आयथिंक लॉजिस्टिक्सची आर्थिक वर्षात दमदार कामगिरी
आयथिंक लॉजिस्टिक्सची आर्थिक वर्षात दमदार कामगिरी
मुंबई, २८ मे २०२४: आयथिंक लॉजिस्टिक्स या मुंबईस्थित इंटीग्रेटेड लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन सोल्यूशन्स कंपनीला आर्थिक वर्ष २०२३-२४चा सांगता उत्तम कामगिरीसह झाल्याचे जाहीर करताना अभिमान वाटत आहे. या आर्थिक वर्षात कंपनीने १०४ कोटी रुपये एवढ्या उत्तम उत्पन्नाची नोंद केली आहे. देशांतर्गत बाजारातील उत्पन्नाचा एकूण उत्पन्नातील वाटा भरीव म्हणजेच ९४.७ टक्के होता, यातून कंपनीचे भारतातील दमदार अस्तित्त्व अधोरेखित होते. विशेषत: पश्चिम भागातील व्यवसायाचे एकूण उत्पन्नात सर्वाधिक योगदान होते.
आयथिंक लॉजिस्टिक्सने आपल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्षेत्राचा विस्तार कायम ठेवला असल्यामुळे आगामी आर्थिक वर्षासाठी महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. प्रस्थापित जागतिक व्यवहारांचा पाया घातला गेल्यामुळे आता कंपनी आपल्या आंतरराष्ट्रीय परदेशी उत्पन्नामध्ये ८ पट वाढ साध्य करण्यास सज्ज आहे. सध्या ४ कोटी रुपये असलेले हे उत्पन्न ३० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे. आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स क्षमता सखोल करण्याच्या व विस्तारण्याच्या व्यापक धोरणाचा हा एक भाग आहे.
आयथिंक लॉजिस्टिक्सच्या सहसंस्थापक झैबा सारंग यांनी सांगितले की, "गेल्या वर्षभरात आम्ही सातत्याने आमच्या सीमा ओलांडून लक्षणीय वाढ साध्य करत राहिलो आणि हाच वेग पुढेही कायम राखण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाकडे बघताना, केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही उत्तम कामगिरी करू शकेल अशी शीपिंग परिसंस्था निर्माण करण्यावर आमचा भर आहे. अचूकता, सुलभता आणि व्यापक जाळे तयार करणे यासाठी आम्ही समर्पित आहोत. तसेच जगभरातील लॉजिस्टिक्स उद्योगात आम्हाला नवीन मापदंड स्थापित करायचे आहेत.फेडएक्ससारखी लॉजिस्टिक्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी तसेच भारतातील डिजिटल कॉमर्समधील आद्यकंपनी ओएनडीसी यांच्याशी सहयोग केल्यामुळे आमच्या क्षमता वाढल्या आहेत आणि आम्हाला जागतिक बाजारपेठेत एक अनन्यसाधारण स्थान प्राप्त करता आले आहे."
आंतरराष्ट्रीय कामकाज विस्तारण्यावर तसेच लॉजिस्टिक्स सेवांच्या सर्व विभागांमधील उत्कृष्ट कामगिरी कायम राखण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आयथिंक लॉजिस्टिक्स श्रेष्ठ दर्जाची सेवा देण्यासाठी तसेच जगभरात दृढ संबंध निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे. भविष्यकाळात म्हणजेच आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये एकंदर उत्पन्नात २०० कोटी रुपयांची झेप घेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. यातून धोरणात्मक विस्तार योजना व कार्यात्मक उत्कृष्टता यांबाबत कंपनीला वाटणारा आत्मविश्वास अधोरेखित होतो.
Comments
Post a Comment