उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकचे यशोपूर्तीची ७वे वर्षे साजरे
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकचे यशोपूर्तीची ७वे वर्षे साजरे
यूएसएफबीएलने विलेपार्ले मधील नवीन बँक शाखेचे उद्घाटन, बँकेच्या महाराष्ट्रात ७४ आणि देशभरात ८८३ बँक शाखा
मुंबई: जानेवारी २३, २०२४ -: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने (यूएसएफबीएल) आज महाराष्ट्रात मुंबईतील विलेपार्ले येथे आपल्या ४ नवीन बँकिंग शाखांच्या उद्घाटनाची घोषणा केली. या उद्घटनासह, बँकेने महाराष्ट्र राज्यात ७४ शाखा आणि देशातील२६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ८८३ शाखांचा टप्पा गाठला आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकचे स्वतंत्र संचालक श्री. नागेश दिनकर पिंगे यांच्या हस्ते बँकिंग शाखांचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले, “आर्थिक राजधानी मुंबईत बँकेने आपला पाय रोवताना पाहणे हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. विलेपार्ले मधील समुदायाचा बँकिंग अनुभव निश्चितपणे समृद्ध करणारी आर्थिक उत्पादने आणि सेवा देण्याच्या त्यांच्या प्रयत्नासाठी बँक आणि त्यांच्या टीमला खूप खूप शुभेच्छा”.
या विस्ताराबाबत भाष्य करताना उत्कर्ष फायनान्स बँक लिमिटेडचे व्यवस्थपकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद सिंग म्हणाले,“आम्ही आमचा ७ वा वर्धापन दिन साजरा करत असतानाच एक बिझनेस हब आणि काही सर्वोत्तम बिझनेस स्कूलच्या समावेशामुळेशैक्षणिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विलेपार्ले, मुंबई येथे आमच्या नवीन बँकिंग शाखेचे उद्घाटन होत आहे.पार्ले आता या शहरातील दुसरे मोठे शिक्षण केंद्र बनले आहे. बँक शाखा अत्यंत पूरक आहे. व्यवसायिक आणि निवासी या सारख्या वर्गाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण दुवा म्हणून काम करेल याचा आम्हाला विश्वास आहे. या बँक शाखेचे उद्घाटन स्थानिक समुदायाच्या उद्योजकतेच्या भावनेलाच केवळ चालना आणि पोषण देत नाही तर त्यांचा आर्थिक आत्मविश्वास वाढवण्याची मौल्यवान संधी देखील देते.शिवाय, ते रोजगार आणि सिद्धता यांचे भरभराटीचे वातावरण निर्माण करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करते, आम्ही त्यांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास सक्षम करून या भागाची सेवा करण्यास उत्सुक आहोत”
बँक विलेपार्ले आणि तेथील रहिवाशांच्या व्यावसायिक वर्गाला आर्थिक उत्पादने आणि सेवा प्रदान करण्याच्या स्थितीत आहे. यामध्ये बचत आणि चालू खाती, मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवी यांचा समावेश आहे. आपल्या ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, बँक गृहकर्ज, व्यवसाय कर्ज आणि मालमत्तेवर कर्ज यासारखी विविध कर्ज उत्पादने उपलब्ध करून देते. आपल्या बँकिंग शाखा पायाभूत सुविधा, डिजिटल बँकिंग क्षमता आणि एटीएम नेटवर्कसह, बँक एकात्मिक ग्राहक सेवा देते.एटीएम व्यतिरिक्त बँक इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, युनिफाइड पेमेंट इंटरफेस (युपीआय) आणि कॉल सेंटर यासारखी अनेक माध्यमे उपलब्ध करून देते. समाजातील इतर विभागांना सेवा देताना अल्प-बँकिंग कर्ज (जेएलजी कर्ज), एमएसएमई कर्ज, गृहनिर्माण कर्ज आणि मालमत्तेवरील कर्ज यासह सेवा न मिळालेल्या ग्राहक वर्गांना आर्थिक सेवा देणे हे उत्कर्ष एसएफबीएलचे उद्दिष्ट आहे. त्याचरोबर “डिजी ऑन-बोर्डिंग” या टॅबलेट-आधारित अॅप्लिकेशन असिस्टेड मॉडेलद्वारे शाखेला भेट न देता बँक खाते उघडण्यासाठी ग्राहकांना सुविधा बँकउपलब्ध करून देते”.
Comments
Post a Comment