फ्युचर जनरालीच्या डिसेबिलिटी इन्कम प्रोटेक्शन इन्श्युरन्सचा वापर करून तुमच्या कर्मचाऱ्यांचे उत्पन्नतोट्यापासून करा संरक्षण
फ्युचर जनरालीच्या डिसेबिलिटी इन्कम प्रोटेक्शन इन्श्युरन्सचा वापर करून तुमच्या कर्मचाऱ्यांचे उत्पन्नतोट्यापासून करा संरक्षण
फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्सने (एफजीआयआय) डिसेबिलिटी इन्कम प्रोटेक्शन इन्श्युरन्स ही योजना सुरू केली आहे. ही अशा प्रकारची पहिलीच योजना असून पॉलिसीधारकाला व्यंग आले असता ही पॉलिसी त्याला आर्थिक कवच प्रदान करते. कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाचे नुकसान होऊ न देण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक संरक्षण प्रदान करण्यास नियोक्त्यांना म्हणजे एम्प्लॉयर्सना मदत करणे हा या पॉलिसीचा प्राथमिक हेतू आहे. हे कर्मचारी त्यांचे राहणीमान कायम ठेवू शकतील आणि आवश्यक खर्च भागवू शकतील, याची यामुळे खातरजमा होईल.
एफजीआयआयचा डिसेबिलिटी इन्कम प्रोटेक्शन इन्श्युरन्स प्लॅन हे ग्रुप हेल्थ इन्श्युरन्स प्रोडक्ट असून यात तात्पुरत्या व कायमस्वरुपी व्यंगापासून संरक्षण प्राप्त होते. यात शारीरिक व मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या आजारांचा म्हणजे विमा कालावधीत निदान झालेले आजार, अपघातामुळे झालेल्या शारीरिक इजा, आणि अनपेक्षित व अपवादात्मक प्रसंगांमुळे निर्माण झालेल्या आरोग्य समस्यांचा समावेश आहे, ज्यामुळे उत्पन्नाचे पूर्णपणे किंवा अंशतः नुकसान होते.
या नव्या प्रोडक्टच्या लाँचबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्सचे चीफ डिस्ट्रिब्युशन ऑफिसर श्री. रमित गोयल म्हणाले, "आम्ही एक जबाबदार विमाकर्ते आहोत, डीईआय आमच्या डीएनएचा भाग असून, आमच्या ग्राहकांसाठी आम्ही आयुष्यभराचे साथीदार आहोत आणि त्यांच्या संपूर्ण प्रवासात आम्ही त्यांची साथ देतो. व्यंग येण्यास सुरुवात झाली की, आरोग्याचा खर्च प्रचंड वाढतो. अशा वेळी सामाजिक व आर्थिक घसरण होण्यापासून बचाव होण्यासाठी सर्वसमावेशक विमा संरक्षण अत्यंत महत्त्वाचे असते. या ग्रुप इन्श्युरन्स प्रोडक्टसह आम्ही भारतातील नियोक्त्यांना व्यंगामुळे उत्पन्नाच्या होणाऱ्या नुकसानापासून त्यांच्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची आणि या व्यंगांचे व्यवस्थापन करण्यासाठी सहाय्यक सेवा व बाह्यरुग्ण आरोग्यसेवेच्या प्रचंड खर्चामुळे येणाऱ्या आर्थिक ओझ्यापासून दिलासा देण्यासाठी एक संधी देत आहोत."
डिसेबिलिटी इन्कम प्रोटेक्शन प्लॅन हा नियोक्त्यांकडून एम्प्लॉयी बेनिफिट पॅकेजचा एक भाग म्हणून देता येऊ शकतो. अनपेक्षित आरोग्य समस्यांमुळे उत्पन्नाच्या संभाव्य नुकसानापासून कर्मचाऱ्यांचे संरक्षण करणे हे याचे उद्दिष्ट आहेच, त्याचप्रमाणे कंपनीची आपल्या मनुष्यबळाचे कल्याण व आर्थिक संरक्षणासाठी असलेली प्रतिबद्धतता दिसून येते. या महत्त्वपूर्ण पाठिंब्यामुळे उत्पादकता आणि मनोबल उच्च पातळीवर राखण्यासाठी, तसेच कर्मचाऱ्यांना महत्त्व असल्याचे आणि सुरक्षित वाटेल असे वातावरण तयार होण्यासाठी मदत होईल. विद्यमान कर्मचारी लाभांमध्ये या उत्पादनाचा समावेश करून, संस्थांना त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मजबूत संरक्षक कवच तयार करता येईल.
बँकांचा समावेश असलेल्या त्यांच्या मल्टि-चॅनल वितरण प्रणालीचा लाभ घेऊन हे उत्पादन देशभरातील नियोक्ता-कर्मचारी यांच्यासाठी उपलब्ध करून देण्याचे एफजीआयआयचे उद्दिष्ट आहे. हे उत्पादन आर्थिक संस्थांकडून त्यांच्या कर्जदारांना देखील प्रदान केले जाऊ शकते.
Comments
Post a Comment