उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा विस्तार
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा विस्तार
महाराष्ट्रात यवतमाळमधील घाटंजीसह ४ नवीन बँक शाखा सुरू केल्यावर महाराष्ट्रात ७५ तर देशात एकूण ८८३ बँक शाखा
मुंबई : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने (यूएसएफबीएल) आज महाराष्ट्र राज्यातल्या यवतमाळमधील घाटंजीसह ४ नवीन बँक शाखांचे उदघाटन करण्याची घोषणा केली आहे. यासह बँकेच्या महाराष्ट्र राज्यात ७५ बँक शाखा आणि देशातील २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील बँक शाखांची एकूण संख्या ८८३ पर्यंत गेली आहे. घाटंजी, यवतमाळ येथील ग्राहक आता बचत खाते, चालू खाते, मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवी यासह गृहकर्ज, व्यवसाय कर्ज आणि मालमत्तेवरील कर्ज, विमा आणि गुंतवणूक यासारखी बँक उत्पादने आणि सेवांचा लाभ माध्यमातून घेऊ शकतात. बँक शाखा पायाभूत सुविधा, डिजिटल बँकिंग क्षमता आणि एटीएम नेटवर्कसह, बँक एकात्मिक ग्राहक सेवा देते.
या विस्तारावर भाष्य करताना उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचे व व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ श्री गोविंद सिंग म्हणाले, "आम्ही आमचा ७ वा वर्धापनदिन साजरा करत असताना, आम्ही सुती उद्योग आणि कॉर्पोरेट वातावरणासाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळमधील घाटंजी येथे नवीन बँक शाखा उघडण्याची घोषणा करत आहोत. बँक शाखेच्या स्थापनेमुळे या कापूस पट्ट्यातील शहरातल्या व्यावसायिक आणि किरकोळ घडामोडींना सक्षम चालना मिळेल.”
या बँक शाखेमार्फत वंचित किंवा कमी उत्पन्न गटातील व्यक्तींना किंवा वित्तीय सेवांपर्यंत पोहचू शकत नसलेल्या गटांना व्यवसाय विकास सेवांसाठी सूक्ष्म-बँकिंग कर्ज उपलब्ध करून देईल. समूह कर्जाच्या जेएलजी मॉडेलमध्ये पीअर-गॅरंटी कर्ज मॉडेलचा समावेश असतो, जो व्यक्तींना वैयक्तिक आधारावर तारण किंवा सुरक्षा न घेता कर्ज घेण्यास सक्षम करते, तसेच गटामध्ये परस्पर सहाय्य, समूहातील विवेकपूर्ण आर्थिक आचरण आणि कर्जाची त्वरित परतफेड या माध्यमातून कर्ज शिस्तीला प्रोत्साहन देते.
बँक शाखा, मायक्रो एटीएम (बँकिंग तासांदरम्यान), इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आणि कॉल सेंटर यासारख्या अनेक माध्यमांद्वारे ग्राहक बँक सेवा प्राप्त करू शकतात. याव्यतिरिक्त, बँक ग्राहकांना "डिजी ऑन-बोर्डिंग" या टॅबलेट-आधारित अॅप्लिकेशन मॉडेल च्या मदतीने बँक शाखेला भेट न देता बँक खाते उघडण्याची सुविधा देते.
Comments
Post a Comment