LEO या जनरेटिव्ह एआय सक्षम व्हॉट्सॲप चॅटबॉटसह फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्स ग्राहक सेवा अनुभवात क्रांती घडविण्यास सज्ज!

 LEO या जनरेटिव्ह एआय सक्षम व्हॉट्सॲप चॅटबॉटसह फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्स ग्राहक सेवा अनुभवात क्रांती घडविण्यास सज्ज!

फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सचा जनरेटिव्ह AI सक्षम चॅटबॉट 'LEO' वैयक्तिक स्पर्श आणि अनोख्या विनोदबुद्धीने सज्ज आहे. यामुळे ग्राहकांना अधिक आकर्षक आणि आनंददायी अनुभव मिळेल.

LEO च्या प्रगत ज्ञानसंचयामुळे सर्व सेवा चौकशांचे अचूक आणि संवादात्मक उत्तर मिळेल. यामुळे माहिती सहजपणे उपलब्ध होईल.


ग्राहक सेवा अनुभवात क्रांती घडवून आणण्यासाठी फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्स कं. लि.ने (एफजीआयआय) व्हॉट्सॲपवर LEO हा जनरेटिव्ह एआय सक्षम चॅटबॉट सादर करत एक अभिनव पाऊल उचलले आहे. LEO हा चॅटबॉट ॲडव्हान्स्ड ऑटोमेशन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) या तंत्रज्ञानाने तयार केलेला आहे. पॉलिसीच्या मुदतीदरम्यान हा चॅटबॉट व्यक्तीनुसार आणि रिअल टाइम मदत करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना एक अनोखा आणि उत्तम अनुभव प्राप्त होणार आहे.

बीसीजी आणि नासकॉमच्या अहवालानुसार देशातील एआय बाजारपेठेच्या उलाढालीत वर्षागणिक 25-35% इतक्या कंपाउंड ॲन्युअल ग्रोथ रेटने (CAGR) वाढ होत आहे. 2027 पर्यंत ही उलाढाल अंदाजे 17 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.1 या उपक्रमाच्या माध्यमातून जनरेटिव्हची क्षमता आणि व्हॉट्सॲपची व्याप्ती यांची सांगड घालून एफजीआयआयला विमाक्षेत्रातील डिजिटल इंटरॅक्टशनमध्ये (परस्परसंवाद) नवा मापदंड प्रस्थापित करायचा आहे.

हा उपक्रम सुरू करण्याबाबत प्रतिक्रिया देताना फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्स कं. लि.च्या चीफ मार्केटिंग, कस्टमर अँड इम्पॅक्ट ऑफिसर रुचिका मल्हान वर्मा म्हणाल्या, "आम्ही आमच्या भागधारकांचे आयुष्यभराचे साथी आहोत. त्यामुळे ब्रँडसोबतचा ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवतो. LEO हा आमचा जेनरेटिव्ह एआय-सक्षम व्हॉट्सॲप चॅटबॉट सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आमच्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासात हा चॅटबॉट ही एक मोठी झेप आहे. LEOमुळे आमच्या सेवांचा ॲक्सेस सहज उपलब्ध होणार आहेच, त्याचबरोबर या चॅटबॉटच्या विचारपूर्वक, प्रतिसादात्मक आणि माणसासारख्या मैत्रीपूर्ण संवादामुळे ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध होईल. आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्याची आमची प्रतिबद्धता यातून दिसून येते.”

मेटाचे भारतातील बिझनेस मेसेजिंगचे संचालक रवी गर्ग म्हणाले, "व्हॉट्सॲप हे भारतातील लोकांच्या डिजिटल आयुष्याच्या केंद्रस्थानी आहे आणि व्हॉट्सॲपमुळे दैनंदिन आयुष्यात किती परिवर्तन घडून येऊ शकते, याची अनेक उदाहरणे भारतातील व्हॉट्सॲपच्या वैविध्यपूर्ण वापरातून दिसून येतात. लोकांना जी मदत आणि महिती हवी आहे, ती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यवसायांना मदत करून ग्राहक अनुभव अधिक समृद्ध करण्यात एआयचा सिंहाचा वाटा असणार आहे, हा आम्हाला विश्वास आहे. फ्युचर जनरालीने त्यांच्या चॅटबॉटमध्ये जनरेटिव्ह एआय समाविष्ट करून लोकांना अधिक वैयक्तिकृत अनुभव देण्यासाठी तयार केल्याचे पाहून आम्हाला आनंद होत आहे."

LEO मुळे ग्राहक ग्राहक थेट व्हॉट्सॲपवरून त्यांच्या विमा पॉलिसीची कागदपत्रे डाउनलोड करू शकतात. पॉलिसी रिन्यूअलची प्रक्रिया सुलभ होते, आणि ग्राहकांना त्यांच्या विमा पॉलिसी अगदी सहज रिन्यू करतात येतात. क्लेमबद्दल मिळणाऱ्या रिअल टाइम अपडेट्समुळे पारदर्शकता राहते आणि मनःशांती लाभते. त्याचप्रमाणे हेल्थ कार्ड तत्काळ जारी केल्याने आरोग्यसेवांचा जलद ॲक्सेस मिळतो. युझर्सना त्यांच्या जवळची हॉस्पिटल, शाखा इत्यादीविषयीची माहिती लगेच समजू शकते. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या मोबाइल नंबरचा उपयोग करून त्यांची माहिती आपोआप संकलित करून ग्राहक अनुभव अधिक चांगला करण्यात येतो.

LEOमध्ये व्हॉट्सॲपचा पेमेंट फ्लो समाविष्ट करण्यात आला आहे. या यंत्रणेत क्रेडिट/डेबिट कार्डे, नेट बँकिंग, वॉलेट्स व यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांना सपोर्ट मिळतो. त्यामुळे युझर्स सुरळीतपणे आणि सुरक्षितपणे पेमेंट करू शकतात आणि विमा गरजांचे व्यवस्थापन करताना अधिक सुविधाजनक अनुभव प्राप्त होतो.


Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE