महाराष्ट्रात नजीकच्या भविष्यात 50,000 स्टार्टअप्सना चालना मिळणार – उदय सामंत, उद्योग मंत्री
महाराष्ट्रात नजीकच्या भविष्यात 50,000 स्टार्टअप्सना चालना मिळणार – उदय सामंत, उद्योग मंत्री
मुंबई, 27 जून – महाराष्ट्र सरकार सातत्याने स्टार्ट अप क्षेत्राला बळ देत असून नजीकच्या भविष्यात स्टार्टअप्सची संख्या 50,000 पर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सरकारने एमएसएमईपासून मोठ्या कॉर्पोरेट्सपर्यंत सर्वांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरवले असल्याचे माननीय श्री. उदय सामंत, उद्योग मंत्री, महाराष्ट्र सरकार यांनी असोचॅमच्या कार्यक्रमात जाहीर केले.
असोचॅम महाएमएसएमईराष्ट्र एम्पॉवरमेंट समिट अँड अवॉर्ड्स 2024 मध्ये संबोधताना श्री. सामंत म्हणाले, ‘केंद्रीय सरकारने नुकतीच गेल्या दोन वर्षांतील स्टार्ट- अप्सची यादी जाहीर केली असून त्यापैकी 8,300 स्टार्ट- अप्स महाराष्ट्रातील आहेत. यामुळे स्टार्टअप्सच्या बाबतीत राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्य सरकार या घडामोडींविषयी सकारात्मक असून भविष्यात ही संख्या 50,000 वर नेण्याचे उद्दिष्ट आहे.’
‘स्टार्टअप्स लाँच झाल्यानंतर त्याचे काम सुरू आहे, की बंद झाले यावर देखरेख करत राहाणं महत्त्वाचे आहे. स्टार्टअप्सच्या स्थितीचे विश्लेषण आणि त्यांच्या पुढे येणारी आव्हाने यावर काम करणे आवश्यक आहे.’
‘पूर्वी परदेशात गुंतवणूक मिळालेल्या महाराष्ट्रातील कंपन्यांना खास वागणूक दिली जायची, मात्र आता 50,000 रुपयांची गुंतवणूक मिळवणाऱ्या कोणत्याही कंपनीला खास वागणूक दिली जाते. महाराष्ट्रात एमएसएमईपासून मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांपर्यंत सर्वांना मिळणाऱ्या दर्जेदार वागणुकीमुळे आज इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात पहिल्या क्रमांकावर आहे,’ असेही ते म्हणाले.
एमएसएमई क्षेत्र बळकट करण्यासाठी सरकारतर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयी महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एमएसएसआयडीसी) व्यवस्थापकीय संचालक, आयएएस श्री. राजेंद्र निंबाळकर म्हणाले, ‘महाराष्ट्र स्मॉल स्केल
Comments
Post a Comment