प्रीमियर एनर्जीज लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री
२७ ऑगस्ट २०२४ पासून सुरू
प्रीमियर एनर्जी लिमिटेड इक्विटी
शेअर्सच्या प्राथमिक समभाग विक्रीची बोली/ऑफर मंगळवार, २७ ऑगस्ट २०२४ रोजी खुली होणार आहे. एकूण ऑफर साइजमध्ये 12,914 दशलक्ष रु. पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि 34,200,000
इक्विटी
शेअर्सपर्यंत विक्रीची ऑफर समाविष्ट आहे. प्रमुख गुंतवणूकदारांच्या बोलीची तारीख सोमवार, २६ ऑगस्ट
२०२४ रोजी असेल आणि बिड ऑफर गुरुवार, २९ ऑगस्ट
२०२४ रोजी बंद होईल. ऑफरचा किंमतपट्टा 427 रु. ते 450 रु. प्रति
इक्विटी शेअर आहे. किमान 33 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 33 इक्विटी शेअर्सच्या
पटीत बोली लावता येईल.
कंपनीने आपली उपकंपनी
प्रीमियर
एनर्जीज ग्लोबल एन्व्हायर्नमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या गुंतवणुकीसाठी फ्रेश
इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
भारतातील तेलंगणमधील हैदराबादमध्ये 4 GW Solar PV TOPCon Cell
आणि 4 GW Solar PV TOPCon मॉड्युल निर्मितीसाठी अंशत: वित्तपुरवठा करण्यात येणार असून, आर्थिक वर्ष 2025 आणि आर्थिक
वर्ष 2026 मध्ये 9,686.03 दशलक्ष रु.च्या गुंतवणुकीचा अंदाज
आहे, तसेच
सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी हे उत्पन्न वापरण्यात येईल.
34,200,000
पर्यंतच्या
इक्विटी
शेअर्सच्या विक्रीच्या ऑफरमध्ये साउथ एशिया ग्रोथ फंड I होल्डिंग्ज एलएलसीचे 26,827,200 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, साउथ एशिया ईबीटी ट्रस्टचे 172,800 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि चिरंजीव सिंग
सलुजा यांच्यातर्फे 7,200,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत.
कर्मचारी आरक्षण भागामध्ये बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर
22 रु. ची सवलत दिली जात आहे.
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स
बीएसई लिमिटेड (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ
इंडिया लिमिटेड (NSE) या स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचिबद्ध
करण्याचा प्रस्ताव आहे. ऑफरच्या उद्देशांसाठी, नियुक्त स्टॉक एक्स्चेंज बीएसई असेल. कोटक
महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, जे.पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड हे ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स
आहेत.
Comments
Post a Comment