ऑफिस स्पेस सोल्युशन्स लिमिटेडचा आयपीओ २२ मे २०२४ रोजी खुला होणार

ऑफिस स्पेस सोल्युशन्स लिमिटेडचा आयपीओ २२ मे २०२४ रोजी खुला होणार

  • ऑफिस स्पेस सोल्युशन्स लिमिटेडच्या प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी शेयरसाठी प्राईस बँड ३६४ रुपये ते ३८३ रुपये निश्चित करण्यात आला आहे.
  • अँकर गुंतवणूकदार २१ मे २०२४ रोजी बोली लावू शकतील.
  • बोली/ऑफर २२ मे २०२४ रोजी खुली होऊन २७ मे २०२४ रोजी बंद होईल.
  • कमीत कमी ३९ इक्विटी शेयर्ससाठी बोली लावता येईल, त्यापेक्षा जास्त शेयर्स हवे असल्यास ३९ च्या पटीत बोली लावावी लागेल.

मुंबई, १६ मे २०२४: सीबीआरई अहवालानुसार भारतातील सर्वात मोठी फ्लेक्सिबल वर्कस्पेस सोल्युशन्स कंपनी, ऑफिस स्पेस सोल्युशन्स लिमिटेडने आपला आयपीओ २२ मे २०२४ रोजी खुला करण्याचे ठरवले आहे. त्याच्या एक दिवस आधी २१ मे २०२४ रोजी अँकर गुंतवणूकदारांना बोली लावता येतील. बोली/ऑफर २७ मे २०२४ रोजी बंद होईल.

प्राईस बँड ३६४ रुपये ते ३८३ रुपये निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी ३९ इक्विटी शेयर्ससाठी बोली लावता येईल, त्यापेक्षा जास्त शेयर्स हवे असल्यास ३९ च्या पटीत बोली लावावी लागेल.

या ऑफरमध्ये १२८०.०० मिलियन रुपयांपर्यंतचे (.) नव्याने जारी करण्यात आलेल्या आणि १२२९५६९९ पर्यंत विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आलेल्या इक्विटी शेयर्सचा समावेश आहे. यामध्ये पीक एक्सव्ही पार्टनर्स इन्वेस्ट्मेन्ट्स व्ही (आधीची एससीआय इन्वेस्ट्मेन्ट्स व्ही) यांच्याकडून ६६१५५८६ पर्यंत एकूण (.) मिलियन रुपयांपर्यंतच्या, बिस्क लिमिटेडकडून (.) मिलियन रुपयांपर्यंतच्या ५५९४९१२ पर्यंत आणि लिंक इन्व्हेस्टमेंट ट्रस्टकडून (.) मिलियन रुपयांपर्यंतच्या ८५२०१ पर्यंत इक्विटी शेयर्सचा समावेश आहे. या ऑफरमध्ये आमच्या कंपनीच्या पोस्ट-ऑफर पेड अप इक्विटी शेयर कॅपिटलपैकी (.)% चा समावेश असेल.

या ऑफरमध्ये  २०.०० मिलियन रुपयांपर्यंतचे (.) इक्विटी शेयर्स पात्र कर्मचाऱ्यांसाठी सबस्क्रिप्शनसाठी राखीव ठेवण्यात येतील. कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवलेला भाग वगळता उर्वरित भागाला "नेट ऑफर" असे संबोधले जाईल. ऑफर आणि नेट ऑफरमध्ये कंपनीच्या पोस्ट-ऑफर पेड-अप इक्विटी शेयर कॅपिटलचे अनुक्रमे (.)% आणि (.)% प्रमाण असेल. बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने कंपनी कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवलेल्या भागांतर्गत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना (.)% पर्यंत (प्रत्येक इक्विटी शेयरसाठी (.) रुपये) सूट देईल.

या आयपीओमधून जे भांडवल उभे राहील त्याचा वापर भांडवली खर्चासाठी करण्यात येईल, त्यामध्ये नवीन सेंटर्स स्थापन करणे, कंपनीच्या खेळत्या भांडवल गरजा पूर्ण करणे आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट कामे यांचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE