महानगर गॅस लिमिटेडद्वारा आयोजित महा एलएनजी काँक्लेवमध्ये उद्योग तज्ञांनी एलएनजीच्या भविष्याची चर्चा केली
महानगर गॅस लिमिटेडद्वारा आयोजित महा एलएनजी काँक्लेवमध्ये उद्योग तज्ञांनी एलएनजीच्या भविष्याची चर्चा केली
भारतातील एक सर्वात मोठ्या सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन (सीजीडी) कंपन्यांपैकी एक असलेल्या महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) बांद्रा कुर्ला काँप्लेक्सच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रीक्ट येथे महा एलएनजी काँक्लेवचे आयोजन केले. औद्योगिक हितसंबंध धारकांना मोठ्या संख्येत आकर्षित करणाऱ्या या कार्यक्रमात औद्योगिक नेतृत्वाच्या जोडीने महानगर गॅस लिमिटेड आणि महानगर एलएनजी प्रायव्हेट लिमिटेड अशा उभयतांचे वरिष्ठ नेतृत्व उपस्थित होते. काँक्लेवचा आरंभ श्री. आशू सिंघल, व्यवस्थापकीय संचालक आणि श्री. संजय शेंडे, उप व्यवस्थापकीय संचालक, महानगर गॅस लिमिटेड यांच्या आणि त्यानंतर श्री. टी.एल. शरणागत व श्री. सुब्बाराव वड्डादी, एमएलपीएल मधील संचालक यांच्या प्रास्ताविक भाषणांनी आणि श्री. मानस दास, उपाध्यक्ष (बिझनेस ड़ेवलपमेंट), एमजीएल लिमिटेड यांच्याद्वारे एका सखोल प्रस्तुतीकरणाने झाला. त्याने दिवसाची दिशा ठरवली, जी होती भारताच्या उर्जा लँडस्केपमध्ये एलएनजीच्या महत्त्वावर आणि या क्षेत्रात एमजीएल आणि एमएलपीएल निभावत असलेल्या आघाडीच्या भूमिकेवर प्रकाश टाकणे.
त्यानंतर अग्रगण्य OEM उत्पादक अशोक लेलँड, झोनल हेड श्री वैभव आंबेतकर आणि व्होल्वो ट्रक्सचे श्री शरथ यू.एस.यांच्या जोडीने, तसेच ऑटोमोटिव रिसर्च असोशिएशन ऑफ इंडिया (एआरएआई) कडील उपमहाव्यवस्थापक, श्री. संदिप रायरीकर यांच्याकडून अंतर्दृष्टीकारक प्रस्तुतीकरणे आली. त्यांनी वाहतूकदारांना आणि इतर हितसंबंधियांना त्यांच्या साठी उपलब्ध असलेल्या पर्यायांविषयी, खास करून दीर्घ पल्ल्याच्या वाहतूकीसाठी, समजून घेण्यात मदत केली.
प्रतिष्ठित सहभागी -अशोक लेलँडचे श्री. आंबेटकर, श्री. टी.एल शऱणागत, संचालक एमएलपीएल, श्री. सुब्बाराव वड्डादी, संचालक एमएलपीएल, आणि जेएसडब्ल्यू सीमेंट लि. च्या सस्टेनेबिलिटी हेड सुश्री. मोनिका श्रीवास्तव, आणि एआरएआईचे श्री. रायरीकर यांचा सहभाग असलेले पॅनेल डिस्कशन हे ठळक वैशिष्ट्य होते. श्री. विकास खन्ना, सीएफओ, एमएलपीएल यांच्याद्वारे सूत्रसंचालित पॅनेलने नियामक चौकट, एलएनजीसाठी भावी दृष्टीकोन, शाश्वतता आणि कार्बन कपात धोरणे, उद्योगाना सामोरे जावे लागत असलेली आव्हाने आणि आवश्यक सावधगिरी, आणि इतर पर्यायी इंधने यांच्यासहित एलएनजीशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.
काँक्लेवविषयी बोलतांना, श्री. आशू सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, महानगर गॅस लिमिटेड आणि अध्यक्ष, एमएलपीएल म्हणाले, “आम्हाला महा एलएनजी काँक्लेव आयोजित करताना आणि उद्योगातील आघाडीचे प्लेयर्स एकत्र आणताना आनंद होत आहे. हे व्यासपीठ आपल्याला अंतदृष्टीची देवणघेवाण करणे, आव्हांनाना संबोधित करणे, आणि शाश्वत उर्जा भविष्याच्या दिशेने समन्वयाने काम करण्यास सक्षम करते. महानगर गॅस लिमिटेड मध्ये आम्ही ग्राहकांचे अधिक स्वच्छ आणि हरित इंधनाकडे संक्रमण करण्यास आणि त्यांच्यासाठी अधिक पर्याय देण्यासाठी आमची ऑफरिंग्स विस्तारित करण्यास वचनबद्ध आहोत. आम्हाला आशा आहे की आजची संभाषणे वाहतूकदारांसाठी एक व्यवहार्य पर्याय म्हणून एलएनजीचा शोध घेण्यात आमच्या पीअर्सना मदत करतील.”
काँक्लेवमध्ये आर्थिक संस्था, गेल (इंडिया) लिमिटेड, रिट्रोफिटर्स, लॉजिस्टिक फर्म्स, वाहतूकदार आणि ओरीजीनल इक्विपमेट मॅन्युफॅक्चरर्स (ओइएमस) या सारख्या एलएनजी वैल्यु चेनच्या विविध प्रस्थापित कंपन्यांनी भाग घेतला.
----------
Comments
Post a Comment