पलाडिअन पार्टनर्सची महत्त्वाकांक्षी विस्तार योजना, भारतातल्या ३० नव्या शहरांवर लक्ष

 पलाडिअन पार्टनर्सची महत्त्वाकांक्षी विस्तार योजना, भारतातल्या ३० नव्या शहरांवर लक्ष



मुंबई, 17 ऑगस्ट 2023- पलाडिअन पार्टनर्स ह्या भारतीय स्थावर मालमत्ता क्षेत्रातल्या नामांकित कंपनीने आपली उद्योग विस्तार योजना जाहीर केली असून देशभरातल्या आणखी ३० शहरांमध्ये विस्तार करण्याचा त्यांचा मनोदय आहे. गेल्या काही वर्षांत मिळवलेल्या अतुलनीय यशाच्या बळावर कंपनीने स्थावर मालमत्ता सल्लागार ब्रँड म्हणून आपले स्थान अधिक बळकट बनवण्याचे कंपनीचे ध्येय आहे. वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये कार्य करणारा आणि खऱ्या अर्थाने सर्व प्रकारचे तोडगे देणारा ब्रँड बनण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

२०२०च्या उत्तरार्धात स्थापना झाल्यापासून पलाडिअन पार्टनर्सने उत्तम कामगिरी केली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात कंपनीने उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. या आर्थिक वर्षामध्ये कंपनीचा विक्रीचा आकडा १०५० कोटी इतका प्रभावी असून ६२०० कोटी मूल्याचे प्रकल्प हाती घेतले जाणार आहे. सकारात्मक वाढ नोंदवण्याच्या दृष्टीने कंपनीची वाटचाल सुरू झाल्याचे या आकड्यांवरून स्पष्ट होते.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांमध्येच पलाडिअन पार्टनर्सनी मोक्याच्या जागी असणाऱ्या ५.१७ लाख चौ. फूट क्षेत्रफळाच्या स्थावर मालमत्तांची विक्री केली आहे. येत्या काळात काही महत्त्वाचे लाँचेस होणार असून या अद्वितीय कामगिरीने कंपनीच्या विस्तार योजनेला अधिक बळ मिळवून दिले आहे.

सध्या भारतातल्या १६ शहरांमध्ये पलाडिअन पार्टनर्स कार्यरत आहे. कंपनीला या सर्व भागांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे, ज्याची दखल संपूर्ण स्थावर मालमत्ता क्षेत्र घेईल. ‘स्थानिक ज्ञान आणि जागतिक कौशल्य यावर आमचा दृष्टिकोन आधारित आहे. त्यामुळे आम्ही कार्यरत असणाऱ्या सर्व बाजारपेठांच्या अभिनव गरजा आम्ही नीटपणे जाणून घेऊ शकतो. दरवर्षी विक्रीचा आकडा दुप्पट करणे हे आमच्या ध्येय आहे. यातून शाश्वत वाढ आणि ग्राहक समाधानाप्रतीची आमची कटिबद्धता दिसून येईल,’ असे पलाडिअन पार्टनर्सचे श्री. कमल शहा म्हणाले.

चॅनल पार्टनर नेटवर्क प्रस्थापित करण्यावर भर देऊन विस्तारकार्याला सुरुवात होईल. एकट्या मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये (एमएमआर) पलाडिअनने १९००० हून अधिक चॅनल पार्टनर्सशी (सीपी) हातमिळवणी केली आहे. हेच प्रारूप देशभरात अवलंबिले जाणार आहे ज्यामुळे एक केंद्रीय नेटवर्क बनेल ज्याद्वारे स्थावर मालमत्तांशी संबंधित सर्व प्रकारच्या गरजांवर तोडगे दिले जातील

पलाडिअनचा अत्युत्कृष्टतेचा ध्यास हा त्यांच्या कार्यपद्धतींमध्येही विस्तारलेला दिसतो. कंपनीतर्फे केले जाणारे प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन केले जाणारे संशोधन हा त्यांच्या प्रकल्पांचा पाया असतो जेणेकरून प्रत्येक स्थानाचे अभिनवत्व त्या त्या प्रकल्पामध्ये झिरपावे. कामाप्रती जोरकस निष्ठा असल्याने पलाडिअन हळूहळू मार्केट रिसर्च टीमची स्थापना करत आहे जी उद्योगाशी संबंधित डेटाबेस आणि ज्ञान गोळा करेल, जेणेकरून आपल्या कार्यक्षेत्राला अमूल्य ज्ञान देता येईल.

सध्या कंपनीचे लक्ष्य प्रामुख्याने देशव्यापी विस्तारावर असले तरी पलाडिअन पार्टनर्सच्या महत्त्वाकांक्षा त्याहून उच्च आहेत. कंपनीला भौगोलिक मर्यादा मोडून भारतीय सीमांपलिकडे आपले कार्यक्षेत्र न्यायचे आहे. सीमा आणि काळाच्या पुढे जाणारा एक नवा वारसा कंपनीला निर्माण करायचा आहे आणि सर्व स्थावर मालमत्ता सल्लागार गरजांसाठीचे एकमेव डेस्टिनेशन अशी आपली ओळख निर्माण करायची आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE