सूर्या रोशनीच्या चैतन्यशील प्रकाशयोजनेनी उजळला ‘अटल सेतू’


सूर्या रोशनीच्या चैतन्यशील प्रकाशयोजनेनी उजळला ‘अटल सेतू’



मुंबई : सूर्या रोशनी आपल्या कार्याच्या सुवर्ण महोत्सवी ५० वर्षात असून प्रकाशयोजना, पंखे, घरगुती उपकरणे, स्टील पाईप्स आणि पीव्हीसी पाईप्ससाठी सर्वात प्रतिष्टित आणि विश्वासार्ह ब्रँड आहे.

मुंबई, भारताचे आर्थिक केंद्र, त्याच्या पायाभूत सुविधांमधील परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे आणि सूर्या रोशनीने आपल्या अत्याधुनिक प्रकाशयोजनांसह या उपक्रमांना उजळण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

 

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ ‘अटल सेतू’ असे नाव देण्यात आलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) चे 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सूर्या रोशनीने या महत्त्वाच्या प्रकल्पात २२ किमीच्या आकर्षक आणि जागतिक स्तरावरील १२ व्या सगळ्यात लांब सागरी पुलावर अत्याधुनिक दर्शनी दिवे बसवून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. समर्पित संशोधन आणि विकास प्रयत्नांद्वारे विकसित केलेली कंपनीची नाविन्यपूर्ण व्यावसायिक प्रकाशयोजना आता देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी आणि महागड्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या प्रकल्पाच्या अंडरडेक आणि स्तंभांना प्रकाशित करते.


श्री व्रजेंदर सेन, अध्यक्ष - व्यावसायिक प्रकाश योजना, सूर्या रोशनी, याप्रसंगी बोलताना म्हणाले, अटल सेतूवर बसवलेली आमची व्यावसायिक प्रकाशयोजना केवळ आमच्यासाठीच एक महत्त्वाचा टप्पा नाही तर देशाच्या पायाभूत सुविधांच्या पटलावरही सुधारणा करण्याबाबत आमच्या टीमच्या समर्पण अधोरेखित करते. 

 

राष्ट्राचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने आणखी एका प्रकल्पाशी जोडले जाऊन सूर्याने ‘मी सूर्या आहे’ ही मोहिम सन्माननीय उंचीवर नेली आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट (एमएमआरडी)च्या सहकार्याने सूर्या रोशनी मुंबईतील लोकांचा प्रवासाचा अनुभव बदलण्याच्या आपल्या बांधिलकीप्रती ठाम आहे. ५० वर्षांहून अधिक काळ कंपनीने देशाच्या विकास प्रकल्पांशी स्वतःला जोडून घेत विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी प्रकाशयोजना पुरवल्या आहेत. भारतातील सगळ्यात लांब सागरी सेतूसाठी सूर्याची व्यावसायिक प्रकाशयोजना देशाच्या पायाभूत सुविधांच्या पटलावर महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते ज्यामुळे प्रकल्पाचे दृश्य आकर्षण वाढते आणि असंख्य प्रवाशांसाठी सेतूची कार्यक्षमता वाढते. मुंबई शहराच्या विकासाबरोबरच सूर्या रोशनी नाविन्यपूर्ण आणि शाश्वत प्रकाशयोजनांद्वारे मुंबईच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी समर्पित आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE