कल्याणने सादर केले रामायणावर आधारित ‘निमाह’ कलेक्शन
कल्याणने सादर केले रामायणावर आधारित ‘निमाह’ कलेक्शन
‘निमाह’ दागिने हे विद्यमान मंदिर-शैलीतील आकृतिबंध आणि प्रभू रामाच्या प्रतिमेशी जोडलेले आहेत
मुंबई, २१ जानेवारी २०२४: कल्याण ज्वेलर्सचे हेरिटेज ज्वेलरी कलेक्शन ' निमाह' ने एक नवीन अध्याय उलगडला. यातील दागिने हे विद्यमान मंदिर-शैलीतील आकृतिबंध आणि प्रभू रामाच्या प्रतिमेशी जोडलेले आहेत. ही परिवर्तन जोड दैवी प्रेरणेने कालातीत परंपरेत सहजतेने विलीन होते.
निमाह दागिने हे त्याच्या नक्षीकामासाठी ओळखले जातात. कर्नाटकातील मंदिरातील दागिन्यांची आठवण करून देणारी अशी या दागिन्यांची शैली आहे. यात मोर, हंस, कमळाची फुले, रत्नजडित आणि हुड असलेले नाग आणि सरस्वती आणि लक्ष्मी यांसारखी पौराणिक तसेच ऐतिहासिक चिन्हे दिसतात. आपल्या नवीन कलेक्शनमध्ये कल्याण ज्वेलर्सने रामायणातील घटकांचा कलात्मकलतेने निमाहच्या डिझाइनमध्ये समावेश केला आहे. राम आणि सीतेच्या प्रतिमांसह राम पट्टाभिषेक आणि अयोध्या मंदिराच्या प्रतिमांचा समावेश आहे.
कल्याण ज्वेलर्सच्या नवकल्पना आणि वारसा जतन करण्याच्या वचनबद्धतेचा पुरावा म्हणजे निमाह. कल्याण ज्वेलर्सकडे वधूच्या दागिन्यांचा विस्तृत संग्रह आहे. नाजूक आणि तेवढेच क्लासी, सोन्याच्या दागिन्यांची आवड असणाऱ्या नववधूंसाठी हा एक अत्यंत उत्तम पर्याय आहे. या अनोख्या दागिन्यांमुळेच अनेकजण या डिझाईन्सकडे आकर्षित होतात आणि त्यांच्या पिढ्यानपिढ्यांकडे हे दागिने हस्तांतरित केले जातात.
श्री. रमेश कल्याणरामन, कार्यकारी संचालक, कल्याण ज्वेलर्स म्हणाले,“ निमाह कलेक्शनमधील हे नव्याने आलेले पर्याय कल्याण ज्वेलर्समध्ये एका नवीन कलात्मक युगाची पहाट दर्शवते. हा आपल्या समृद्ध वारशाचा उत्सव आहे, समकालीन डिझाइन तसेच पुनर्कल्पना आणि मौल्यवान रत्नांनी सुशोभित केलेले आहेत. रामायण आणि भारतीय पौराणिक काळातील कालातीत कथांचा मनापासून आदर करत दागिन्यांची प्रत्येक घडण अतुलनीय कारागिरीने जिवंत केला आहे, आणि यासाठी आमचा ब्रँड प्रसिद्ध आहे. आमचा विश्वास आहे की हे श्रेणीसुधारित कलेक्शन आमच्या विद्यमान ब्रँड पोर्टफोलिओला पूरक ठरेल, विशेषत: आमच्या ग्राहकांमध्ये हे मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाईल.”
ऐतिहासिकदृष्ट्या केम्प स्टोन, माणिक, गार्नेट, पन्ना आणि मोत्यांनी सुशोभित केलेले, नव्याने अद्ययावत केलेल्या संग्रहाची विशिष्ट शैली आता आधुनिक सौंदर्यासह पारंपारिक मोहिनीची जोड देते. या ताज्या संग्रहामध्ये रोझ क्वार्ट्ज, एमराल्ड बीड्स, ऍमेथिस्ट, ओनिक्स बीड्स, परल्स, मॉर्गनाइट, ब्लू सॅफायर, मोइसॅनाइट आणि रशियन मणी यासह विविध प्रकारची उत्कृष्ट रत्न आहेत. ही नवीन रत्ने डिझाईनमध्ये एक नवीन आयाम जोडते, एक संग्रह तयार करते जो कालातीत आणि ट्रेंडी आहे.
Comments
Post a Comment