मुलांमध्ये श्वसनाच्या व्यवस्थापनासाठी 'नेब्युलायझर'चा वापर करा- 'ओम्रॉन हेल्थकेअर'चे आवाहन
मुलांमध्ये श्वसनाच्या व्यवस्थापनासाठी 'नेब्युलायझर'चा वापर करा- 'ओम्रॉन हेल्थकेअर'चे आवाहन
मुंबई, ३० ऑगस्ट २०२४ : महाराष्ट्रात लहान मुलांमध्ये श्वसनाचे विविध आजार सध्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. दमा, श्वासनलिकादाह (ब्राँकायटिस) आणि फुप्फुसदाह (न्यूमोनिया) यांसारख्या समस्यांचा केवळ या मुलांच्या आरोग्यावरच परिणाम होत नाही तर त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या आरोग्य सुविधांवरही मोठा ताण पडतो. श्वासोच्छवासाच्या समस्येवर व्यवस्थापन करण्यासाठी 'नेब्युलायझर' हे एक महत्त्वाचे साधन म्हणून उदयास आले असून, त्याचा वापर करण्याचे आवाहन ओम्रॉन हेल्थकेअर'ने केले आहे.
जागतिक पातळीवर तीव्र श्वसन संक्रमणाने (एआरआय) (प्रामुख्याने न्यूमोनिया) ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या २० टक्के मुलांचा मृत्यू होतो. जर न्यूमोनियाचाही विचार केला तर, पाच वर्षांखालील मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण ३५-४० टक्क्यांपर्यंत वाढते, ज्यामध्ये दरवर्षी २.०४ दशलक्ष मृत्यू होतात. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार २०२३च्या शेवटच्या दोन महिन्यांत महाराष्ट्रातील १७ विभागांत तीव्र श्वसन संक्रमणाची १ हजार ९०० प्रकरणे आढळली, ज्यापैकी जवळजवळ ४० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक ठरले आहे.
'ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज' अर्थात 'जागतिक रोगराई भार'नुसार (जीबीडी, १९९०-२०२१) २०२१ पर्यंत २ ते ९ वर्षे वयोगटातील ३ लाख ९५ हजार ५०४ मुले आणि १० ते १९ वर्षे वयोगटातील ४ लाख ९० हजार ७२९ मुले दम्याने ग्रस्त असल्याचे आढळले. १५ ते १९ वर्षे वयोगटातील ३१ हजार ७६३ किशोरवयीन आणि तरुण प्रौढ सर्वांत महत्त्वाच्या शालेय वर्षांमध्ये क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज म्हणजेच 'सीओपीडी'ने ग्रस्त आहेत. ही आकडेवारी परिस्थितीची गंभीरता आणि प्रभावी उपायांची तातडीची गरज अधोरेखित करते.
'ओम्रॉन हेल्थकेअर इंडिया'चे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) श्री तेत्सुया यामादा म्हणाले, की 'गंभीर वायू प्रदूषण आणि इतर कारणांमुळे, २०२१ पर्यंत अस्थमाच्या रूग्णांची संख्या ३१.८ दशलक्ष आणि 'सीओपीडी'च्या रुग्णांची संख्या ३६.१ दशलक्ष होती, एकूणच या सर्व परिस्थितीमुळे अंदाजे ६८ दशलक्ष लोक बाधित होते.
तत्काळ आरोग्याच्या परिणामांपलीकडेही श्वसन रोगांचे मुलांच्या वाढीवर, विकासावर आणि शैक्षणिक परिणामांवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता असते. तीव्र श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे मुले शाळेत सतत गैरहजर राहणे, आणि याचा त्यांच्या शैक्षणिक कार्यप्रदर्शनावर आणि सामाजिक संवादावर परिणाम होण्याचीही शक्यता असते. त्यांची विकसित होणारी रोगप्रतिकारक शक्ती आणि घराबाहेर खेळण्याची प्रवृत्ती त्यांना अशा परिस्थितींमध्ये आणू शकते, ज्यामुळे श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात किंवा आरोग्य बिघडवूही शकतात.
उच्च आर्द्रता आणि ऍलर्जीनमुळे सामान्य आजारांमध्ये अनुनासिक रक्तसंचय, इन्फ्लूएन्झा आणि दम्याचा झटका वाढणे यांचा समावेश होतो. या अशा सर्व आव्हानांना तोंड देताना पावसाळ्यात श्वासोच्छवासासारख्या गंभीर परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी 'नेब्युलायझर' हे एक महत्त्वाचे साधन म्हणून उदयास आले आहे. हे उपकरण द्रव स्वरुपातील औषध (डॉक्टरांनी लिहून दिलेले) बारीक मिहिकांत (मिस्ट) रूपांतरित करतात, ज्यामुळे फुफ्फुसात त्याचे थेट आणि कार्यक्षम वितरण होऊ शकते. ज्यांना 'इनहेलर' वापरण्यात अडचण येऊ शकते, अशांसाठी ही पद्धत विशेषतः मुलांसाठी आणि व्यक्तींसाठी फायदेशीर ठरणारी आहे.
'ओम्रॉन हेल्थकेअर इंडिया' घरगुती आरोग्य निरीक्षण उपकरणांमधील (होम हेल्थ मॉनिटरिंग डिव्हाइसेस) अग्रगण्य प्रदाता असून विशेषतः मुलांमध्ये श्वासोच्छवासाच्या समस्यांची काळजी घेण्यासाठी आणि रोग व्यवस्थापन सुधारण्यासाठी कार्यक्षम औषध म्हणून 'नेब्युलायझर'ची विस्तृत श्रेणी उपलब्ध करीत आहे. 'नेब्युलायझर्स'द्वारे फुप्फुसावर त्वरित आणि अचूक औषधोपचार होत असल्याने, दमा आणि सीओपीडी आदी श्वासोच्छवासाचे आजार व्यवस्थापित करण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.
त्याचबरोबर १९९० मध्ये दम्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १ लाख २० हजार ५५२ इतकी होती, जी २०२१ पर्यंत २ लाख ३ हजार ३७ इतकी वाढली आहे. तर, 'सीओपीडी'शी संबंधित मृत्यू १९९० मध्ये ४ लाख २१ हजार ८११ वरून २०२१ मध्ये १० लाख ८१ हजार ९३ पर्यंत वाढले आहेत. ते पुढे म्हणाले, की 'नेब्युलायझर्स'सारख्या उच्च-गुणवत्तेच्या उपकरणांसह आणि त्याच्या परिणामातील तंतोतंतपणा, अचूकता आणि सोयीसह, आमच्या 'गोइंग फॉर झिरो' मोहिमेच्या अनुषंगाने श्वासोच्छवासाचे विकार कमी करू शकतील असे जग निर्माण करण्यासाठी कुटुंबांना सक्षम बनविण्याचे 'ओम्रॉन'चे उद्दिष्ट आहे.
Comments
Post a Comment