एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेडचा 920 कोटी रुपयांचा आयपीओ 5 फेब्रुवारी 2024 रोजी खुला होणार
एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेडचा 920 कोटी रुपयांचा आयपीओ 5 फेब्रुवारी 2024 रोजी खुला होणार
• प्राईस बँड प्रत्येकी 1 रुपया दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी समभागासाठी 147 ते 155 रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे.
• बोली/ऑफर सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 रोजी खुली होईल आणि बुधवार, 7 फेब्रुवारी, 2024 रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांना शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 रोजी बोली लावता येईल.
• कमीत कमी 96 इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त हवे असल्यास 96 च्या पटीत बोली लावावी लागेल.
राष्ट्रीय, 31 जानेवारी, 2024: एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेडचा ("द पार्क" किंवा "कंपनी") आयपीओ सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 रोजी खुला होणार आहे.
या ऑफरमध्ये एकूण 9200 मिलियन रुपयांचे (920 कोटी रुपये) इक्विटी समभाग असून त्यामध्ये 6000 मिलियन रुपयांच्या (6०० कोटी रुपये) नव्याने जारी करण्यात आलेल्या इक्विटी समभागांचा आणि समभाग विक्री करू इच्छिणाऱ्या समभागधारकांकडून विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आलेल्या 32०० मिलियन रुपयांच्या (32० कोटी रुपये) इक्विटी समभागांचा समावेश आहे.
अँकर गुंतवणूकदारांना शुक्रवार, 2 फेब्रुवारी, 2024 रोजी बोली लावता येईल. बोली/ऑफर सोमवार, 5 फेब्रुवारी, 2024 रोजी खुली होईल आणि बुधवार, 7 फेब्रुवारी, 2024 रोजी बंद होईल.
प्राईस बँड प्रत्येक इक्विटी समभागासाठी 147 ते 155 रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी 96 इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त हवे असल्यास 96 च्या पटीत बोली लावावी लागेल.
नव्याने जारी करण्यात आलेल्या इक्विटी समभागांच्या विक्रीतून उभारल्या जाणाऱ्या भांडवलाचा उपयोग कंपनीच्या काही कर्जांच्या संपूर्ण किंवा अंशतः परतफेडीसाठी, मुदतपूर्व परतफेडीसाठी आणि उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी वापरण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे.
विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये एपीजे प्रायव्हेट लिमिटेडकडून (समभाग विक्री करू इच्छिणारा प्रमोटर ग्रुप) 2960 मिलियन रुपयांपर्यंत, आरईसीपी IV पार्क हॉटेल इन्व्हेस्टर्स लिमिटेड कडून 230 मिलियन रुपयांपर्यंत आणि आरईसीपी IV पार्क हॉटेल को-इन्व्हेस्टर्स लिमिटेडकडून 10 मिलियन रुपयांपर्यंतच्या (समभाग विक्री करू इच्छिणारे गुंतवणूकदार) इक्विटी समभागांच्या विक्रीचा समावेश आहे.
या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स जेएम फायनान्शियल लिमिटेड, ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड हे आहेत.
हे इक्विटी समभाग कंपनीच्या दिनांक 29 जानेवारी 2024 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत केले जात आहेत, कोलकाता येथे रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, कोलकाता यांच्याकडे फाईल करण्यात आले आहेत आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.
Comments
Post a Comment