झेड टेक (इंडिया) लिमिटेडचा प्रारंभीचा पब्लिक ऑफरिंग २९ मे २०२४ रोजी सुरू

झेड टेक (इंडिया) लिमिटेडचा प्रारंभीचा पब्लिक ऑफरिंग २९ मे २०२४ रोजी सुरू

 

झेड टेक (इंडिया) लिमिटेडचा प्रारंभीचा पब्लिक ऑफरिंग बुधवार दिनांक २९ मे २०२४ रोजी सुरू होणार आहे. हा प्रत्येकी १० रूपये किमतीचा ३३,९१,२०० समभागांचा बुक बिल्डिंग आयपीओ असून त्यातून सुमारे ३७.३० कोटी रूपये (कमाल) निधी उभारला जाईल. त्याची किमतीची श्रेणी प्रति समभाग १०४ ते ११० रूपये असेल. हा इश्यू २९ मे २०२४ रोजी खरेदीसाठी खुला होईल आणि ३१ मे २०२४ रोजी बंद होईल. अँकर बिडिंग २८ मे २०२४ रोजी असेल. 

 दिल्लीस्थित झेड टेक (इंडिया) लिमिटेड ही कंपनी आपल्या ग्राहकांना नावीन्यपूर्ण, सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही अभियांत्रिकी उपाययोजना देण्यासाठी ओळखली जाते. या उपाययोजना तीन प्रमुख श्रेण्यांमध्ये आहेतः सस्टेनेबल थीम पार्क डेव्हलपमेंट, इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर मॅनेजमेंट आणि जिओ टेक्निकल स्पेशलाइज्ड सोल्यूशन्स. तिने आपल्या पहिल्या प्रारंभीच्या सार्वजनिक ऑफरसाठी १० रूपये दर्शनी मूल्याच्या १०४-१०० रूपये प्रति समभाग किंमत ठरवली आहे.  

 कंपनीची इनिशियल पब्लिक ऑफरिंग “(आयपीओ” किंवा “ऑफर”) बुधवार दिनांक २९ मे २०२४ रोजी सबस्क्रिप्शनसाठी सुरू होईल आणि शुक्रवार दिनांक ३१ मे २०२४ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान १२०० समभागांसाठी बोली लावू शकतात आणि त्यानंतर १२०० च्या पटीत बोली लावू शकतात. या इश्यूमध्ये ३३,९१,२०० समभागांपर्यंत नवीन समभाग असून त्यातून सुमारे ३७.३० कोटी रूपये (कमाल) गोळा केले जातील. त्यासोबत सेल (ओएफएस) प्रवर्तक आणि प्रवर्तक समूहासाठी कोणतीही ऑफर नसेल. आयपीओच्या निव्वळ रकमेतून २३.७६ कोटी रूपये चालू भांडवलासाठी वापरले जातील तर उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट कार्यांसाठी वापरली जाईल.  

 श्रीमती संघमित्रा बोर्गोहेन या कंपनीच्या प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्या पहिल्या पिढीच्या उद्योजिका असून त्यांच्याकडे सिव्हिल बांधकाम उद्योगाचा १३ वर्षांपेक्षा जास्त काळाचा समृद्ध अनुभव आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण करियरमध्ये अद्भुत नेतृत्व आणि धोरणात्मक दृष्टीकोन दर्शवला आहे. श्रीमती बोर्गोहेन यांचे ज्ञान गुंतागूंतीच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये तसेच ठरलेल्या किमतीत आणि वेळेत यशस्वीरित्या प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये वापरले जाते. त्या आपल्या कंपनीशी स्थापनेपासून जोडल्या गेल्या आहेत.  

 ही कंपनी भारतातील पायाभूत सुविधा आणि सिव्हिल बांधकाम प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने जिओ-टेक्निकल स्पेशलाइज्ड सोल्यूशन्समध्ये सिव्हिल इंजिनीअरिंग उत्पादने आणि सेवा देते. त्यात विविध प्रकारची तंत्रे, कार्यपद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर जमिनीवर बांधण्यात आलेल्या रचना व बांधकामांची कामगिरी आणि स्थैर्य टिकवण्यासाठी वापरली जातात. त्याचबरोबर ती कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांचे लक्ष्य रिसायकल केलेल्या कचरा साहित्याचा वापर करून थीम पार्कच्या निर्मितीचे आहे. त्याचबरोबर ही कंपनी औद्योगिक वापरासाठी अद्ययावत जेइस्ट तंत्रज्ञानाचा वापर करून सांडपाणी व्यवस्थापनाची अंमलबजावणी करण्यात आघाडीवर आहे. ही दुहेरी वचनबद्धता कंपनीचा शाश्वत कार्यपद्धतींबाबतचा दृष्टीकोन पुनर्निर्मिती क्षेत्रांमध्ये नष्ट केलेल्या साहित्याचा वापर करण्यात दाखवते आणि त्याचवेळी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून औद्योगिक सांडपाण्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी कार्यरत आहे.    

 कंपनीची प्रमुख वैशिष्टे:

        ६ थीम पार्क्सचा विकास 

        आगामी १० थीम पार्क्स 

        ४५+ चालू प्रकल्प 

        ७०+ टीम 

        १५८ कोटी रूपयांचे एकूण ऑर्डर बुक 

        आयएसओ ९००१:२०१५ प्रमाणित 

आर्थिक कामगिरीच्या दृष्टीकोनातून मागच्या चार आर्थिक वर्षांसाठी कंपनीने एकूण उत्पन्न/ निव्वळ नफा (एकत्रित स्वरूपात) २३.९६ कोटी रूपये/ ०.७० कोटी रूपये (आर्थिक वर्ष २१), ३०.८४ कोटी/ ०.०७ कोटी (आर्थिक वर्ष २२), २५.८८ कोटी रूपये/ १.९६ कोटी रूपये (आर्थिक वर्ष २३) आणि ६७.३७ कोटी/ ७.७९ कोटी रूपये (आर्थिक वर्ष २४) आहे.  

 मागील चार आर्थिक वर्षांमध्ये कंपनीने सरासरी ईपीएस ४.२२ रूपये तर १९.७५ टक्के सरासरी आरओएनडब्ल्यू दर्शवला आहे. या इश्यूची किंमत ३१ मार्च २०२४ नुसार एनएव्ही २४.३२ रूपयांवर आधारित राहून ४.५ पी/बीव्ही इतकी आहे. त्याचबरोबर आयपीओनंतरच्या एनएव्ही ४६.२६ रूपये प्रति समभाग (कमाल) असून त्यानुसार २.३८ इतका पी/बीव्ही आहे. नोंदवलेल्या कालावधीसाठी कंपनीने २.६३ टक्के (आर्थिक वर्ष २१), ०.३१ टक्के (आर्थिक वर्ष २२), ७.७० टक्के (आर्थिक वर्ष २३), १२ टक्के (आर्थिक वर्ष २४) पॅट मार्जिन एकल तत्त्वावर आहे आणि तिचा आरओसीई मार्जिन्स ११.१० टक्के, १.७९ टक्के, २५.३० टक्के, ४५.३७ टक्के (एकत्रित तत्वावर) संदर्भित कालावधीसाठी आहेत.  

हा इश्यू नार्नोलिआ फायनान्शियल सर्व्हिसेस लि. यांनी व्यवस्थापित केला असून आणि मशीतला सिक्युरिटीज प्रा. लि. हे या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत. एनव्हीएस ब्रोकरेज प्रा. लि. हे कंपनीचे मार्केट मेकर्स आहेत. 

 

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202