कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये क्रांतिकारी सर्जरी करून अतिशय दुर्मिळ जायन्ट स्पायनल ट्युमर यशस्वीपणे काढण्यात आला
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये क्रांतिकारी सर्जरी करून अतिशय दुर्मिळ जायन्ट स्पायनल ट्युमर यशस्वीपणे काढण्यात आला
~ २००० घन सेमी म्हणजेच एका अंड्यापेक्षा तीस पट मोठा असलेला स्पायनल ट्युमर १० व्हर्टेब्रल लेव्हल्सवर विस्तारलेला होता
मुंबई, 25 ऑक्टोबर, 2023: कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईने वैद्यकशास्त्र आणि समन्वय या दोन्हींमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावत, २४ वर्षे वयाच्या रुग्णाच्या शरीरातून अविश्वसनीय, दुर्मिळ आणि अवाढव्य असा ग्रेड २ मायक्सोपॅपिलरी एपेन्डीमोमा ट्यूमर यशस्वीरित्या काढून टाकल्याची घोषणा केली आहे. २००० घन सेमी आकाराचा, एका अंड्यापेक्षा तीस पट मोठा ट्युमर १० व्हर्टेबल लेव्हल्सवर पसरलेला होता. अशा प्रकारचे ट्युमर २० लाखांमध्ये फक्त एकाच व्यक्तीमध्ये आढळून येतात. ही सर्जरी पाच दिवसांत तीन महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये करण्यात आली. या तीन टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या सुपर- स्पेशालिटीजनी दररोज आठ तासांपेक्षा जास्त वेळ काम करून सर्जरी यशस्वी करून दाखवली.
मायक्सोपॅपिलरी एपेन्डीमोमा हा एक दुर्मिळ प्रकारचा स्पायनल ट्यूमर आहे, जो प्रामुख्याने फिलम टर्मिनलमध्ये, म्हणजे पाठीच्या कण्याला पायथ्याशी स्थिर करणाऱ्या, तंतुमय ऊतकांच्या नाजूक स्ट्रॅन्डमध्ये होतो. हे ट्यूमर एपेंडीमल पेशींपासून उद्भवतात, या पेशी पाठीच्या कण्याच्या मध्यवर्ती कालव्याला जोडतात आणि सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (CSF) चे उत्पादन आणि प्रवाह नियंत्रित करतात, तसेच मेंदूच्या चयापचय आणि टाकाऊ पदार्थ साफ करण्याच्या प्रक्रियेवर देखील परिणाम करतात. ट्युमरच्या जागी वेदना होणे, सुन्नपणा येणे आणि अर्धांगवायू अशी याची लक्षणे जाणवतात जी ट्यूमरचा आकार आणि स्थान यावर अवलंबून असतात.
ही सर्जरी पाच दिवसांत तीन महत्त्वाच्या टप्प्यांत करण्यात आली. तीन टप्प्यांमध्ये विविध सुपर स्पेशालिटीजनी त्यांच्या कौशल्याचा यशस्वी वापर केला व इच्छित परिणाम घडवून आणले.
सर्वात पहिली अँटेरियर स्टेज, ज्यासाठी डॉ. मंदार नाडकर्णी, कन्सल्टन्ट, सर्जिकल ऑन्कोलॉजी, हेड - ब्रेस्ट ऑन्कोलॉजी आणि सर्जन - कोलोरेक्टल ऑन्कोलॉजी; डॉ. अत्तार इस्माईल, कन्सल्टन्ट, यूरोलॉजी आणि रेनल ट्रान्सप्लांट सर्जन; आणि डॉ. रघुराम शेखर, कन्सल्टन्ट, वस्क्युलर आणि एंडोव्हस्कुलर सर्जरी या तज्ञांनी काम केले.
दुसरी पोस्टरिअर स्टेज, जिचे नेतृत्व डॉ. मनित गुंदवडा आणि डॉ. अभय कुमार यांनी केले. अंतिम टप्पा रिकन्स्ट्रक्शनचा होता, ज्यामध्ये डॉ. काझी गझवान अहमद, कन्सल्टन्ट, प्लास्टिक सर्जरी यांनी सॉफ्ट टिश्यूना रिकन्स्ट्रक्ट केले. डॉ. राजेश मिस्त्री, डायरेक्टर, ऑन्कोलॉजी; डॉ. अभय कुमार, हेड, न्यूरोसर्जरी आणि कन्सल्टन्ट, मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरी; आणि डॉ. मनित गुंदवडा, कन्सल्टन्ट, ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी यांच्यासमवेत प्रक्रियेची बारकाईने योजना करण्यासाठी ट्यूमर बोर्ड तयार करण्यात आला.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईचे सीईओ आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ संतोष शेट्टी यांनी सांगितले, "आमच्या हॉस्पिटलमध्ये फुल टाइम स्पेशालिस्ट सिस्टीम (FTSS) मॉडेल आहे आणि तोच सर्वात मोठा फायदा आहे, त्यामुळेच अशा प्रकारच्या गंभीर शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आहे. रुग्ण-केंद्रित दृष्टिकोन ठेवून दुर्मिळ आणि अत्यंत जटिल ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी प्रक्रिया करणे सहयोगी सांघिक दृष्टिकोनामुळे शक्य झाले. प्रचंड आव्हानात्मक असून देखील स्पायनल ट्यूमर काढून टाकण्यात यश मिळाले. हे यश कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील वैद्यकीय टीमच्या कौशल्य, समर्पण आणि एकत्र मिळून समन्वयपूर्वक केलेल्या प्रयत्नांची साक्ष आहे.”
प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची होती, रुग्णाची तब्येत स्थिर राहावी यासाठी भूलतज्ञ, अतिदक्षता पथक आणि रक्तपेढी यांचे व्यापक साहाय्य आवश्यक होते. सर्जरीदरम्यान तीस युनिट्सपेक्षा जास्त रक्त किंवा रक्त उत्पादने वापरली गेली.
Comments
Post a Comment