श्री करणी फॅबकॉम लिमिटेडचा आयपीओ 06 मार्च, 2024 रोजी खुला होणार आहे.
श्री करणी फॅबकॉम लिमिटेडचा आयपीओ 06 मार्च, 2024 रोजी खुला होणार आहे.
• इश्यू साइज - प्रत्येकी 10 रुपयांचे 18,72,000 इक्विटी शेअर्स
• इश्यू साइज - 41.18 कोटी रु. - 42.49 कोटी रु.
• प्राइस बॅंड - 220 रु. - 227 रु.
• मार्केट लॉट साइज - 600 इक्विटी शेअर्स
मुंबई, 29 फेब्रुवारी, 2024 – श्री करणी फॅबकॉम लिमिटेडने, विशेष तांत्रिक वस्त्रांच्या निर्मितीतील अग्रगण्य कंपनी 06 मार्च 2024 रोजी प्रारंभिक सार्वजनिक ऑफर जाहीर करण्याची योजना जाहीर केली आहे. या आयपीओच्या माध्यमातून अप्पर प्राइस बँडवर 42.49 कोटी रुपये उभे करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असून, एनएसई इमर्जिंग प्लॅटफॉर्मवर शेअर्सची लिस्टिंग होणार आहे.
इश्यू साइज 18,72,000 इक्विटी शेअर्स असून फेस व्हॅल्यू प्रत्येकी 10 रुपये आहे.
इक्विटी शेअर वाटप
• पात्र संस्थात्मक खरेदीदार अँकर भाग - 5,32,800 इक्विटी शेअर्सपर्यंत
• पात्र संस्थात्मक खरेदीदार (क्यूआयबी) - 3,55,800 इक्विटी शेअर्सपर्यंत
• गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (एनआयआय) - 2,67,000 इक्विटी शेअर्सपर्यंत
• किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार (आरआयआय) - 6,22,800 इक्विटी शेअर्सपर्यंत
• मार्केट मेकर - 93,600 इक्विटी शेअर्सपर्यंत
आयपीओ मधून मिळणारी निव्वळ रक्कम भांडवली खर्चासाठी वापरली जाईल, ज्यात गुजरातमधील सुरत येथील नवसारी जिल्ह्यात डाईंग युनिट ची स्थापना करणे आणि त्यांच्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या हेतूने पलसाना, सुरत, गुजरात येथे पिशव्या तयार करण्यासाठी नवीन युनिटमध्ये प्रस्तावित नवीन मशीनरी खरेदी करणे यांचा समावेश आहे. कंपनीच्या कार्यशील भांडवलाच्या गरजा भागविण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट खर्च भागविण्यासाठी देखील निधी चे वाटप केले जाईल. अँकर भागाचे बिडींग 05 मार्च 2024 रोजी उघडेल आणि इश्यू 11 मार्च 2024 रोजी बंद होईल.
हॉरिजोन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. या इश्यूचे रजिस्ट्रार एमएएस सर्व्हिसेस लिमिटेड आहेत.
श्री करणी फॅबकॉम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, श्री राजीव लखोटिया म्हणाले, "श्री करणी फॅबकॉम लिमिटेडला आमच्या आयपीओद्वारे सार्वजनिक करण्याच्या या महत्त्वपूर्ण प्रवासाची सुरुवात करताना आम्हाला अत्यंत अभिमान आणि उत्साह आहे. आमच्या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे विशेष तांत्रिक वस्त्रांच्या उत्पादनात गुणवत्ता आणि नाविन्यपूर्णतेसाठी अविरत बांधिलकी.
गुजरातमधील सुरत येथील नवसारी जिल्ह्यात अत्याधुनिक डाईंग युनिट ची स्थापना करणे, तसेच गुजरातमधील सुरत मधील पलसाना येथे आमच्या आगामी बॅग उत्पादन युनिटसाठी नवीन मशिनरी खरेदी करणे यासह भांडवली खर्चासाठी ही रक्कम देण्याची आमची योजना आहे. विशेष तांत्रिक वस्त्रांचे भवितव्य घडविण्यासाठी आम्ही पुढे जात असताना उत्कृष्टता आणि नाविन्यपूर्णतेसाठी आमची बांधिलकी अतूट आहे.”
हॉरिजोन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मानव, श्री गोयंका म्हणाले, “श्री करणी फॅबकॉम लिमिटेडच्या प्रवासातील एका महत्त्वपूर्ण टप्प्यात प्रवेश करणारा हा आयपीओ नव्या क्षितिजाकडे उल्लेखनीय झेप दर्शवितो. वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओसह, कंपनीने विविध उद्योगांच्या विकसनशील गरजा पूर्ण करण्याची क्षमता दर्शविली आहे. आम्हाला विश्वास आहे की श्री करणी फॅबकॉम लिमिटेडचा अग्रगामी दृष्टिकोन उदयोन्मुख बाजारपेठेच्या संधींचा फायदा घेण्यास आणि सतत यश मिळविण्यास सक्षम करेल.”
Comments
Post a Comment