यंदाच्या निवडणुकीच्या काळात नॅशनल जिओग्राफिक इंडिया ‘इंडिया व्होट्स’ #वर्ल्डसलार्जेस्टइलेक्शन' या विशेष चित्रपटाद्वारे लोकतांत्रिक उत्साहाला सन्मानित करत आहे

 यंदाच्या निवडणुकीच्या काळात नॅशनल जिओग्राफिक इंडिया ‘इंडिया व्होट्स’ #वर्ल्डसलार्जेस्टइलेक्शन' या विशेष चित्रपटाद्वारे लोकतांत्रिक उत्साहाला सन्मानित करत आहे



23 मे रोजी याचे प्रदर्शन केले जाणार आहे आणि हा चित्रपट भारतातील सार्वत्रिक निवडणुकांवर प्रकाश टाकत आहे. त्याचसोबत प्रेक्षकांमध्ये अभिमान निर्माण करत असून मतदानाच्या सामर्थ्याबद्दल उत्साह निर्माण करत आहे.

नवी दिल्ली, 21 मे, 2024: भारतात जवळपास 97 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. यू.एस.ए मध्ये फक्त 16.8 कोटी आणि रशियात 11.4 कोटी अनुक्रमे नोंदणीकृत मतदार आहेत व त्या तुलनेत भारत निवडणुकीचा अग्रदूत म्हणून पहायला मिळतो. विशेष म्हणजे जर्मनी, ब्रिटन आणि फ्रान्स यांच्या एकत्रित लोकसंख्येएवढी लोकसंख्या उत्तर प्रदेश मध्ये आढळते. सार्वत्रिक निवडणुकीचा उत्साह देशभरात पसरत आहे आणि अशा वेळी नॅशनल जिओग्राफिक इंडिया वर्षातील सर्वात भव्य देखावा दाखवत आहे, तो म्हणजे 'इंडिया व्होट्स #वर्ल्डसलार्जेस्टइलेक्शन'. याचे सूत्रसंचालन अभिनेता सायरस साहूकार यांनी केले आहे आणि या 44 मिनिटांच्या विशेष चित्रपटात, भारताच्या सार्वत्रिक निवडणुका 2024, या जगातील सर्वात मोठ्या निवडणुकेची खास झलक दाखवण्यात आलेली आहे. त्याद्वारे देशाच्या निवडणूक प्रक्रियेतील गुंतागुंतीचे बारकावे आणि गुंतागुंत अधोरेखित करण्यात आली आहे

हा चित्रपट 23 मे रोजी रात्री 8 वाजता नॅशनल जिओग्राफिकवर प्रदर्शित केला जाणार आहे.* आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीने हा चित्तवेधी चित्रपट प्रकाशस्तंभ म्हणून काम करत असून राष्ट्रीय अभिमानाची तीव्र भावना जागृत करत आहे आणि लोकशाही सामर्थ्याबद्दल उत्साह निर्माण करत आहे. हा भारताच्या अफाट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडलेला आहे आणि माहितीपूर्ण व हलकाफुलका यांचा समतोल या चित्रपटात साधला गेला असून हा तरुण प्रेक्षकांना आकर्षित करणारा आहे. सार्वत्रिक निवडणुका उलगडण्यापासून ते भारतीय निवडणुकीच्या पायदळ सैनिकांना मानवंदना देण्यापर्यंत, भारतीय निवडणुकांमध्ये अंतर्भूत असलेली व्याप्ती, भव्यता, तंत्रज्ञान आणि मानवी भावना या मधून दिसून येते. हा चित्रपट भारतीय लोकतंत्राच्या धडधडत्या अंतः करणाचा आणि आपल्या देशाचा तंत्रिका केंद्र असलेल्या नवीन संसदेचा खोलवर वेध घेतो. भारताची उत्साही लोकतांत्रिक प्रक्रिया मांडणाऱ्या या चित्रपटात निवडणुकीच्या प्रवासातील प्रत्येक पैलू उलगडण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त निवडणुकीची तयारी करतानाची कृती तर पहायला मिळतेच, त्याचसोबत हा चित्रपट त्यांच्या वैयक्तिक प्रवासाचाही वेध घेतो आणि प्रेक्षकांना त्यांच्या अधिकृत कर्तव्यांच्या पलीकडे त्यांच्या जीवनाची झलक दाखवतो. 

"नॅशनल जिओग्राफिक मध्ये, आम्ही अभूतपूर्व कथा आणि अनुभव आणण्यासाठी कटिबद्ध आहोत ज्यामुळे लोकांना आशावाद, ऊर्जा आणि आशेने जगाकडे पाहण्याची प्रेरणा मिळते. या निवडणुकीच्या विशेष चित्रपटासह, आम्ही लोकतंत्र कार्य करत असतानाचा अविश्वसनीय प्रवास दर्शविण्यास उत्तेजित आहोत आणि प्रत्येक मताची शक्ती व त्यातून आपल्या देशात निर्माण होणारी एकता साजरी करण्यासाठी प्रेक्षकांना आमंत्रित करीत आहोत", असे नॅशनल जिओग्राफिकच्या प्रवक्त्याने सांगितले.

“सार्वत्रिक निवडणुकीची तयारी दोन वर्षे आधीच सुरू होते. त्यामुळे आम्ही 2022 च्या आसपास सुरुवात केली. क्षमता वाढ, तांत्रिक अद्ययावतीकरण जे होणे आवश्यक आहे, मतदान केंद्रांची तयारी यांच्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. 

निवडणूक जाहीर करणे म्हणजे एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी व्यावसायिक घटना आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी, प्रलोभनमुक्त, हिंसामुक्त  करण्यासाठी 96 कोटी, 960 मिलियन भारतीय मतदारांसारख्या जनतेचा विश्वास क्वचितच मिळतो आणि ही खूप मोठी जबाबदारी आहे.", *असे भारताचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.

या वर्षाच्या लोकतांत्रिक देखाव्यासाठी अपेक्षा वाढत जात असताना आणि देश सज्ज होत असताना 'इंडिया व्होट्स : वर्ल्ड्स लार्जेस्ट इलेक्शन' हा भारतीय लोकतंत्राच्या अजिंक्य भावनेचा पुरावा आहे.

इंडिया व्होट्स : वर्ल्ड्स लार्जेस्ट इलेक्शन, 23 मे 2024 रोजी रात्री 8 वाजता नॅशनल जिओग्राफिकवर प्रदर्शित केला जाणार आहे

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE