ऑडी इंडियाने नवीन 'ऑडी क्यू८' लाँच केली
ऑडी इंडियाने नवीन 'ऑडी क्यू८' लाँच केली
~ फक्त १५ वर्षांमध्ये भारतात १ लाख विक्रीचा टप्पा गाठला ~
ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात नवीन ऑडी क्यू८ च्या लाँचची घोषणा केली. नवीन ऑडी क्यू८ मध्ये डायनॅमिक स्पोर्टीनेस आणि सुधारित आकर्षकतेचे परिपूर्ण संयोजन आहे, जेथे प्रत्येक वैशिष्ट्यामधून आकर्षकता व शक्ती दिसून येते. लहान ओव्हरहँग्ज आणि लांब व्हीलबेस डायॅमिक व आकर्षक असले स्टान्सला अधिक सुशोभित करतात. डिझाइन सुस्पष्ट व्हॉल्यूम्स आणि आकर्षक वैशिष्ट्यांचे इंटरप्ले आहे, जी या फुली लोडेड नवीन ऑडी क्यू८ मध्ये अधिक सुधारण्यात आली आहे. नवीन ऑडी क्यू८ भारतात १,१७,४९,००० रूपये एक्स–शोरूम या सुरूवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे.
नवीन ऑडी क्यू८ च्या लाँच व्यतिरिक्त, ऑडी इंडिया भारतात फक्त पंधरा वर्षांमध्ये १००,००० कार्सची विक्रीच्या करण्याच्या संस्मरणीय क्षणाला देखील साजरे करत आहे. या टप्प्याला साजरे करण्यासाठी ब्रँडने ऑडी ग्राहकांसाठी १००-डे सेलिब्रेशन बेनीफिट सादर केले आहे, ज्यामध्ये कोणत्याही खरेदीवर लॉयल्टी फायदे, सर्विस प्लॅन्स, एक्स्टेण्डेड वॉरंटी, ऑडी जेन्यूएन अॅक्सेसरीज, ऑडी जेन्यूएन मर्चंडाइज व कलेक्शन्स आणि आकर्षक कॉर्पोरेट व ट्रेड-इन फायद्यांचा समावेश आहे.
ऑडी क्यू८ची वैशिष्ट्ये:
ड्राइव्ह आणि कार्यक्षमता:
• ३.० लीटर टीएफएसआय इंजिनची शक्ती, जे देते ३४० एचपी शक्ती आणि ५०० एनएम टॉर्क, तसेच उच्च दर्जाची कामगिरी व कार्यक्षमतेसाठी ४८ व्होल्ट माइल्ड हायब्रिड तंत्रज्ञानासह सुधारण्यात आले आहे.
• फक्त ५.६ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करते, अव्वल गती २५० किमी/तास.
• जलद व स्मूद-शिफ्टिंग एट-स्पीड टिपट्रॉनिक ट्रान्समिशन विनासायास व प्रतिसादात्मक ड्रायव्हिंग अनुभवाची खात्री देते.
• क्वॉट्रो परमनण्ट ऑल-व्हील ड्राइव्ह सर्व ड्रायव्हिंग स्थितींमध्ये अपवादात्मक घर्षण व स्थिरता देते.
• डॅम्पर कंट्रोलसह सस्पेंशन संतुलित व आरामदायी राइड देते.
• इलेक्ट्रोमेकॅनिकल पॉवर स्टीअरिंग अचूक हाताळणी व सुधारित ड्रायव्हिंग गतीशीलता देते.
• सहा कस्टमायझेबल ड्रायव्हिंग मोड्ससह ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट, तसेच 'इंडिव्हिज्युअल' मोड क्यू८ च्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करते.
एक्स्टीरिअर:
• आकर्षक नवीन सिंगल-फ्रेम ग्रिलसह ड्रॉपलेट आकारामध्ये विशिष्ट व्हर्टिकल इनले डिझाइन, जी रस्त्यावर कमांडिंग व आकर्षक उपस्थितीमध्ये भर घालते.
• नवीन एअर इनटेक ग्रिल व स्पॉयलर नवीन क्यू८ चे ऐरोडायनॅमिक प्रोफाइल आणि डायनॅमिक लुकमध्ये भर करतात.
• पुढील व मागील बाजूस असलेल्या चार रिंग्जवर नवीन द्विमितीय डिझाइन.
• पॅनोरॅमिक सनरूफ आणि फ्रेमलेस दरवाजे स्लीक, आधुनिक डिझाइन देतात, जी आरामदाणीपणा व स्टाइलमध्ये भर करते.
• प्रगत एचडी मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्ससह एक्स-शेप्ड डिझाइन असलेले लेझर बीम, तसेच सुधारित दृश्यमानता आणि विशिष्ट लुकसाठी डायनॅमिक इंडीकेटर्स.
• चार कस्टमायझेबल डिजिटल लाइट सिग्नेचर्स आकर्षक नवीन ऑडी क्यू८ च्या व्हिज्युअल लुकमध्ये अधिक भर करतात.
• नवीन आर२१ अलॉई व्हील्समध्ये ग्रॅफाइट ग्रेमधील फाइव्ह-सेगमेंट स्पोक डिझाइन आहे, जी डायनॅमिक एक्स्टीरिअरमध्ये अधिक आकर्षकतेची भर करते.
• नवीन रेड ब्रेक कॅलिपर्स अलॉई व्हील्समध्ये आकर्षक व स्पोर्टी लुकची भर करतात.
• आठ आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध -वेटोमो ब्ल्यू, मिथोस ब्लॅक, समुराई ग्रे, ग्लेसियर व्हाइट, सॅटेलाइट सिल्व्हर, टमरिंड ब्राऊन व विक्युना बीज आणि नवीन विशेष रंग साखीर गोल्ड.
आरामदायीपणा व तंत्रज्ञान:
• नवीन पार्क असिस्ट प्लस प्रभावी अचूक पार्किंगसाठी प्रगत पार्किंग असिस्टण्स देते.
• ३६०-डिग्री सराऊंड व्ह्यू कॅमेरा आसपासच्या भागांचे परिपूर्ण दृश्य देत सर्वसमावेशक दृश्यमानता आणि सुधारित सुरक्षितता देतो.
• दरवाज्यांसाठी पॉवर लॅचिंग सोयीसुविधेसह सुलभ व सुरक्षित क्लोजरची खात्री देते.
• इलेक्ट्रिकली उघडणारे व बंद होणारे टेलगेट बटन दाबल्यास एैसपैस सामानाची जागा उपलब्ध करून देते.
• नवीन ४-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम केबिनच्या प्रत्येक भागासाठी वैयक्तिक टेम्परेचर सेटिंग्ज देते.
इंटीरिअर आणि इन्फोटेन्मेंट:
• ड्युअल-स्क्रिन सेटअपसह प्रायमरी २५.६५ सेमी डिस्प्ले आणि सेकंडरी २१.८४ सेमी स्क्रिन सुलभपणे नेव्हिगेशन, मनोरंजन व वेईकलच्या फंक्शन उपलब्ध करून देतात.
• हाय-क्वॉलिटी केबिनसह प्रगत ऐरो-अकॉस्टिक्स बाहेरील आवाज कमी करत प्रसन्न व शांतमय ड्रायव्हिंग वातावरणाची खात्री देते.
• हॅप्टिक व अकॉस्टिक फीडबँकसह युजर परस्परसंवादामध्ये वाढ.
• शक्तिशाली १७ स्पीकर्स आणि एकूण ७३० वॅट्सचे आऊटपुट असलेली नवीन बीअँडओ प्रीमियम ३डी साऊंड सिस्टम सुस्प्ष्ट आवाज व सर्वोत्तम क्लेरिटीसह अद्वितीय ऑडिओ अनुभव देते.
• फुली ३१.२४ सेमी डिजिटल ऑडी व्हर्च्युअल कॉकपीट स्लीक, कस्टमायझेबल फॉर्मेटमध्ये सर्व आवश्यक ड्रायव्हिंग माहिती दाखवते.
• बटन-लेस एमएमआय नेव्हिगेशन प्लस सिस्टमसह टच रिस्पॉन्स.
• नॅच्युरल लँग्वेज इंटरअॅक्शनसह वॉईस डायलॉग सिस्टम.
• प्रगत हँड रायटिंग रेकग्निशन - व्होल वर्ड रेकग्निशन.
• इलेक्ट्रिकली अॅडजेस्टेबल फ्रण्ट सीट्समध्ये ड्रायव्हर मेमरी फंक्शन आहे, जी वैयक्तिकृत सीटिंग पोझिशन देते.
• फ्रण्ट सीट्ससाठी इलेक्ट्रॉनिक लंबर सपोर्ट सानुकूल आरामदायी व अनुकूल पाठिंबा देते.
• प्रीमियम लेदर व लेदरेट सीट अपहोल्स्टरी आरामदायीपणा देते.
• ऑडी फोन बॉक्स लाइटसह वायरलेस चार्जिंग चालता-फिरता मोबाइल डिवाईसला चार्जिंग करण्याची सुविधा देते.
• चार आकर्षक इंटीरिअर रंग पर्याय - ओकापी ब्राऊन, सैगा बीज, ब्लॅक आणि पाण्डो ग्रे, ज्यामुळे ग्राहक त्यांच्या पसंतीनुसार स्टाइलची निवड करू शकतात.
सुरक्षितता:
• ऑडी प्री-सेन्स आपत्कालीन ब्रेकिंगच्या वेळी किंवा मर्यादेनुसार ड्रायव्हिंग करण्यासाठी प्रतिबंधात्मक संरक्षण देते.
• अधिक सुरक्षिततेसाठी आठ एअरबॅग्जसह सुसज्ज.
• इलेक्ट्रॉनिक स्टेबिलायझेशन प्रोग्राम आव्हानात्मक स्थितींमध्ये घर्षण कायम राखण्यासाठी आपोआपपणे पॉवर व ब्रेकिंग समायोजित करत एकूण वेईकल स्थिरता आणि नियंत्रण वाढवते.
Comments
Post a Comment