलमध्‍ये उल्‍लेखनीय दर्जा, मॉड्युलॅरिटी आणि आकर्षक डिझाइनसह उच्‍च दर्जाचे व्‍हॅल्‍यू पॅकेजिंग आहे. तसेच रेनॉ ट्रायबरच्‍या सर्व वैशिष्‍ट्यांमध्‍ये विभागातील ६२५ लीटरची सर्वात मोठी बूट स्‍पेस (सामानाची जागा) आहे. ही वेईकल उत्तम दर्जाच्‍या सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह निर्माण करण्‍यात आली आहे 

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202