मुंबईत मुख्य कार्यालय असलेल्या इन्विक्टा डायग्नोस्टिक्स लिमिटेडने 2027 पर्यंत 60 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे; आयपीओची आहे योजना.
मुंबईत मुख्य कार्यालय असलेल्या इन्विक्टा डायग्नोस्टिक्स लिमिटेडने 2027 पर्यंत 60 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे; आयपीओची आहे योजना.
कंपनी आपल्या नेटवर्कचा आणि सेवांचा विस्तार करण्यासाठी भांडवल उभारण्यासाठी आयपीओद्वारे निधी संकलित करण्याचा विचार करत आहे. इन्विक्टा हब-अँड-स्पोक मॉडेलने काम करते. त्यांचे ठाण्यात एक प्रमुख केंद्र आहे, भायंदर, भायखळा आणि मरोळ येथे तीन केंद्रे, आणि लोअर परळ, शिवडी, माझगाव, आणि कळवा येथे चार स्पोक्स आहेत. कंपनीची पुढील 12-18 महिन्यांत महाराष्ट्रभरात मोक्याच्या ठिकाणी 10 नवीन डायग्नोस्टिक केंद्रे उघडण्याची योजना आहे
FY24 मध्ये पुनःस्थापित एकत्रित आर्थिक आधारावर Rs. 15.83 कोटींचे एकूण उत्पन्न आणि Rs. 3.80 कोटींचा करोत्तर नफा (PAT) नोंदवला, तर FY23 मध्ये पुनःस्थापित स्वतंत्र आर्थिक आधारावर Rs. 6.84 कोटींचे एकूण उत्पन्न आणि Rs. 0.23 कोटींचा करोत्तर नफा (PAT) नोंदवला; FY25 मध्ये Rs. 25 कोटींचे उत्पन्न मिळविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून सॉक्रॅडॅमस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती करण्यात आली आहे
इन्विक्टा डायग्नोस्टिक्स लिमिटेड ("कंपनी"), 'पीसी डायग्नोस्टिक्स' या ब्रँड नावाने परिचित असलेल्या एका प्रमुख डायग्नोस्टिक सेवा प्रदात्याने आज 2027 या आर्थिक वर्षात Rs. 60 कोटींचे उत्पन्न साध्य करण्याची आपली योजना जाहीर केली. कंपनी आपल्या धोरणात्मक विस्तार योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी इनिशिअल पब्लिक ऑफरिंगच्या माध्यमातून (IPO) भांडवल उभारण्याची योजना आखत आहे. ऑफरचा बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून सॉक्रॅडॅमस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईत मुख्य कार्यालय असलेल्या या कंपनीने पुनःस्थापित एकत्रित आर्थिक परिणामांच्या आधारे FY24मध्ये रु.3.80 कोटी इतक्या करोत्तर नफ्याची नोंद केली आहे, तर पुनःस्थापित स्वतंत्र आर्थिक परिणामांच्या आधारे FY23मध्ये रु.0.23 कोटी इतक्या करोत्तर नफ्याची नोंद केली आहे. कंपनी FY2025मध्ये रु.25 कोटींचे उत्पन्न साध्य करण्याच्या मार्गावर आहे.
इन्व्हिक्टा डायग्नॉस्टिक्सची मुंबई आणि उपनगरांमध्ये 8 डायग्नॉस्टिक सेंटरचे भक्कम नेटवर्क असून ते हब-आणि-स्पोक मॉडेलमने या केंद्रांचे कामकाज चालते. त्यामुळे त्यांची एक विश्वसनीय डायग्नॉस्टिक सेवा प्रदाता म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या नेटवर्कमध्ये ठाण्यातील एक प्रमुख केंद्र आहे, जिथे सर्व पॅथोलॉजी नमुन्यांची संकलन, प्राथमिक आणि अत्याधुनिक रेडिओलॉजी तपासणी केली जाते. भायंदर, भायखळा, आणि मरोळ येथे तीन केंद्रे आहेत, जे विशेष सेवा प्रदान करतात आणि लोअर परळ, शिवडी, माझगाव, आणि कळवा येथील चार उपकेंद्रांना (स्पोक) सहाय्य करतात. कंपनी येत्या 12-18 महिन्यांत महाराष्ट्रभरातील मोक्याच्या ठिकाणी 10 नवीन डायग्नॉस्टिक सेंटर सुरू करण्याचा विचार करत आहे.
कंपनीच्या महत्वाकांक्षी योजनांबद्दल बोलताना, इन्व्हिक्टा डायग्नॉस्टिक्स लिमिटेडचे प्रमोटर व सीएफओ श्री. रोहित प्रकाश श्रीवास्तव म्हणाले, “2021 मध्ये आमच्या स्थापनेपासून गुणवत्ता आणि परवडणारे दर हे आमच्या यशाचे आधारस्तंभ राहिले आहेत. आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी अनुभवी रेडियोलॉजिस्ट आणि तंत्रज्ञांची भरती करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली आहे. आम्ही सातत्याने उत्कृष्टता साध्य करण्याचा प्रयत्न करत असून सेवेचा दर्जा अधिक चांगला करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि विस्तार योजनेसाठी आयपीओच्या माध्यमातून निधी संकलनाच्या संधी शोधत आहोत.”
कंपनीच्या मोठ्या डायग्नॉस्टिक केंद्रांमध्ये (हब्ज) सीटी स्कॅन व एमआरआयसारखी प्रगत चाचणी यंत्रे आहेत तर लहान केंद्रांमध्ये (स्पोक्स) सोनोग्राफी व एक्स-रे सारख्या मूलभूत चाचण्या केल्या जातात. हे स्पोक्स या कंपनीची नमुना संकलन केंद्रे म्हणूनही काम करतात.
इन्व्हिक्टा डायग्नॉस्टिक्स लिमिटेड आणि त्यांचा ब्रँड पीसी डायग्नॉस्टिक्स यांची संकल्पना आणि स्थापना डॉ. केतन जयंतीलाल जैन व डॉ. संकेत विनोद जैन यांनी केली आहे. ते या कंपनीचे प्रमोटर व नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स आहेत. त्यांच्या परिवारातील आरोग्यक्षेत्रातील ते पहिल्या पिढीतील व्यावसायिक आहेत. त्यांना इंटिग्रेटेड डायग्नॉस्टिक्स बिझनेसचा अनुक्रमे 10 व 7 वर्षांहून अधिक अनुभव आहे. ते दोघेही रेडिओलॉजिस्ट आहेत. कंपनीचे प्रमोटर व सीएफओ रोहित प्रकाश श्रीवास्तव 2021 पासून कंपनीचे व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.
पुढे जाऊन, इन्व्हिक्टाने अधिक चांगल्या वृद्धीच्या संधींसाठी अजून दोन गुंतवणूक प्रवर्तकांची भर घातली. कंपनीच्या सध्याच्या प्रवर्तकांमध्ये डॉ. केतन जयंतीलाल जैन, डॉ. संकेत विनोद जैन, रोहित प्रकाश श्रीवास्तव आणि गुंतवणूकदार प्रवर्तक बादल कैलाश नरेदी आणि जयेश प्रकाश जैन यांचा समावेश आहे आणि त्यांच्या व्हिजन व नेतृत्वाचा कंपनीला प्रचंड फायदा झाला आहे आणि इन्व्हिक्टा डायग्नॉस्टिक्सची प्रमुख धोरणे आखण्यात व त्यांची अंमलबजावणी करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
Comments
Post a Comment