इझमायट्रिपकडून आझादी मेगा सेलची घोषणा
इझमायट्रिपकडून आझादी मेगा सेलची घोषणा
~ फ्लाइट्स, हॉटेल्स, हॉलिडे पॅकेजेसवर आकर्षक सूट ~
मुंबई, ३१ जुलै २०२४: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने आगामी स्वातंत्र्य दिनासाठी स्पेशल सेल 'आझादी मेगा सेल'ची घोषणा केली आहे. हा सेल ग्राहकांना सर्व प्रवास सेवांवर आकर्षक सूट देईल. हा सेल पर्यटकांना ६ ऑगस्ट २०२४ पर्यंत फ्लाइट्स, हॉटेल्स, बसेस्, कॅब बुकिंग्ज आणि हॉलिडे पॅकेजेसवर आकर्षक सूट देत विविध गंतव्य व अनुभवांना एक्स्प्लोअर करण्याची संधी देईल.
आझादी मेगा सेलमध्ये ग्राहकांना फ्लाइट्स बुकिंग वर जवळपास ३४ टक्के सूट, हॉटेल्सवर जवळपास ६० टक्के सूट तर बसेस आणि कॅब्स बुकिंग्सवर अनुक्रमे १५ आणि १२ टक्के सूट मिळेल. इझमायट्रिपद्वारे ग्राहकांसाठी ११,५९९ रूपयांपासून सुरू होणारे हॉलिडे पॅकेजेसदेखील ऑफर करण्यात येत आहेत.
या अद्भुत सूटचा आनंद घेण्यासाठी ग्राहकांनी इझमायट्रिप अॅप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून सेवांचा लाभ घेण्यासाठी प्रोमो कोड ‘इएमटीआझादी'चा वापर करणे आवश्यक आहे. तसेच, आयसीआयसीआय बँक व अमेरिकन एक्स्प्रेस बँक कार्डचा अनुक्रमे कोड्स ‘इएमटीआझादी’ आणि ‘एएमएक्सफेस्ट'चा वापर करत बुकिंग करण्यासह ग्राहक अतिरिक्त सूटचा आनंद घेऊ शकतात, ज्यामुळे त्यांच्या प्रवास अनुभवामध्ये अधिक उत्साहाची भर होईल. या ऑफरला अधिक उत्साहवर्धक करण्यासाठी सेलदरम्यान करण्यात आलेल्या प्रत्येक व्यवहारासोबत निवडक ब्रँड सहयोगींकडून गिफ्ट वाऊचर्स जिंकण्याची संधी आहे. सेल कालावधीदरम्यान सर्वाधिक खर्च करणाऱ्या ग्राहकांना ईजीडिनरकडून मोफत सदस्यत्व, नाशर माइल्सकडून मोफत केबिन बॅग्ज आणि बीअर्डो व केपिवाकडून आकर्षक सरप्राइजेज जिंकण्याची संधी मिळेल.
इझमायट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक श्री. निशांत पिट्टी म्हणाले, ''संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह साजरा केला जात असताना आम्हाला आमच्या आझादी मेगा सेलची घोषणा करताना आनंद होत आहे. तुम्ही जलद गेटवे किंवा जीवनातील साहसासाठी नियोजन करत असाल तर आमच्या विशेष डील्स जगभरात फ्लाइट्स, हॉटेल्स आणि एक्स्पेरिअन्सेसवर अद्वितीय सूट देत आहेत. इझमायट्रिपमध्ये आम्ही तुम्हाला विश्वातील अद्भुत गोष्टींचा अनुभव देण्याप्रती कटिबद्ध आहोत आणि तुमचा प्रवास सुरू करण्यासोबत तुमच्यामधील उत्साही पर्यटकाना साजरे करण्यासाठी हीच उत्तम वेळ आहे.''
Comments
Post a Comment