आशीर्वादकडून नवीन ‘हिमालयन पिंक सॉल्ट’ लॉन्च
आशीर्वादकडून नवीन ‘हिमालयन पिंक सॉल्ट’ लॉन्च
मुंबई,23 मे, 2024: आईटीसी आशीर्वाद साल्ट ने आज त्यांच्या नवीन हिमालयन पिंक सॉल्टची घोषणा केली, जे भारतामध्ये सेंधा नमक किंवा सैंधव लवण म्हणून ओळखले जाते, गुलाबी मीठ हे हिमालयातील मीठ खाणींमधून मिळत असल्याने नैसर्गिक मानले जाते.
अवलंबल्या जात असलेल्या चुकीच्या पद्धतींबद्दल ग्राहकांच्या मनात असलेली भीती दूर करण्यासाठी, बऱ्याचदा मीठ गुलाबी दिसण्यासाठी कृत्रिम रंग त्यात टाकले जातात; आशीर्वाद हिमालयन गुलाबी मिठामध्ये "कोणतेही रंग घातले जाणार नाही" याचे आश्वासन देते. बाजारात उपलब्ध असलेल्या इतर गुलाबी मिठाच्या तुलनेत हे मीठ आशीर्वाद स्त्रोतांच्या उच्च गुणवत्तेमुळे नैसर्गिकरित्या गडद गुलाबी रंगाचे आहे. प्रमुख फरकांपैकी हा एक फरक आहे आणि आपल्या चांगल्या ग्राहकांना दर्जेदार आणि सुरक्षित उत्पादन देण्याची आशीर्वादची वचनबद्धता यामुळे पूर्ण होते.
आशीर्वाद हिमालयन गुलाबी मिठामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी आवश्यक खनिजे देखील असतात. कमीतकमी प्रक्रिया केलेल्या या नवीन मिठामुळे जेवणाची चव सुधारते आणि ही चव शुद्धतेची खात्री देते. आणखीन, मल्टी-लेयर पॅकेजिंग उत्पादनाचा ताजेपणा टिकवून ठेवते ज्याचे ग्राहक पारदर्शक स्ट्रिपने त्वरित मूल्यांकन करू शकतात.
स्टेपल्स आणि ऍडजन्सिजचे सीओओ श्री. अनुज कुमार रुस्तगी म्हणाले, “आमच्या ग्राहकांच्या अभ्यासात असे लक्षात आले की, गुलाबी मीठ आरोग्याला पोषक आहे, आणि त्यामुळे त्याचा वापर वाढत आहे. यामुळे आम्हाला हिमालयन पिंक सॉल्टची सुरूवात करण्यास प्रोत्साहन मिळाले. यामध्ये आशीर्वाद च्या गुणवत्तेची हमी आहे आणि याला आमच्या ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळावा अशी आमची अपेक्षा आहे.”
आशीर्वाद पिंक सॉल्ट बेंगळुरू, चेन्नई, मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकाता आणि ई-कॉमर्स/क्विक कॉम प्लॅटफॉर्मसह सर्व प्रमुख महानगरांमधील मॉडर्न ट्रेड/आईएसएस स्टोअरमध्ये उपलब्ध असेल. १ किलोच्या पॅकची किंमत १२० रुपये आहे.
Comments
Post a Comment