'Tips मराठी सादर करत आहे त्यांचा पहिला-वाहिला मराठी चित्रपट 'श्रीदेवी प्रसन्न'.
'Tips मराठी सादर करत आहे त्यांचा पहिला-वाहिला मराठी चित्रपट 'श्रीदेवी प्रसन्न'.
नव्या वर्षात, एक नवी लव्ह स्टोरी आणि आपल्या लाडक्या जोडीसह Tips मराठी सादर करत आहे पहिला मराठी चित्रपट 'श्रीदेवी प्रसन्न'. येतोय २फेब्रुवारी २०२४रोजी...
टिप्स फिल्म्स प्रस्तुत आणि कुमार तौरानी यांची निर्मिती असलेला "श्री देवी प्रसन्न" हा येत्या ०२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले.
"श्रीदेवी प्रसन्न" या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वासह बॉलीवूडलाही भुरळ घालणारी मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर आणि स्मार्ट अँड डॅशिंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अशी भन्नाट आणि बेमिसाल जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आहे. आजवर अनेक हीट चित्रपट देणारे हे दोन्ही दमदार कलाकार एकत्र येऊन एक वेगळीच प्रेमकहाणी फुलवणार आहे. या निमित्ताने नव्या वर्षात, एक नवी आणि आगळीवेगळी लव्ह स्टोरी आपल्या लाडक्या जोडीसह प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिकेसह सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वांखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे अशी दमदार कास्ट या चित्रपटात आहे. त्यामुळे श्रीदेवी आणि प्रसन्न यांच्या लव्हस्टोरी सोबत हा एक कंप्लीट फॅमिली सिनेमा आहे.
या चित्रपटाचे लेखन अदिती मोघे यांनी केले असून विशाल विमल मोढवे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर अमित राज यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. लवकरच हा चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालायला येत आहे..
Comments
Post a Comment