कन्झुमर हाऊसिंग सेंटीमेंट इंडेक्स’ची झेप; खरेदीदारांचा बळकट आत्मविश्वास आणि वाढत्या उत्पन्नामुळे क्षेत्राला चालना: मॅजिकब्रिक्स अहवाल

 कन्झुमर हाऊसिंग सेंटीमेंट इंडेक्स’ची झेप; खरेदीदारांचा बळकट आत्मविश्वास आणि वाढत्या उत्पन्नामुळे क्षेत्राला चालना: मॅजिकब्रिक्स अहवाल 


- भारताचा हाऊसिंग सेंटीमेंट इंडेक्स (एचएसआय) 149 स्थानावर, अहमदाबादची 163 क्रमांकावर आघाडी


- वयवर्षे 24-35 च्या विविध मध्यमवयीन व्यावसायिकांत सर्वोच्च एचआयएस (154)




मुंबई, 24 एप्रिल 2024: महागाईचे सावट असूनही खरेदीदारांच्या आत्मविश्वासापायी भारतातील हाऊसिंग सेंटीमेंट इंडेक्स (एचएसआय) तेजीत राहिला, असे निरीक्षण भारताचा आघाडीचा रिअल इस्टेट मंच मॅजिकब्रिक्सने नोंदवले.  

सुमारे 11 शहरांमधील 4500 हून अधिक ग्राहक प्राधान्यांच्या आधारे, मॅजिकब्रिक्स’च्या वतीने आपला प्रमुख हाऊसिंग सेंटीमेंट इंडेक्स (एचएसआय) लॉन्च करण्यात आला, जो एकूण 149 हाऊसिंग सेंटीमेंट इंडेक्ससह भारतीय निवासी स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी सकारात्मक बाजारपेठेचा दृष्टिकोन दर्शवितो. अहमदाबाद हे शहर सर्वाधिक 163 हाऊसिंग सेंटीमेंट इंडेक्ससह आघाडीवर आहे. त्यानंतर कोलकाता (160), गुरुग्राम (157) आणि हैदराबाद (156) यांचा समावेश दिसून येतो. जे वाढीव पायाभूत सुविधा आणि आगामी नवीन स्थावर मालमत्ता प्रकल्पांमुळे प्रेरित आहेत. 

मॅजिकब्रिक्स’चे सीईओ सुधीर पै यांच्या मते, "भारतातील स्थावर मालमत्ता क्षेत्राची सध्याची परिस्थिती गेल्या दशकातील सर्वात आशादायक परिस्थितीचे दर्शन घडवते. ज्यामुळे देशभरातील घर खरेदीदार आणि गुंतवणुकदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. मागणी सातत्याने उपलब्ध पुरवठ्यापेक्षा जास्त होत आहे, जेव्हा नवीन साठ्याचा प्रवेश बाजारात होतो, तेव्हा जलद शोषणाच्या उत्साहवर्धक चिन्हांचे दर्शन घडते; हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे.”

मध्यमवयीन व्यावसायिकांनी (24-35 वयोगट) सर्वाधिक एचएसआय (154) दर्शविला. याव्यतिरिक्त, वार्षिक उत्पन्न रुपये 10-20 लाख असलेल्या ग्राहकांना घर खरेदीसाठी सर्वात जास्त महत्त्वाकांक्षा होती. ज्यामध्ये हाऊसिंग सेंटीमेंट इंडेक्स 156 असल्याचे अहवालात आढळून आले.

मॅजिकब्रिक्स’चे हेड ऑफ रिसर्च अभिषेक भद्रा म्हणाले, "घर खरेदीदार त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या चार पटीपर्यंत गुंतवणूक करण्याची उल्लेखनीय इच्छा दर्शवित आहेत, जे बाजारातील प्रचलित भावना आणि एकूण आशावादाचे महत्त्वपूर्ण मोजमाप म्हणून काम करत असल्याचे आमच्या संशोधनातून दिसून आले. वाढते उत्पन्न, सातत्यपूर्ण आर्थिक स्थैर्य आणि स्थावर मालमत्ता क्षेत्राची लवचिकता बळकट करण्याच्या उद्देशाने लक्ष्य करण्यात आलेले सरकारी उपक्रम विविध घटकांद्वारे या दृष्टिकोनाचे समर्थन केले जाते.” 

बहुतांश घर खरेदीदार 3 वर्षांच्या आत खरेदी करण्याचा विचार करतात. ज्यामुळे स्थावर मालमत्ता बाजाराच्या वर्तमान आणि भविष्यासाठी आशादायक दृष्टीकोन प्रतिबिंबित होतो, असेही अहवालात उघड झाले. 

1 हाऊसिंग सेंटीमेंट इंडेक्स श्रेणी 0-200 पासून (0 सर्वात निम्नस्तरावर, सहभागाकडे निर्देश आणि 200 हा सर्वाधिक विस्तार दर्शवतो)

अहवालातील इतर निरीक्षणे- 

- परवडणाऱ्या घरांचा प्रभावी हाऊसिंग सेंटीमेंट इंडेक्स (एचएसआय) 152

- 54% भारतीय खरेदीदार आणि 75% पेक्षा जास्त महिला कर्मचारी रिअल इस्टेटनंतर शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात

- वैद्यकीय आणि औषधनिर्मिती (163) तसेच सरकारी क्षेत्रात (158) कार्यरत ग्राहक हे कदाचित त्यांच्या नोकऱ्या आणि परस्पर आर्थिक स्थिरतेमुळे मजबूत गृहनिर्माण भावना दर्शवतात.

- सुविधा, स्थिरता, अनुकूल अटी आणि सुलभ वितरणामुळे गृहकर्ज घेण्याबद्दल गृहखरेदीदारांनी एनबीएफसी/बँकिंग-एतर संस्था (156) आणि बँकांबद्दल (152) तीव्र भावना दर्शविली.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24