सिंगापूर टुरिझम बोर्डाने MX Player सोबत भागीदारी करून 'लॉस्ट अँड फाऊंड इन सिंगापूर' हा इंटरॅक्टिव्ह चित्रपट सादर केला

 सिंगापूर टुरिझम बोर्डाने MX Player सोबत भागीदारी करून 'लॉस्ट अँड फाऊंड इन सिंगापूर' हा इंटरॅक्टिव्ह चित्रपट सादर केला



प्रेक्षकांना आता भारतीय ओ.टी.टी प्लॅटफॉर्मवर चित्रपटासाठी आपला आवडता शेवट निवडण्याची अनोखी संधी आहे. हा चित्रपट 25 ऑगस्ट 2023 पासून MX Player वर विनामूल्य स्ट्रीम होणार आहे

भारत, 23 ऑगस्ट 2023: सिंगापूर टुरिझम बोर्ड (एस.टी.बी) आणि MX Player ची कंटेंट शाखा, MX Studios यांच्या सहकार्याने भारतीय ओ.टी.टी प्लॅटफॉर्मवर इंटरॅक्टिव्ह चित्रपटाचे अनावरण करणार आहे. 'लॉस्ट अँड फाऊंड इन सिंगापूर' असे या अभिनव चित्रपटाचे नाव असून, सिंगापूरच्या पार्श्वभूमीवर उलगडणाऱ्या कथानकाला सक्रिय आकार देण्यासाठी प्रेक्षकांना आमंत्रण देणारा हा अभिनव चित्रपट आहे.

'एनटीओ'ने भारतातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम राबविलेला हा चित्रपट सिंगापूरच्या व्यक्तिरेखेची व्याख्या करणाऱ्या घटकांना टिपतो आणि त्याचे मिश्रण करतो. एंगेजमेंटसाठी ट्रिगर अखंडपणे एकत्रित करणे, इंटरॅक्टिव्ह घटक एक मनोरंजक अनुभवाचे आश्वासन देतो. हे सहकार्य विशेषत: तरुण भारतीय प्रवाशांमध्ये विकसित होत असलेल्या आवडीनिवडींची पूर्तता करते. प्रेक्षक ट्रॅव्हल कंटेंटशी जोडले जाण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग शोधत असताना 'लॉस्ट अँड फाऊंड इन सिंगापूर' अगदी ताजी पण पहिल्यांदा अनुभवायला मिळणारी प्रेरणा देते. सक्रिय सहभागातून प्रेक्षक सिंगापूरच्या आकर्षणांशी जोडले जातात, मनोरंजन आणि एक्सप्लोरेशन ची वीण एकमेकात गुंफतात. हा चित्रपट जसा प्रेक्षकांना सशक्त बनवतो, तसेच सिंगापूर गंतव्यस्थानाचे अद्वितीय सार दाखवत सामान्य क्षणांचे विलक्षण अनुभवांमध्ये रूपांतर करते. सिंगापूरचे पर्यायी कथानक आणि पैलू शोधण्यासाठी हा चित्रपट पुनः पाहण्यास प्रोत्साहित करतो.

MX Studios ओरिजिनल 'लॉस्ट अँड फाऊंड इन सिंगापूर' या चित्रपटात एक अंतर्मुख सोलो ट्रॅव्हलर (ऋत्विक धनजानी) आणि मैत्रीचा पुरस्कार करणारी साहसशोधक मुलगी (अपूर्वा अरोरा) यांचा प्रवास गुंतागुंतीचा आहे. सिंगापूरची प्रतिष्ठित स्थळे आणि लपलेली रत्ने यांच्यामध्ये त्यांचे भवितव्य प्रेक्षकांच्या हातात आहे. प्रेक्षक त्यांच्या निवडींना मार्गदर्शन करतात, वैविध्यपूर्ण मार्ग आणि अद्वितीय पाहण्याचा अनुभव तयार करतात. हे इमर्सिव्ह सहकार्य तरुण भारतीय प्रेक्षकांसाठी, मनोरंजनाची आणि नवीन प्रवास प्रेरणांची सांगड घालते. जू चियाट आणि कातोंग मार्गे वेस्पा साइडकार टूर, नोन्यास, बाबा आणि पेरानकान्सचे एक्स्पलोरेशन, मंडाई वन्यजीव अभयारण्यातील आईस्क्रीम संग्रहालय, डिझाइन ऑर्चर्ड आणि बर्ड पॅराडाईज सारखे एकत्रित अनुभव आधुनिक एक्सप्लोरर्सशी अखंडपणे जुळवून घेणारे टेक्सचर्ड एक्सप्लोरेशन प्रदान करतात.

येथे ट्रेलर पाहा: https://drive.google.com/file/d/1nSxThnZeGCJ8wn4TTfLQnUF-Lt6BOR4m/view?usp=drivesdk

सिंगापूर टुरिझम बोर्डाचे भारत, मध्य पूर्व, दक्षिण आशिया आणि आफ्रिका विभागाचे प्रादेशिक संचालक जी.बी श्रीथर म्हणाले, “ MX Player सोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. आज या क्षेत्रातील अग्रगण्य जीवनशैली केंद्र म्हणून, सिंगापूर एक सतत विकसित होणारे गंतव्यस्थान आहे आणि ही गतिशीलता तितक्याच नाविन्यपूर्ण माध्यमांद्वारे सुजाण भारतीय ग्राहकांना उत्कृष्टरित्या दर्शविली जाते. आम्हाला विश्वास आहे की ही भागीदारी सिंगापूरचा एक नवीन दृष्टीकोन सादर करते आणि तरुण भारतीय प्रवाशांना पर्यटनाच्या अनोख्या अनुभवांची ओळख करून देतो. नाविन्यपूर्ण प्रवास एंगेजमेंट, प्रेरणादायक वैयक्तिक प्रवास करू इच्छिणाऱ्या भारतीय प्रेक्षकांशी इंटरॅक्टिव्ह फॉरमॅटमुळे घनिष्ट संबंध जुळतात. ज्याप्रमाणे हा चित्रपट प्रेक्षकांना सशक्त बनवतो, त्याचप्रमाणे सिंगापूर सामान्य क्षणांचे विलक्षण अनुभवांमध्ये रूपांतर करते आणि गंतव्यस्थानाची अनोखी व्याख्या करणारी ऑफर प्रदर्शित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेवर जोर देते.

MX Player च्या प्रवक्त्याने सांगितले की, "आमचे प्रेक्षक नेहमीच एम.एक्स प्लेअरवर डायनॅमिक आणि गेम चेंजिंग स्टोरीटेलिंग शोधत असतात. सिंगापूर टुरिझम बोर्डाने 'लॉस्ट अँड फाऊंड इन सिंगापूर' या इंटरॅक्टिव्ह शॉर्टफिल्मची निर्मिती केली असून, स्टोरीटेलिंगला नवा आयाम देणारा हा अनोखा लघुपट आहे. आम्ही प्रेक्षकांना एक आकर्षक सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी उत्सुक आहोत कारण यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडीचे कथानक सक्रियपणे निवडता येईल आणि या चित्रपटाच्या माध्यमातून सिंगापूरच्या समृद्ध गंतव्य अनुभवांचा विलक्षण खजिना देखील दर्शविला जाईल.

दिग्दर्शक हर्ष देडिया यांचा अनुभवी हात आणि लेखक कनिष्क सिंह देव यांच्या सर्जनशील दृष्टीकोनातून प्रेरित हा चित्रपट एक अविस्मरणीय अनुभव देणारा आहे. 'लॉस्ट अँड फाऊंड इन सिंगापूर' हा चित्रपट त्याच्या इंटरॅक्टिव्ह घटकासाठी ओळखला जातो, ज्यामुळे प्रेक्षकांना कथानकात सक्रियपणे सहभागी होण्याचे प्रोत्साहन मिळते. 25 ऑगस्ट 2023 पासून, केवळ MX Player वर "लॉस्ट अँड फाऊंड इन सिंगापूर" च्या विनामूल्य स्ट्रीमिंगचा आनंद घ्या!

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE