आरईसीचे सर्वोत्तम कामगिरीचे आर्थिक निकाल घोषित
आरईसीचे सर्वोत्तम कामगिरीचे आर्थिक निकाल घोषित
ग्रामीण विदयुतीकरण महामंडळ म्हणजेच आरईसी (REC)
संचालक मंडळाने ३१ मार्च २०२४ रोजी
संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक
निकालांना मान्यता दिली. त्यानुसार आतापर्यंतचा सर्वाधिक वार्षिक निव्वळ नफा १४,०१९ कोटी रुपये इतका झाल्याचे घोषित केले गेले.
त्यामुळे प्रति शेअरमागील लांभाश ५ रुपये इतका दिला गेला आहे.
या आर्थिक निकालात व्यवहारातील महसूल १२,६१३ कोटी असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही
वाढ २५ टक्के इतकी आहे. हा आकडा यापूर्वी १०,११३ कोटी इतका होता. त्यामुळे एकूण उत्पन्न १२,६४३ कोटी रुपये झाले असून ही वृद्धीदेखील
२५ टक्क्यांनी अधिक आहे. यापूर्वीचा हा आकडा १०,१२४ कोटी रुपये होता. या कामगिरीमळे निव्वळ व्याजदेखील २९
टक्क्यांनी वाढले असून हा आकडा गेल्या वर्षी ३,४०९ कोटी रुपये होता तो आता ४,४०७ कोटी इतका झाला आहे. त्यामुळे निव्वळ नफादेखील ३९ टक्क्यांनी वाढला असून तो ३,००१
कोटींहून ४,०१६ कोटी रुपये इतका झाला आहे.
आरईसीने आतापर्यंत दिलेल्या एकूण मंजूरीची रक्कम ३४ टक्क्यांनी वाढली असून हा आकडा ३,५८,८१६ कोटी रुपये इतका झाला आहे. सौर क्षेत्रातील २०,९५६ कोटी, मॉड्युल निर्मितीसाठी २१,५६५ कोटी, लार्ज हायड्रोसाठी ३२,४५० कोटी, ग्रीन हायड्रोजनसाठी ७,९९७ कोटी, ई-मोबिलिटीसाठी ७,२१४ कोटी, विंड टर्बाइन उत्पादनासाठी ३,१९५ कोटी रुपये अशा स्वरुपाच्या या मंजूरी आहेत.
मालमत्तेची गुणवत्ता सुधारणे आणि तणावग्रस्त मालमत्तेचे प्रभावी निराकरण, कर्ज दर रीसेट करणे आणि वित्त खर्चाचे प्रभावी व्यवस्थापन यामुळे, आरईसीने १४,०१९ कोटींचा करानंतरचा सर्वाधिक वार्षिक नफा नोंदविण्यात सक्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळेच ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी प्रति शेअर कमाई (EPS) ३१ मार्च २०२३ रोजी ४१.८५ रुपये प्रति शेअरच्या तुलनेत २७ टक्केने वाढून ५३.११ रुपये प्रति शेअर झाली. नफ्यातील वाढीमुळे, ३१ मार्च २०२४ पर्यंत निव्ळ मत्ता ६८,७८३ कोटी रुपये झाली आहे, ही १९ टक्के वार्षिक वाढ आहे. लोन बुकने आपला वाढीचा मार्ग कायम ठेवला आहे आणि ३१ मार्च २०२३ पर्यंत ४.३५ लाख रुपये कोटींच्या तुलनेत १७ टक्के वाढून ती ५.०९ लाख कोटी रुपये इतकी झाली आहे.
भविष्यातील
वाढीस समर्थन देण्याची पुरेशी संधी दर्शवत,
कंपनीचा भांडवली पर्याप्तता प्रमाण (CRAR) ३१
मार्च २०२४ रोजी २५.८२ टक्के इतका आरामदायी आहे. आपल्या भागधारकांना बक्षीस
देण्याची परंपरा पुढे चालू ठेवत, कंपनीच्या संचालक मंडळाने ५ रुपये प्रति इक्विटी शेअर (प्रत्येकी १० रुपयांच्या दर्शनी मूल्यावर) अंतिम लाभांश घोषित केला आहे
आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी एकूण लाभांश प्रति शेअरमागे १६ रुपये झाला आहे.
Comments
Post a Comment