विकसनशील भारताचा आरोग्याप्रती असलेल्या धोक्यांची अपोलो द्वारे दखल घेण्यात आली

 

विकसनशील भारताचा आरोग्याप्रती असलेल्या धोक्यांची अपोलो द्वारे दखल घेण्यात आली

·         जागतिक आरोग्य दिवस २०२४ चे निमित्त साधत अपोलोद्वारे आपला चौथा  प्रमुख हेल्थ ऑफ़ नेशन अहवाल सादर

·         भारतामधील एनसीडी मध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास आणले गेले, त्याच बरोबर कर्करोगाचा रूग्णांमध्ये देखील भारतात झपाट्याने वाढ होते आहे.

·         प्रत्येक ३ पैकी १ भारतीय प्रिडायबेटिक आहे; तर प्रत्येक ३ पैकी  दोघांना उच्च रक्तदाबाचा धोका संभवतो; तसेच प्रत्येक १० पैकी १ नैराश्याने ग्रस्त आहे

·         द नज इफ़ेक्ट (पाठपुरवठा करणे) एनसीडी विरोधात लढण्याकरिता भारतातील प्रमुख शस्त्र म्हणून पुढे आले आहे.

राष्ट्रीय, एप्रिल ०,२०२४: भारतातील सर्वात मोठ्या एकत्रित  आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या, अपोलो हॉस्पिटल्स, ने आपला प्रमुख  वार्षिक अहवाल “ हेल्थ ऑफ़ नेशन” चे अनावरण केले. या अहवालाचा माध्यमाने भारतातील नॉन- कम्युनिकेबल डिझीजेस (एनसीडी), जसे कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदय विकार आणि मानसिक आरोग्य समस्यांवरती प्रकाश टाकण्यात आला, या आरोग्य समस्यांमुळे देशाचाच एकूण आरोग्यावरती परिणाम होताना दिसून येतो. यात चिंतेची बाब ठरली ती इतर जगाचा तुलनेत भारतात होणारी कर्करोगाची वाढ, यामुळे भारत जगातील :कर्करोगाची राजधानी” असल्याचे संबोधले गेले तर त्यात आश्चर्य वाटायला नको.

या शिवाय या अहवालामध्ये, प्रिडायबेटिस, प्रिहायपरटेन्शन आणि मानसिक आरोग्य समस्यांचे तरूण वर्गामध्ये वाढते प्रमाण देखील दिसून आलेले आहे. नियमित आरोग्य तपासण्यांचे महत्वं या मधून लक्षात येते, कारण स्क्रीनिंग म्हणून केलेल्या  रिपोर्ट्सचा मदतीने उच्च रक्त दाब (बीपी) आणि बॉडी मास इन्डेक्स (बीएमआय) ला आळा घालण्यास मदत मिळू शकते, ज्यामुळे ह्रदय विकारासंबंधित धोके देखील कमी होऊ शकतात. अपोलोचा डेटामध्ये असे देखील लक्षात आले आहे की भारतातील आरोग्य तपासण्यांचे महत्वं समजावून सांगण्यात वाढ करायला हवी असली तरी, पुर्वी पेक्षा आता लोकं व्यापक आरोग्य तपासण्या करून घेऊ लागले आहे आणि म्हणूनच हे आरोग्य आणि स्वास्थ्य सुरक्षेप्रती उचललेले एक सकारात्मक पाऊल ठरते.

अपोलो हॉस्पिटल्सचा उपाध्यक्षा, डॉ. प्रीथा रेड्डी म्हणाल्या, “ देशाचा विकासामध्ये आरोग्याचा  महत्वाविषयी फ़ार चांगले मत मांडता येणार नाही. आमचा हेल्थ ऑफ़ नेशन अहवालाचा माध्यमाने आम्ही  नॉन-कम्युनिकेबल आजारांच्या वाढत्या प्रमाणावरती लक्ष वेधू इच्छितो आणि त्यामुळे वाढणाऱ्या ओझ्याप्रती जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो.  आमचा अशा विश्वास आहे की संपूर्ण आरोग्य सेवा व्यवस्था आणि देशाने एकत्र येऊन एकच दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवत एनसीडींशी खऱ्या अर्थाने लढा कसा देता येऊ शकेल याचा विचार करायला हवा.  आमचा निकालांचा मध्यमाने कर्करोग, मधुमेह,उच्च रक्त  दाब आणि लठ्ठपणासारख्या समस्यांशी लढा देण्याकरिता आणि प्रतिबंध किंवा त्यांना उलटवून लावण्याकरिता त्वरीत आणि महत्वाची पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. लोकांना माहिती देऊन आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांच्या उपाययोजनांप्रती जागृकता निर्माण करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर व्हायला हवे. आरोग्यसेवांमधील रचनात्मक कार्यांना महत्व देणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा उपायांना प्रोत्साहन आणि आरोग्य सेवांमधील असमानतांवरती काम करण्याची आवश्यकता आहे. मला असा विश्वास आहे की आपल्या देशातील संपूर्ण क्षमतांना कार्यरत करून समावेशक आणि टिकाऊ असा विकासाचा मार्ग आपण नक्कीच निवडू शकू.”

अपोलो हॉस्पिटल्सचा, अध्यक्षा आणि सीईओ, डॉ.मधू शशीधर, म्हणाल्या, “ नॉन-कम्युनिकेबल आजारांचे वाढते प्रमाण, विशेषत: गेल्या काही दशकांमधील वाढ ही जागतिक आरोग्य पटलांवरती मोठ्याप्रमाणामध्ये बदल घडविणारी आहे, वैयक्तिक स्तरावरील मोठ्या आव्हानांसह, त्याचा समाज आणि राष्ट्र पातळीवर देखील परिणाम होताना दिसून येतो आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेमधील कल्पकता विकसित करणे आणि सहजतेला प्रोत्साहन देणे ही संपूर्ण आरोग्य क्षेत्राची प्राथमिकता बनली आहे. अपोलो हॉस्पिटल्समध्ये , आम्ही सातत्याने तंत्रज्ञाचा मदतीने आरोग्यसेवा प्रदान करण्यामधील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे वैयक्तिक आणि  उत्तम अशा परिणामात्मक सेवा आम्ही प्रदान करू शकू. आमचा एआय-वर आधारीत प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा उपक्रमांपासून ते मोठ्याप्रमाणातील स्क्रीनिंग सुविधांचा माध्यमाने आम्ही तंत्रज्ञानाचा जोरावर आजारावर प्रतिबंधात्मक  सुधारणा, निदानामध्ये अचूकता आणि रूग्णांना केंद्रस्थानी ठेवून जागतिक स्तरावरील उपचार पद्धतींचा वापर करून, भविष्यातील आरोग्य सेवेला आकार देण्याचा प्रयत्न करतो. २१ व्या शतकातील कठीण अशा आव्हानांचा संपूर्ण अंदाज घेत, आपण हे ओळखायला हवे की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि निरोगी जनसंख्या हीच समृद्ध आणि संवेदनक्षम देशाचा खरा पाया ठरतो.”

अपोलोद्वारे भारतातील पहिल्या प्रोहेल्थ स्कोअरचे सादरीकरण

भारतीयांना अचूक आणि नि:पक्षपाती आरोग्याची माहिती मिळावी याचा प्रयत्न करताना अपोलोने आपले पहिले “प्रोहेल्थ स्कोअर” असे डिजिटल हेल्थ रिस्क असेसमेंट सादर केले आहे. लोकांना स्वत:करिता माहितीपूर्ण निर्णय घेता यावे म्हणून याचा माध्यमाने मदत केली जाणार आहे. फ़्री रिस्क स्कोअरचा माध्यमाने कौटुंबिक इतिहास, जीवनशैली आणि चालू लक्षणांचा आधारे आपल्या आरोग्याचे मुल्यांकन केले जाते आणि एक वैयक्तिक आकडा आपल्याला समजतो.  याशिवाय चांगल्या आरोग्याकडे वाटचाल करताना आपल्याला सोप्या आणि सहज उपाययोजना देखील  दिल्या जातात.

भारतामध्ये झपाट्याने आर्थिक आणि जीवनशैलीवर आधारीत बदल होत असताना, नॉन-कम्युनिकेबल डिझीज (एनएसडी), जसे ह्रदयविकार, मधुमेह, श्वसन समस्या आणि कर्करोगासारख्या आजरांमुळे देशातील ६३% मृत्यु होत असल्याचा अंदाज आहे. २०३० साला पर्यंत या आजारांमुळे देशातील एकूण आर्थिकतेमध्ये $३.५५ ट्रिलियन चे नुकसान होण्याचा अंदाज वर्तविला गेला आहे.तरी देखील या परिणामांशी दोन हात करण्याकरिता मजबूत अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना नक्कीच मदत करू शकतील. वैयक्तिक स्तरावर , तसेच कुटुंब आणि समाजाकरिता विविध उपययोजना हाती घेऊन एनसीडीचा बोजा वाढणार नाही याकरिता संरक्षणात्मक पाऊलं उचलली गेली पाहिजे. प्रोहेल्थ रिस्क स्कोअर हा आरोग्य समस्यांप्रती आणि धोक्यांप्रती जागृकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे या शिवाय सक्रिय अशा उपाययोजनांची देखील माहिती यामुळे मिळेल जेणेकरून लोकसंख्येवरती होणारा एनसीडीचा परिणाम कमी करता येऊ शकेल.

हेल्थ ऑफ़ नेशन २०२४चा अहवालातील महत्वाचे मुद्दे

एनसीडीमध्ये वाढ

·         भारतामध्ये कर्करोगाचा रूग्णांमध्ये वाढ होताना तर दिसून येतेच आहे पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे तरूण आणि कमी वयोगटातील व्यक्तींना कर्करोग होण्याचे प्रमाण वाढते आहे.

o   भारतामधील सर्वसामान्यपणे दिसून येणारे कर्करोग हे महिलांमध्ये स्तन, सर्विक्स आणि अंडाशयाचे कर्करोग असून पूरूषांमध्ये फ़ुफ़्फ़ुसाचा, तोंडाचा आणि प्रोस्ट्रेटचा कर्करोग सामान्यपणे दिसून येतो.

o   भारतात इतर देशांचा तुलनेमध्ये कर्करोगाचे निदान होणारा वयोगट हा कमी आहे. अपोलोचा संशोधनानुसार भारतात कर्करोगाचे सामन्यपणे निदान हे ५२ वयोगटात होते तर युएसए आणि युरोपमध्ये ते ६३ या वयाला होते. अपोलोमध्ये फ़ुफ़्फ़ुसाचा कर्करोगाचे निदान हे ५९ वर्षी होते तर पाश्चिमात्य देशांमध्ये याचे निदान साधारण ७० व्या वर्षी होते.

o   अपोलो हॉस्पिटल्समध्ये ३०% कोलोन कर्करोगाचे रूग्ण हे ५० पेक्षा कमी वयोगटातील आहेत.

o   असे ट्रेन्ड्स दिसत असले तरी भारतात कर्करोगाचा स्क्रीनिंगचा दर हा फ़ार कमी आहे. भारतात कर्करोगाकरिता स्क्रीनिंगचे प्रमाण हे १.९% आहे तर युएसएमध्ये ८२%, युकेमध्ये ७०% आणि चायनामध्ये २३%. सर्वायकल कर्करोगाचा विचार केला तर भारतात ०.९%, युएसएमध्ये ७३%, युएकेमध्ये ७०% तर चायनामध्ये ४३% एवढे आहे.

·         लठ्ठपणा देखील झपाट्याने वाढताना दिसतो आहे, जो दीर्घकालीन एनसीडीकरिताचा सगळ्यात महत्वाचा धोका ठरतो.

o   अपोलोमध्ये तपासण्यांकरिता येणाऱ्या चार पैकी तीन जण हे लठ्ठ किंवा जास्त वजन असलेले असतात.

o   २०१६मध्ये ९%ने लठ्ठलोकांमध्ये वाढ होत असताना २०२३ मध्ये ती २०% ने होताना दिसून येते.

o   अपोलोमध्ये हे देखील लक्षात आले आहे की कंबर आणि नितंबाचा शिफ़ारस केलेल्या गुणोत्तरापेक्षा महिलांमध्ये ९०% तर पुरूषांमध्ये ८०% व्यक्तींचे गुणोत्तर अधिक असते, यात ५०% लोकांचा बीएमया सामान्य असतो.

o   सगळ्या लठ्ठ लोकांमध्ये (बीएमआअ >25) शिफ़ारस केलेल्या प्रमाणापेक्षा व्हिसरल फ़ॅट जास्त असल्याचे आढळून आले. अगदी सामान्य बीएमआय (<25)असलेल्यांमध्ये देखील, शिफ़ारसी पेक्षा निम्म्याने म्हणजे (46%) लोकांमध्ये व्हिसरल फ़ॅट जास्त असल्याचे लक्षात आले.

·         २०१६ साली उच्च रक्तदाब होण्याचा दर हा 9% होता जो २०२३ साली १३% झाला आहे. ३ पैकी २ भारतीयांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असून , ६६% लोक हे प्री-हायपरटेन्सिव स्टेजमध्ये आहेत.

·         अपोलोचा डेटामध्ये असे देखील लक्षात आले आहे की १० पैकी १ लोकांना अनियंत्रित मधुमेह असून ३ पैकी १ व्यक्तीही प्रिडायबेटिक आहे.

o   जुन्या पद्धतीनुसार, >४५ वर्ष वय हे मधुमेहाकरिता धोकादायक समजले जात असे, पण आता डेटा असे सांगतो की ४५ वयोगटापेक्षा कमी वयोगट असलेल्यांमधील ५ पैकी १ व्यक्ती प्रिडायबेटिक आहे.

·         भारतीयांमध्ये ऑब्स्ट्रक्टिव स्लीप ऎपनियाचे प्रमाण देखील खूप वाढते आहे

o   झोपेचा तुलनात्मक अभ्यास करण्याकरिता ५,००० व्यक्तिंची निवड केल्यानंतर चार पैकी प्रत्येकी १ व्यक्ती ही धोक्याचा कक्षामध्ये येत होती.

o   ओएसएकरिता महिलांपेक्षा (१५%) पुरूषांमधील (३०%) प्रमाण दुप्पटीने जास्ती होते .

·         नैराश्याचे प्रमाण देखील तरूणामध्ये अधिक आणि वाढते दिसून आले     

o   नैराश्याकरिता ५,००० लोकांचा अभ्यास केला असता, प्रत्येक १० पैकी १ व्यक्तीला नैराश्य असल्याचे आढळले.

o   यामध्ये लक्षात घेण्यासारखे हे आहे की १८ आणि २५ वयोगटातील लोकांमध्ये नैराश्य सर्वाधिक असून, त्यांच्यामध्ये ५ पैकी १ नैराश्याने ग्रस्त होता.

·         जेष्ठ व्यक्तींचा तुलनेत (>65 वयोगट)  तरूण प्रौढ व्यक्तींमध्ये (१८-३० वयोगट) ८०%  अधिक तणावाचा स्तर आढळला.

o   तणावामुळे १.५ पटीने उच्च रक्तदाबाचा धोका संभवतो

o   यामुळे महिलांमध्ये २ प्टीने तर पुरूषांमध्ये ३प्टीने मधुमेहाचा धोका वाढतो

 

प्रतिबंधात्मक मार्ग

·         नियमित आरोग्य तपासण्या या आरोग्य व्यवस्थापनाकरिता अधिक चांगल्या पद्धतीने मदत करू शकतात.

o   मागील पाच वर्षांमध्ये ज्यांनी तीन पेक्षा अधिक वेळेला स्क्रीनिंग केले आहे त्यांच्यामध्ये HbA1C, BP आणि BMIस्तर कमी झाल्याचे लक्षात आले आहे.

·         'पाठपुरावा’ आरोग्य तज्ञांकडून किंवा पर्यवेक्षांकडून करून घेतल्यास फ़ायदा झाल्याचे लक्षात आले

o   लठ्ठपणा: १७,००० व्यक्तींचे २१ महिन्यांकरिता मूल्यांकन केले गेले; साधारण अर्ध्या व्यक्तींचे वजन कमी झाले, ज्यात सामान्यपणे ४ किलो वजन आणि १.६ किलो/महा बीएमआयमध्ये घट दिसून आली.

o   उच्च रक्तदाब: ७०% उच्च रक्तदाब असलेले आणि २०% थोड्याप्रमाणात रक्तदाब असलेल्यांमध्ये सुधारणा दिसून आली. साधारणपणे सिस्टोलिक आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशरमध्ये २४एमएमएचजी  आणि १५एमएमएचजी एवढा फ़रक दिसून आला.

o   मधुमेह: साधारणपणे ८,००० लोकांचा एका लहान समूहामध्ये ४०% व्यक्तींचा २१ महिन्यांमध्ये HbA1C सतर घटला. ज्यांना सुरवातील मधुमेहाचे निदान करण्यात आले होते त्यांचा HbA1C चा स्तर सरासरी १.४५ mmol/mol ने कमी झाला.

हेल्थ ऑफ़ नेशन बद्दल थोडक्यात:

हेल्थ ऑफ़ नेशन हा अपोलो हॉस्पिटल्सद्वारे दिलेला अहवाल असून यामध्ये एनसीडीकरिताचे धोक्याचे घटक ,प्रसाराबद्दलची माहिती देण्यात आली आहे, यामध्ये आजार आणि लगेच लक्ष केंद्रित करावे लागेल अशा धोक्याचा घटकांवर भर दिलेला आहे. अहवालानुसार अपोलो हॉस्पिटल्सचा प्रणालीशी आणि एकूण ईकोसिस्टीमशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींचा माहितीचा आधारावर निकाल आणि निष्कर्ष काढण्यात आले आहेत.या अहवालाचा हेतू हा समस्या ओळखून त्याकरिता संभाव्य उपाययोजना काढण्याचा आहे ज्यामुळे एकूणच आजाराचा प्रतिबंधाचा आणि निदानाप्रती अचूकतेचा क्षमतांमध्ये सुधारणाकरता येऊ शकतील, असे केल्याने अधिक चांगल्या पद्धतीने वैयक्तिक आणि रूग्ण-केंद्रित उपचार पद्धतीन निर्माण करता येऊ शकेल. हेल्थ ऑफ़ नेशनचा माध्यमाने दिला गेलेला डेटा हा अपोलो हॉस्पिटल्सचा डी-आयडेन्टिफ़ाईड हॉस्पिटल इन्फ़ॉर्मेशन प्रणाली आणि ईएमआरवर आधारीत आहे, आणि इतर अभ्यास हा सार्वजनिक स्तरावर उपलब्ध असलेल्या माहितीचा मदतीने अपोलो समूहाने केला आहे.

अपोलो बद्दल थोडक्यात :

अपोलो हे चेन्नईमध्ये डॉ. प्रथाप रेड्डीयांनी १९८३ साली पहिल्यांदा स्थापित केलेल्या आरोग्य सेवेचे एक क्रांतीकारी पाऊल होते. आज अपोलो जगातील एकत्रित आरोग्य सेवा प्रदान करणारे सगळ्यात मोठे व्यासपिठ असून ७१ हॉस्पिटल्समध्ये १०,००० पेक्षा अधिक बेड्स आहेत, सुमारे ६००० फ़ार्मसी आणि २०० पेक्षा अधिक निदान केंद्र तसेच १५० टेलीमेडिसीन केंद्र आहेत. हे जगातिल अग्रगण्य कार्डियॅक सेंटर्सपैकी एक सून ३,००,००० पेक्षा अधिक ॲन्जियोप्लास्टी आणि २,००,००० शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अपोलो आपले वेगळे असे संशोधन करण्याकरिता गुंतवणूक करते ज्यामुळे आत्याधुनिक तंत्रज्ञान, साधने आणि उपचारांचा उपाययोजना उपलब्ध करून देते आणि रूग्णांना जगातील उत्तम अशा आरोग्य सेवा प्रदान करते. अपोलोचा परिवार हा १,००,००० लोकांचा असून आपल्याला सातत्याने  सर्वोत्तम सेवा आणि जगाचा उत्तम अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24