मासळी (Maaslli) : वरळीतील एक नवीन सीफूड डेस्टिनेशन

देव बरे करो....

मासळी (Maaslli) : वरळीतील एक नवीन सीफूड डेस्टिनेशन

मुंबईतील वरळी फ्लायओव्हरजवळील मासळी (Maaslli) हे नवीन रेस्टॉरंट अस्सल जीएसबी फूड खवय्यांसाठी आहे. वरळी उड्डाणपुलाजवळील हे छोटेसे आउटलेट उघडल्याच्या दिवसापासून बाहेरच्या गर्दीने हे ठिकाण पहिल्या आठवड्यापासून लोकप्रिय असल्याचे दिसून येते. मालक प्रसाद नायक हे सदैव ग्राहकांना जणू काही ते घरात आलेले पाहुणेच आहेत, अशा पद्धतीने संवाद साधतात आणि सेवा देताना दिसून येतात.


कर्नाटक येथील एका छोट्या भागातून मुंबईत आलेल्या सदानंद नायक यांनी सुरूवातीच्या काळात अत्यंत मेहनत आणि परिश्रम घेऊन आपला उदरनिर्वाह सुरु केला. हळूहळू त्यांनी हॉटेल व्यवसात पदार्पण करून मुंबईत न्यू मरीन लाइन्स येथे लिबर्टी रेस्टॉरन्ट सुरु केले. त्यांच्या निधनानंतर त्यांची मुले राजेश आणि प्रसाद नायक यांनी वरळी येथे २०१६ मध्ये लिबर्टी हे हे रेस्टॉरन्ट सुरु केले. पण नंतर आईच्या सल्ल्यानुसार कोरोना काळानंतर मासळी (Maaslli) नावाने मस्त्यप्रेमी खवय्यांसाठी रेस्टॉरन्ट सुरु केले आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जीएसबी पद्धती, नारळ, हळद, हिंग आदी मसाल्यांच्या सुयोग्य मिश्रणातून तयार होणाऱ्या पदार्थांची चव ग्राहकांना आवडू लागली.



आमच्या ग्राहकांना असा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे जो त्यांना पुन्हा पुन्हा परत या ठिकाणी आणेल, त्यामुळे त्या प्रकारचा मेनू देखील तयार करण्यात आला आहे. त्यात दिल्या जाणार्‍या डिशेसची रचना देखील केली आहे.

बोंबील फ्राय विथ प्रॉन्स, फन्ना करी — नारळआलेकांद्याची पेस्ट बनवलेली करी आणि भाताबरोबर खाणे हा एक विशेष प्रकार या ठिकाणी मिळाली. तुम्ही क्लॅम्सचे चाहते असालतर मालवणी क्लॅम्स सुक्के आवश्‍यक आहे. एक वेगळा मसाला ज्यामध्ये गरम मसाल्याचा भाग आहे. मसाला बेस म्हणून नारळ वापरतातपरंतु तरीही वापरल्या जाणार्‍या अद्वितीय मसाल्यांमुळे त्यांची स्वतःची चव निश्चित वेगळी आहे.

या ठिकाणी येणारे ग्राहक मोठ्या प्रमाणावर आहे. यात सर्व प्रकारचे लोक आहेतच शिवाय नियमितपणे येणाऱ्यांची संख्यादेखील विशेष आहे. अनेक सिलिब्रेटी तसेच सनदी अधिकारीदेखील या ठिकाणच्या चवीचा आस्वाद घेत असतात. त्यांच्यासाठी तसेच इतर सर्व ग्राहकांसाठी हे हॉटेल सदैव तत्पर आणि तयार असते. त्यामुळे त्यांचा ग्राहकवर्ग विस्तारला आहे. दूरदूरच्या ठिकाणांहून या ठिकाणी खवय्ये येत असतात.

ग्राहकांना संतुष्ट कऱण्याबरोबर देव त्यांचे बरे करो, अशी सदिच्छा देणारा देव बरे करो, हा फलकदेखील इथे आकर्षणाचा एक बिंदू आहे. 

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs