Honasa Consumer Limited चा आयपीए 31 ऑक्टोबर 2023 पासून होणार खुला, वित्त वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत कंपनी आली फायद्यात

 


Honasa Consumer Limited चा आयपीए 31 ऑक्टोबर 2023 पासून होणार खुला, वित्त वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत कंपनी आली फायद्यात 


प्रति शेअर किंत 308 रुपये ते 324 रुपये एवढी असून दर्शनी मूल्य 10 रुपये एवढे आहे.  


याचा लिलाव मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 पासून खुला होणार आहे आणि गुरुवारी 2 नोव्हेंबर 2023 रोजी त्याची मुदत संपेल. अँकर इन्व्हेस्टरची लिलावर तारीख सोमवार 30 ऑक्टोबर 2023 ही आहे. 

कमीत कमी 46 समभागांची बोली लावावी लागेलल आणि त्यानंतर 46 च्या पटीत समभाग उपलब्ध असतील.

कर्मचारी आरक्षणातून बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रत्येक समभागावर 30 रुपयांचे डिस्काऊंट मिळेल. 



Honasa Consumer Limited (“HCL” or the “Company”), चा आयपीओ मंगळवारी, 31 ऑक्टोबर रोजी खुला होणार असून त्याचे दर्शनी मूल्य 10 रुपये असेल. 


कंपनीला वित्त वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत फायद्यात राहिली असून कंपनीला 24.71 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा 11.52 कोटी होता आणि वित्त वर्ष 2023 मध्ये कंपनीला 151 कोटींचा तोटा झाला होता. आता कंपनीने झेप घेत नफ्याकडे वाटचाल सुरू केली आहे. 


वित्त वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत सकल नफ्याचे मार्जिन 17.03 टक्के राहिले आहे. बिझनेस मॉड्युलमधील कार्यक्षमता आणि कार्यान्वयनातील बदल यामुळे कंपनी आता नफा होण्याच्या आणि त्यात वाढ होण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करत आहे. 


एकूण 365 कोटी रुपयांचे समभाग याद्वारे विक्री केले जाणारा असून त्यात 4,12,48,162 समभाग विकले जाणार आहेत. या ओएफएसमध्ये समभाग ऑफर करणाऱ्यांमध्ये प्रवर्तक आणि संस्थापक - वरूण अलघ आणि गझल अलघ आणि फायरसाईड व्हेंचर्स फंड, सोफिना, स्टेलरिस, करून बहल, रोहीत कुमार बन्सल, रिषभ हर्ष मारिवाला आणि बॉलीवडू कलाकार शिल्पा शेट्टी कुंद्रा या गुंतवणूकदारांचाही समावेश आहे. 


या आयपीओची विक्री गुरुवारी 2 नोव्हेंबर 2023 रोज बंद होईल. 


या आयपीओमध्ये प्रत्येक समभागाची किंमत 308 रुपये ते 324 रुपये अशी असेल. यासाठी कमीतकमी 46 समभागांच्या एका लॉटसाठी बोली लावावी लागले आणि त्यानंतर 46 च्या पटीत बोली लावता येईल. कर्मचारी आरक्षणातून बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रत्येक समभागावर 30 रुपयांचे डिस्काऊंट मिळेल. 


या फ्रेश इश्यूच्या माध्यमातून जमविण्यात येणाऱ्या निधीद्वारे पुढील काही गोष्टी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार ब्रँड सर्वत्र दिसावा यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून जनजागृती करणे, नवीन ईबीओ स्थापन करण्यासाठी भांडवली खर्च करणे, नवी सलून्स उभे करण्यासाठी भाबानी ब्लंट हेअरड्रेसिंग प्रा. लि. या उपकंपनीमध्ये गुंतवणूक करणे आणि सर्वसाधारण उद्योगीय कामासाठी आणि अधिग्रहणासाठी निधी वापरण्याचे उद्दिष्ट आहे. 


कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, सिटिग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रा. लि., जेएम फायनान्शिअल लिमिटेड आणि जे.पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. 




Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs