जीजेईपीसीच्या इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो (आयआयजेएस) प्रीमियर 2024 ने विक्रमी 12 अब्ज डॉलरच्या व्यवसायाला दिली चालना

 

जीजेईपीसीच्या इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो प्रीमियर 2024 ने विक्रमी 12 अब्ज डॉलरच्या व्यवसायाला दिली चालना

 आयआयजेएस प्रीमियर : व्यवसाय, नावीन्य आणि स्केलमध्ये सेट केला नवीन बेंचमार्क; रेकॉर्डब्रेक व्यापार आणि नवा आशावाद



 

मुंबई, 23 ऑगस्ट 2024 : जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (जीजेईपीसी) या भारताच्या सर्वोच्च व्यापार संस्थेने आयोजित केलेल्या, तसेच जगातील सर्वात मोठ्या जेम अँड ज्वेलरी बीटूबी शोपैकी एक असलेल्या इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो (आयआयजेएस) प्रीमियर 2024 मध्ये  6 दिवसांत तब्बल 12 अब्ज डॉलरच्या व्यवसायाची निर्मिती झाली. हा एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे.

 आयआयजेएस प्रीमियर 2024 शोची (40 वी आवृत्ती) या वर्षीची थीम "ब्रिलियंट भारत" होती. 8-12 ऑगस्टच्या दरम्यान जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे आणि 9-13 ऑगस्टच्या दरम्यान बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, नेस्को गोरेगाव, मुंबई येथे या शोचे आयोजन करण्यात आले होते. आयआयजेएस प्रीमियर 2024 मध्ये एकूण 135,000 चौरस मीटरचे (.४५ दशलक्ष चौ.फूट) प्रदर्शन क्षेत्र होते. पाश्चिमात्य जगतातील प्रमुख तुलनात्मक शोच्या तुलनेत हे क्षेत्र खूप जास्त आहे. 3,600 स्टॉल्स आणि 2,100 प्रदर्शकांसह, आयआयजेएस प्रीमियरने 50,000 पेक्षा जास्त खरेदीदारांना आकर्षित केले. कंबोडिया, इराण, जपान, मलेशिया, नेपाळ, रशिया, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, तुर्की, युनायटेड किंगडम, उझबेकिस्तान यासह 13+ देशांतील 15 आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ यात सहभागी झाले होते.

 आयआयजेएस प्रीमियर 2024 सोबतच एकाच वेळी चालणारा आयजीजेएमई प्रीमियरही यावेळी होताहा एक प्रमुख मशिनरी आणि अलाईड एक्स्पो 9-13 ऑगस्ट 2024 या कालावधीत बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, नेस्को, गोरेगाव, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या इव्हेंटमध्ये 220 हून अधिक कंपन्या आणि 320 स्टॉल्स होते, ज्यात यंत्रसामग्री व तंत्रज्ञानातील अत्याधुनिक वस्तूंचे प्रदर्शन होते. विशेष म्हणजे, प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय सहभाग आणि प्रदर्शनाची जागतिक पोहोच ठळकपणे मांडणाऱ्या इटली पॅव्हेलियनचा समावेश होता.

 माननीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पीयूष गोयल यांनी 10 ऑगस्ट रोजी बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे आयआयजेएस प्रीमियरला भेट दिली आणि व्यापारी सदस्यांशी संवादही साधला. पीयूष गोयल यांनी रत्न आणि आभूषण उद्योगासाठी एक प्रमुख धोरणात्मक उपक्रम म्हणून डायमंड इम्प्रेस्ट परवाना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली.

 गोयल म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्पाने सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या शुल्क दरात कपात केली आहे, त्यामुळे रत्न आणि दागिने उद्योग व रोजगार निर्मितीला धक्का बसला आहे.

 जागतिक मंदीमुळे निर्यातीतील तोटा भरून काढण्यासाठी भारताची देशांतर्गत बाजारपेठ पूर्वपदावर येणारी आहे आणि वेगाने वाढत आहे. मी रत्न आणि दागिने निर्यातदारांना सकारात्मक राहण्याचे आवाहन करतो,” असेही गोयल म्हणाले.

 गोयल पुढे म्हणाले, “भारत सरकार जी7 सोबत चर्चा करत आहे आणि अनेक संबंधित केंद्रीय मंत्री वाटाघाटीत सक्रियपणे सहभागी आहेत. आम्ही युरोपचे मिनिस्टर्स आणि कमिशनर्स यांच्याशी विस्तृत चर्चा करत आहोत. पारदर्शकता, डेटा संरक्षण आणि खर्चाचे मुद्दे आहेत, पण भारत G7 सोबत ताकदीने वाटाघाटी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.”

 आम्हाला आशा आहे की, मुंबई किंवा सुरतमध्ये अँटवर्पमधील केंद्रासारखे केंद्र असावे. हिरे वेगळे करण्यासाठी आणि त्यांच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी आम्ही डी बियर्स, किम्बर्ली प्रोसेस यांच्याशीही चर्चा करत आहोत. तथापि, या संदर्भात कोणतीही तांत्रिक यंत्रणा आणि कोणताही प्रोटोकॉल नाही व आम्ही या दिशेने संयुक्तपणे काम करत आहोत,” असेही गोयल यांनी सांगितले. 

 एफटीएच्या बाबतीत, आम्ही सल्लागार प्रक्रियेचे अनुसरण करतो. विकसित देशांशी आणि खंडांशी अनेक चर्चा होत आहेत. तथापि, चर्चा सुरू असल्याने याला किती वेळ लागेल, याचा अंदाज लावणे कठीण आहे. ऑस्ट्रेलियासोबत ईलीटीए आणि यूएईसोबत CEPA FTA च्या बाबतीत आम्ही आमच्या सर्व संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करू शकलो. न्याय्य आणि संतुलित दृष्टिकोनावर आमचा भर आहे. आधी असे होत नव्हते, असेही गोयल यांनी स्पष्ट केले. 

 ऑस्ट्रेलियासोबतच्या एफटीएमध्ये आम्ही भारतीय आयटी क्षेत्रासाठी दुहेरी कर काढून टाकला. युरोपच्या ईएफटीए (स्वित्झर्लंड, आइसलँड, नॉर्वे आणि लिकटेंस्टीन) बाबतीत, त्यांनी भारतात $100 अब्ज गुंतवणूक आणि 1 दशलक्ष नोकऱ्या निर्माण करण्याचे वचन दिले आहे.  

 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE